ADVERTISEMENT
home / मनोरंजन
किरण राव आणि आमीर खानचा घटस्फोट

याकारणासाठी आमीरचा झाला घटस्फोट, सांगितले कारण

आमीर खानने लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेतला आणि खूप जणांना आश्चर्याचा धक्का बसला. सगळं काही नीट असताना आमीरचा घटस्फोट झाला तरी कसा? असा खूप जणांना प्रश्न पडला होता. त्यातच आमीरच्या घटस्फोटामागे अभिनेत्री फातिमा सना शेख असल्याचे म्हटले जात होते. त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा जोरदार होत होत्या. त्या दरम्यान किरण राव आणि आमीर खान या दोघांनी मौन ठेवणेच पसंत केले होते. पण आता एवढ्या महिन्यांनतर आमीरने मौन सोडले आहे. आमीरने त्याचा घटस्फोट का झाला याचे कारण एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.

या कारणासाठी झाला आमीर किरणचा घटस्फोट

आमीर आणि किरण यांच्या घटस्फोटाची चर्चा अगदी वाऱ्यासारखी पसरली. इतके चांगले जोडपे वेगळे का होत आहे याची उत्सुकता अनेकांना लागली. आमीर या विषयी काहीही बोलला नाही किंवा किरणने देखील कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आमीरने या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आमीर खान म्हणाला की,  किरण मला नेहमी म्हणायची की, कुटुंबाचा विषय आला की माझे लक्ष नसायचे.मी माझ्याच विश्वास रमलेला असायचो. मी एक वेगळी व्यक्ती आहे  असे ती कायम म्हणायची. तिला मला बदलायचे नव्हते. किरणला मला बदलण्याची इच्छा अजिबात नसायची. मी बदललो तर ती व्यक्ती राहणार नाही. ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं. तिला मी बदलावी अशी अपेक्षा अजिबात नव्हती. पण या गोष्टी तिने मला साधारण 6-7 वर्षांपूर्वी सांगितल्या होत्या. आता माझ्यात अनेक बदल झाले आहे.  आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो तरी आमच्यात पूर्वीसारखेच बॉन्डिंग आहे.

इतर कोणत्याही रिलेशनशीपमुळे नाते तुटले नाही

 आमीर खानचे नाते तुटण्यामागे अभिनेत्री फातिमा सना शेख असल्याचे म्हटले जात होते. पण आमीरने खुलेपणाने त्यावर भाष्य केले आहे. तो म्हणाला की, माझ्या घटस्फोटामागे फातिमा असल्याचे म्हटले जात होेते. पण असे काही नाही. आमचे नाते तुटण्यामागे कोणतीही व्यक्ती नाही. माझे फातिमाशी अफेअर असल्याचे म्हटले जात होते. पण असे काहीही नाही. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे आमच्या अफेअरच्या चर्चांबद्दल काही तथ्य नाही.

 किरणशी केले दुसरे लग्न

आमीर खानने 2002 साली  पहिली पत्नी रिना दत्तापासून पहिला घटस्फोट घेतला. पहिल्या लग्नापासून त्याला जुनैद आणि इरा अशी दोन मुले आहेत.  त्यानंतर 2005 साली त्याने किरण रावशी लग्नगाठ बांधली. किरण आणि आमीरला सरोगसीच्या माध्यमातून बाळ झाले. 2021 मध्ये म्हणजे लग्नाच्या 15 वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

ADVERTISEMENT

किरण आणि आमीर वेगळे झाले तरी अजूनही त्यांचे बॉडिंग चांगले आहे. मुलाचे संगोपन हे दोघे एकत्र अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात.

14 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT