ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
silk-saree-accessories

सिल्क साडीसह करा अशी स्टाईल, दिसाल अधिक आकर्षक

स्टाईल म्हटल्यानंतर केवळ वेस्टर्न वेअर (Western Wear) नाही तर अगदी भारतीय कपड्यांमध्येही महिला तितक्याच सुंदर दिसतात. कोणत्याही घरातील अथवा बाहेरील कार्यक्रमाला जाण्यासाठीही अनेक जण साडीला प्राधान्य देतात. त्यातही सिल्क साडी असेल तर त्याची गोष्टच वेगळी आहे. सिल्क साडीचा (Silk saree) तोराच काही वेगळा आहे. अनेक समारंभात सिल्क साडी नेसायला महिलांना आवडते. कारण ही हलकी असतेच त्याशिवाय दिसायलादेखील अधिक आकर्षक दिसते. या साड्या महाग असल्याने महिला या साड्या खूपच जपतात आणि अगदी सांभाळून ठेवतात. सिल्क साड्यांची काळजी खूपच घेतली जाते. पण यामध्ये तुमचा लुक मात्र अधिक सुंदर दिसतो. पण केवळ साडी सुंदर असून चालत नाही त्याची स्टाईलही उत्तम करणे गरजेचे आहे. सिल्क साड्या नेसल्यानंतर त्यावर नक्की कोणते दागिने, अॅक्सेसरीज वापरायला हव्यात याबाबत आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्की याचा वापर करा. 

चोकर घाला

Instagram

तुम्ही जेव्हा सिल्कची साडी नेसाल तेव्हा त्यासह दागिन्यांची स्टाईल करताना चोकर घाला. सोन्याच्या चोकरपासून ते अगदी कुंदन चोकरपर्यंत तुम्ही साडीच्या रंगाप्रमाणे कोणताही चोकर यासह मॅच करू शकता. तर सिल्कच्या साडीवर बीडेड चोकर तुमचा लुक अधिक खास बनवतो. तुम्ही जर जड चोकर घालणार असाल तर त्यासह मॅचिंग असे लहान कानातले तुम्ही स्टाईल करू शकता अथवा चोकर खूपच मोठा आणि गळा भरून टाकणारा असेल तर कानातले नाही घातले तरी तुमचा लुक पूर्ण होतो. 

नेकलेस 

चोकरशिवाय तुम्ही वेगळ्या स्टाईलचे नेकलेसदेखील सिल्कच्या साडीवर घालू शकता. यामुळे तुमचा लुक अधिक आकर्षक दिसतो. उदाहरणार्थ तुम्ही कोणत्या खास फॅशनची सिल्क साडी नेसणार असाल तर त्यावर तुम्ही कुंदनचा नेकलेस अथवा मिसमॅच नेकलेस घालू शकता. कोणत्याही कार्यक्रम अथवा सणांसाठी सिल्क साडी असेल तर तुम्ही एखादा अँटिक असा मोठा हारदेखील निवडू शकता. गोल्डन मोठा नेकलेसदेखील यावर सुंदर दिसतो. 

करा झुमक्यांची स्टाईल

Instagram

तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील आणि सिल्क साडीवर तुम्हाला अगदी मिनिमल अॅक्सेसरीज लुक करायचा असेल, तसंच सिल्क साडीचा लुक अगदी एलिगंट दिसायला हवा असेल तर तुम्ही यावर झुमके घाला. वेगवेगळ्या आकाराचे आणि मोठे असे झुमके बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीचे आणि साडीला मॅच होतील असे झुमके निवडून घालता येतील. 

ADVERTISEMENT

बांगड्याही दिसतील छान 

बऱ्याच महिलांना बांगड्या घालायला आवडत नाहीत. पण साडीवर आणि विशेषतः सिल्क साड्यांवर बांगड्या फारच सुंदर दिसतात. तुम्हाला खूप बांगड्या आवडत नसतील तर एखादी जाड गोल्डन बांगडीही सुंदर दिसते. एथनिक टच तुम्हाला या साडीमध्ये हवा असेल तर साडीच्या रंगानुसार वेगवेगळ्या बांगड्या तुम्ही हातात घालू शकता. तुमच्या हाताची आणि साडीचीही शोभा यामुळे वाढते. अगदीच बांगडी नको असल्यास, तुम्ही एखादे कडे अथवा ब्रेसलेटही घालू शकता. 

टिकलीमुळे येते शोभा

आजकाल बऱ्याचदा आपण पाहतो की, अभिनेत्रीही साडी नेसल्यावर टिकली लावत नाहीत. पण सिल्क साडी असेल तर त्यावर टिकली अतिशय सुंदर दिसते. तुम्हाला एलिगंट आणि पारंपरिक पण तितकाच आकर्षक लुक हवा असेल तर तुम्ही नक्की टिकली लावा. अगदी लहानशा टिकलीनेदेखील तुमच्या लुकमध्ये खूपच फरक पडतो. तसंच साडीवर मॅचिंग टिकलीच लावली पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही लाल अथवा काळी टिकलीदेखील लाऊ शकता. तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार तुम्ही टिकलीचा वापर करा. केवळ सिल्क साडीवर स्टड टिकली लाऊ नका अन्यथा ते दिसायला चांगले दिसणार नाही. 

केसात गजरा माळायला नका विसरू

Instagram

इतर वेळी आपण गजरा घालत नाही. तुम्हाला जरी गजरा आवडत नसला तरीही सिल्कच्या साडीवर गजरा हे कॉम्बिनेशन आणि ही स्टाईल अप्रतिमच शोभते. गजऱ्याशिवाय सिल्क साडीची शोभा पूर्णच होत नाही. याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे गजरा ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला परवडणारी आहे. कोणत्याही स्टाईलसह गजरा तुम्ही कॅरी करू शकता. तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल केली तरी गजरा माळल्यानंतर सुंदरच दिसते. त्यामुळे सिल्कच्या साडीसह ही स्टाईल करायला नक्कीच विसरू नका आणि करा तुमच्या सिल्क साडीचा लुक पूर्ण. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
29 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT