सध्या लग्न करण्याचे वारे सुटले आहेत असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. तेदेखील मराठी इंडस्ट्रीमध्ये. नुकतंच शर्मिष्ठा राऊत, सई लोकुर, अभिज्ञा भावे, मानसी नाईक, मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकर यांचं लग्न झालं आहे. आता लवकरच अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटीलही विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या केळवणीचे धमाल फोटो व्हायरल झाले आहेत. आस्ताद काळेने अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तर मराठीतील बिग बॉसमधून तो घराघरात अँग्री यंग मॅन म्हणून पोहोचला. आपल्या उत्तम भाषेच्या जोरावर आजतागायत तो इंडस्ट्रीमध्ये टिकून आहे. अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारून आस्तादने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
#tinypanda – सिद्धार्थ – मितालीच्या लग्नाची धूम, खास क्षण
आस्ताद आणि स्वप्ना लवकरच करणार लग्न
आस्ताद काळे आणि स्वप्ना पाटील हे गेले अनेक वर्ष एकमेकांना ओळखत असून आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. स्वप्नादेखील अभिनेत्री असून तिने आस्तादला नेहमीच प्रोत्साहन देत आयुष्यात खूपच साथ दिली आहे असं आस्तादने वेळोवेळी सांगितल्याचे दिसून येते. आस्ताद आणि स्वप्नालीची केळवण नुकतीच त्यांच्या मित्रमैत्रिणींनी केली. केळवणाचा पदार्थ अर्थात त्यांच्या आवडीचाच बनविण्यात आला होता. या केळवणीचे फोटो अभिनेत्री मेघा धाडेने शेअर केल्यानंतर खूपच व्हायरल झाले आहेत. या फोटोनंतरच आस्तादच्या चाहत्यांना आस्ताद लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे कळले आहे. मात्र आस्ताद आणि स्वप्नालीने अजून कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत. पण आता मेघामुळे मात्र आस्ताद आणि स्वप्नाही लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची आनंदाची बातमी सर्वांना कळली आहे. आस्तादचे चाहते अत्यंत आनंदी असून मेघाच्या या पोस्टवर सर्वांनीच लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आस्ताद आणि स्वप्नाच्या केळवणीचे हे खास फोटो तुमच्यासाठी.
दगडूची प्राजू झाली बोल्ड, केतकी माटेगावकरचा बोल्ड लुक व्हायरल
आस्ताद आणि स्वप्नालीची लव्ह स्टोरी
आस्ताद आणि स्वप्नाने एका मालिकेमध्ये सुरूवातीला भाऊ – बहिणीची भूमिका साकारली होती. मात्र चार पाच वर्षांनंतर दोघांनी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत एकत्र काम केले. या मालिकेच्या सेटवरच दोघांमध्ये खूप घनिष्ठ मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या दोघांनी आपलं नातं कधीही लपवून ठेवलं नाही. तर सोशल मीडियावरही दोघे नेहमीच एकमेकांसह फोटो पोस्ट करत असतात. आता लवकरच दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे दोघांचेही चाहते अत्यंत आनंदी आहेत.
सैफ अली खानची ‘तांडव’ वादाच्या भोवऱ्यात
चंद्र आहे साक्षीला मालिकेतून लवकरच भेटीला
आस्ताद काही महिन्यांपूर्वीच एका गाण्याच्या रियालिटी शो मध्ये दिसला होता. तर काही दिवसांपूर्वीच आस्तादने आपल्याकडे काम नसून कोणी काम देऊ इच्छित असेल तर त्यांनी काम द्यावे अशी सोशल मीडियावर मागणी केल्यानेही आस्तादचे सर्वांनी कौतुक केले होते. दरम्यान आस्ताद आता लवकरच ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर असून आस्ताद यामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. पुन्हा एकदा लहान पडद्यावर आस्तादला बघून नक्कीच त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तर आता आस्ताद आणि स्वप्नालीच्या लग्नाची नक्की कोणती तारीख आहे याचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र ही तारीख अजूनही घोषित करण्यात आलेली नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक