सेलिब्रिटी किडवर सगळ्यांचे अगदी बारीक लक्ष असते. त्यात ती जर सुपरस्टारची मुले असली तर बघायलाच नको. सध्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण एरव्ही कधीही प्रसारमाध्यमांसमोर न येणारी इरा तिच्या फोटोमुळे सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय झाली आहे. या आधीही कितीतरी स्टारकिड्सच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या बातम्या येतच असतात. चंकी पांडेची मुलगी अनाया पांडे आणि कार्तिक आर्यन यांच्याही रिलेशनशीपच्या चर्चा अशाच रंगल्या होत्या. आता इरा बाबतीत तसे काही नाही कारण तिचे हे फोटो पापाराझींनी लपून काढलेले नाहीत. तर हे फोटो इराने स्वत:च पोस्ट केले आहेत. पण कोणतेही गॉसिप करण्याआधी हे फोटो फारच क्युट आहेत असे म्हणायला हवे.
रिना दत्ता ही आमिरची पहिली बायको.. या दोघांना दोन मुलं आहेत. जुनैद (२५) आणि दुसरी इरा (२२) काही वर्षांपूर्वी इराला पापाराझींनी टिपले होते. त्या आधी आमिरच्या या गोड मुलीबद्दल कोणालाही जास्त माहिती नव्हती. पण आता इरा आमिर खान अनेकांना सगळ्यांनाच माहीत आहे. शिवाय तिने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन तिची आणखी माहिती लोकांना मिळाली आहे.
मजेदार मद्य खेळांबद्दल देखील वाचा
कंगना रनौत कशी साकारणार जयललिता यांची भूमिका
इराचा लकी मॅन कोण?
इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे हे फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने काहीच लपवून ठेवले नाही. या मुलाचे नाव मिशाल किरपलानी असून त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार तो म्युझिक कंपोझर असल्याचे कळते. याला जोड देणारी आणखी एक पोस्ट आहे ती इराने शेअर केली आहे. ज्यात मिशाल गाताना दिसत आहे. मिशालने त्याच्या स्वत:च्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरही काही फोटो शेअर केले आहेत. बरं, त्या डेट नाईट बद्दल सांगायचे झाले तर त्यांनी त्या डेट नाईटचे फोटो इन्स्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवले होते.
तसेच पतीसाठी रोमँटिक मादक संदेश वाचा
‘रब ने बना दी जोडी’
इराचे मिशालसोबतचे प्रत्येक फोटो पिक्चर परफेक्ट आहेत. ही दोघं एकमेकांसोबत इतके छान दिसत आहेत की, सोशल मीडियावरही त्यांच्या या फोटोची तारीफ केली जात आहे. बाबा आमिर खानलाही यावर कोणताच आक्षेप असावा असे या फोटोवरुन तरी वाटत नाही. मिशालसोबतचे हे फोटो तिने फार आधीपासून शेअर केले आहेत. पण आता त्याने दिलेल्या काही गिफ्टसमुळे त्यांच्या रिलेशनशीपवर मोहोर बसली आहे.
अभिनेत्री हेमामालिनी आहेत अब्जपती
इराला बनायचे आहे दिग्दर्शक
आता प्रत्येक स्टार किड अभिनय करेलच असे नाही. इरालाही अभिनयात रस नाही तर तिला दिग्दर्शक बनायचे आहे. हे आधीही अनेक ठिकाणी छापून आले आहे. पण इराला बॉयफ्रेडचा डिरेक्ट केलेला पहिला म्युझिक व्हिडिओ पाहता तिने काहीतरी वेगळे व्हावे अशा कमेंट तिला मिळत आहे. शिवाय मिशालचे गाणे, कंपोझिंग त्याचा आवाजही फार लोकांना आवडला असे वाटत नाही. एकूणच प्रेम सोडता इराने मिशालचा असा फ्लॉप म्युझिक व्हिडिओ डिरेक्ट करणे म्हणजे करीअरच्या आधीच स्वत:चे करीअर संपुष्टात आणण्यासारखे आहे. तुम्ही मिशालचा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहा आणि ठरवा.
पल पल दिल के पास गाण्याचा होणार रिमेक, नातू करण रिमेकमध्ये
(फोटो सौजन्य- Instagram,youtube )