पहिला इंडियन आयडॉल आणि पहिल्या वहिल्या रिअॅलिटी शोचा विजेता गायक अभिजीत सावंत यांने बऱ्या वर्षानंतर धक्कादायक असा खुलासा केला आहे.सध्या इंडियन आयडॉलचा 12 वा सीझन सुरु आहे. तो चांगलाच गाजला ते म्हणजे एका एपिसोडमुळे. त्यामुळेच या रिअॅलिटी शोची खूपच चर्चा रंगली. दरम्यान या संदर्भात अभिजीतने एका वाहिनीला मुलाखत देताना मेकर्सवर ताशेरे ओढले आहेत. त्यांना टॅलेंटपेक्षाही स्पर्धकाची गरिबी काय आहे ते दाखवण्यात फारच रुची असते. प्रेक्षकांना केवळ मसाला हवा असल्यामुळे सध्याच्या रिअॅलिटी शोचे खरे स्थान काय ते त्याने या मुलाखतीत सांगितले आहे. नेमंक अभिजीत या सगळ्याविषयी काय म्हणाला जाणून घेऊया सविस्तरपणे
राखी सावंतचा कांगावा, तौक्ते वादळामुळे तुटली घराची बाल्कनी
मसाला आणि काही नाही
हिंदी रिअॅलिटी शो हे कायमच उत्कंठा वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. एखाद्या स्पर्धकांची गरिबी त्याचा संघर्ष त्यांना स्क्रिनवर दाखवायला खूपच जास्त आवडते.सध्याच्या रिअॅलिटी शोवर त्याने आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, आजकाल टॅलेंटपेक्षा ही अधिक जास्त महत्व हे स्पर्धकांना बूट पॉलिश करता येतात का? त्यांच्या आयुष्याचा संघर्ष काय आहे हे दाखवणे जास्त महत्वाचे वाटते. त्याच्यामधील टॅलेंटपेक्षा ही परिस्थिती लोकांसमोर मांडणे त्यांना जास्त गरजेचे वाटते. त्यामुळे रिअॅलिटी शोवरुन विश्वास उठून गेला आहे. लोकांनाही आता टॅलेंट पाहण्यापेक्षा त्यामध्ये काही लव्हस्टोरी एखादा खडतर प्रवास आहे का हे जाणून घ्यायला खूपच आवडते. प्रेक्षकांच्या याच आवडीमुळे टॅलेंटची कदर केली जात नाही.हे फारच वाईट आहे हे सांगायला तो विसरला नाही.
प्रादेशिक रिअॅलिटी शोची केली स्तुती
पुढे अभिजीत सावंत प्रादेशिक रिअॅलिटी शोची स्तुती करायलाही अजिबात विसरला नाही. त्याने सांगितले की, रिअॅलिटी शो हे प्रादेशिक भाषांमध्येही होतात. पण त्या ठिकाणी टॅलेंट हे महत्वाचे मानले जाते. तिथे अशा कोणत्याही गोष्टी दाखवल्या जात नाही. पण हिंदीमधील रिअॅलिटी शो हे कायमच असे मजेदार करताना त्यामध्ये नको त्या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले जाते.
इस्लाममधील स्त्रियांच्या अस्तित्वावरुन प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्याला गौहरने दिले सडेतोड उत्तर
सांगितला स्वानुभव
अभिजीत सावंत ज्यावेळी इंडियन आयडॉल1 चा भाग होता त्यावेळी एका सादरीकरणाच्या दरम्यान तो गाण्याचे काही बोल विसरला. पण त्यावेळी त्याला कोणतेही तडकभडक रंग न देता त्याला पुन्हा एकदा गाण्याची संधी देण्यात आली पण आताच्या या काळात जर असे घडले असते तर नक्कीच डोक्यावर वीज कडाडणं असे काही नक्कीच झाले असते. पण त्यावेळी असे होत नव्हते.
बिझनेस करण्याचा सल्ला
अभिजीत सावंत पुढे म्हणाला की, गेल्या 5 वर्षांपासून त्याने कोणत्याही बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायलेली नाहीत. तो स्टेज शो करुनच पैसे कमावतो. पण सध्याच्या कोव्हिड काळात सगळे शो बंद असल्यामुळे त्याला स्टेज शो ही करता आला नाही. अनेक जणं त्याला बिझनेस करण्याचा सल्ला देतात. पण अभिजीतने आता स्टुडिओत आपलीच सोलो गाणी गाण्याचा आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सगळ्या नकारात्मक उर्जेला दूर सारण्यासाठी कामाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
सध्या इंडियन आयडॉलचा नवा सीझन त्यामधील फेक गोष्टींमुळे आणि कुशार कुमार एपिसोडमुळे खूपच चर्चेत आला आहे. यावरुन अनेक वादही झालेत. याच पार्श्वभूमीवर अभिजीत सावंतची ही मुलाखत घेण्यात आली.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात, 15 मिनिटांत पार पडला सोहळा