सिनेसृष्टीला धक्का बसेल अशी बातमी काल समोर आली आली. परफेक्शनिस्ट आमीर खान आणि त्याची पत्नी लग्नाच्या 15 वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांची ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. खूप जणांना त्यांच्या या घटस्फोटाच्या बातमीने धक्का दिला. अनेकांनी याबातमीवर प्रतिक्रिया देखील दिली. पण आमीरची मुलगी इरा ही देखील व्यक्त होणार की काय? असा प्रश्न पडला आहे. कारण इराने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामुळेच सगळ्यांचा गोंधळ उडाला आहे. इरा आपल्या या स्टोरीतून नेमकं काय सांगू इच्छिते याची चर्चा होऊ लागली आहे. खूप जणांनी तिने प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले आहे. एकूणच हे प्रकरण काय ते जाणून घेऊया.
शिल्पा शेट्टीने घेतली सुपरडान्सरच्या गुरूची फिरकी, उलटवली चाल
इराने शेअर केली स्टोरी
इराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने तिचा एक सेल्फी फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये रिव्हयू उद्या? असे लिहिले आहे. तर त्या खाली तिने केकच्या स्लाईसचा एक इमोजी शेअर केला आहे. त्यामुळे आता ही स्टोरी खरंच संभ्रमात पाडणारी आहे. इराला आपल्या वडिलांच्या आयुष्यात सुरु असलेल्य काही गोष्टींचा उलगडा करायचा आहे की काय असे देखील यावरुन दिसत आहे. इराने ही स्टोरी काही वेगळ्या कारणास्तव नक्कीच शेअर केली असावी. त्यामुळे प्रथमदर्शनी पाहता या स्टोरीमध्ये वेगळं असं काही नाही. किंवा त्याचा संबंध आमीर खानच्या घटस्फोटाशी ही मुळीच अवलंबून नाही असे दिसून येत आहे.
होम मिनिस्टरमध्ये आता रंगणार नणंद- जावेची जुगलबंदी
आमीरची मुलगी करतेय डेट
आमीर खानची मुलगी आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत झालेली आहे. आमीर खानची मुलगी तणावग्रस्त होती. त्याबद्दल तिने फार मोकळ्या मनाने आपली मतं मांडली आहेत. सिने जगतापासून दूर असलेल्या इराला दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी तिने एक गाणं देखील दिग्दर्शित केले. पण नंतर ती ड्रिपेशनमध्ये गेल्यामुळे काही काळासाठी गायब झाली. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती सतत या विषयांवर भाष्य करताना दिसते. ती सध्या तिच्या ट्रेनरला डेट करत असल्याची बातम्याही सगळीकडे सध्या पाहायला मिळत आहे.
आमीरने घेतला घटस्फोट
आमीर खानने किरण रावशी 2005 साली दुसरा विवाह केला. किरण रावशी तिने दुसरा विवाह केला. त्यांना आता आझाद नावाचा मुलगा देखील झाला आहे. सरोगसीच्या माध्यमातून त्यांना हा मुलगा झाला आहे. पण त्यांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यमांना त्यांनी या संदर्भात एक माहिती दिली आहे. या माहितीनुसार ते पती-पत्नी म्हणून वेगळे होणार आहेत. पण आई-वडिलांची जबाबदारी ते काही सोडणार नाही. त्यांनी ज्या प्रोजेक्टवर एकत्रित काम केले आहे. ते काम तसेच सुरु राहणार आहे. त्यामुळे पाणी फाऊंडेशन आणि इतर काम ही सुरु राहणार आहेत. त्यामुळे त्यांनी केवळ लग्न मोडले आहे .पण संसारातील सगळ्या जबाबदाऱ्या ते पार पाडणार आहेत. त्यामुळे त्यांचे हे लग्न मोडले तरी ते एकत्र राहणार आहेत.
दरम्यान सध्या आमीर खानच्या या घटस्फोटावर इरा उद्या काय प्रतिक्रिया देते त्याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.