सैराटमधील परश्या आता असा तसा राहिला नाही. त्याने त्याच्यामध्ये अनेक बदल केले आहेत. त्याचे त्याच्या शरीरावर म्हणजे बॉडीवर किंवा पिळदार शरीरावर किती प्रेम आहे ते आपण जाणतो. कारण त्याचे जीम व्हिडिओ आणि त्याचा फिटनेस त्याच्या अकाऊंटवरुन सतत पाहायला मिळतात. चित्रपटांमधून झळकलेला आकाश खऱ्या आयुष्यात काय करतो हे पाहायलाही खूप जणांना आवडते. आकाश एकदम अस्सल मराठी मातीतला आहे हे त्याने त्याच्या एका नव्या व्हिडिओतून दाखवून दिले आहे. इतरवेळी जीममध्ये राबणारा आकाश शेतातही राबतो हे त्याच्या एका नव्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
शेतीची आहे आवड
लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी घरी राहून शेतीचा अवलंब केला होता.अनेकांनी आपल्या घरातील कुंड्यांमध्ये शेती केली होती. पण आता पूर्ववत झाल्यानंतर सगळे आपल्या कामाला लागले आहेत. पण शूट करुन आपली काम करुन आकाश ठोसर शेती देखील करत आहे. त्याने त्याचे काही व्हिडिओ शेअर केले होते. त्यामध्ये तो नारळाच्या बागेत नारळ काढताना दिसत आहे. या व्हिडिओत तो नारळ काढत आहे शिवाय तो सराईतपणे नारळ सोलतानादेखील दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओला खूप जणांनी लाईक देखील केले आहे.
फिटनेसवर देतो विशेष लक्ष
सैराट फेम आकाश ठोसर याला फिटनेसची विशेष आवड आहे हे आपण सगळेच जाणतो. तो आधी कुस्तीपटू होता. खास चित्रपटासाठी त्याने आपले वजन कमी केले. चित्रपटानंतर त्याने पुन्हा एकदा कंबर कसली आणि आपली बॉडी परत कमावली. आताही तो त्याचा जास्त वेळ जीममध्ये घालवतो असेच दिसते. आता तो तसा परश्या नाही तर हॉट दिसतो. त्याने त्याच्या लुकवर बरेच काम केलेले दिसत आहे. एक अभिनेता म्हणून तो त्याच्यामध्ये अनेक बदल करताना दिसतो. जे चांगल्या कलाकाराचे लक्षण आहे.
झुंड चित्रपटात दिसला ग्रे शेडमध्ये
आकाशचा चेहरा पाहता तो कधी आपल्याला ग्रे शेडमध्ये पाहायला मिळेल असे वाटले नव्हते. पण त्याने नागराज मंजुळे याच्या मोस्ट अवेटेड अशा ‘झुंड’ चित्रपटात काम केले आहे. त्यात त्याने साकारलेली भूमिका थोडी वेगळी होती. यावेळी तो एका गुंड्याच्या भूमिकेत दिसला. फार मोठा गुंड नाही. पण एक हँडसम पण तितकाच गर्विष्ठ असे पात्र त्याने साकारले आहे. त्याचे पात्र पाहून पहिल्यांदा सगळ्यांना धक्काच बसला. पण त्याला जी भूमिका मिळाली त्याने ती उत्तम वठवली आहे.
पुढील प्रोजेक्टची प्रतिक्षा
मराठीत अनेक कलाकार असतील. पण हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काहीच कलाकारांनी आपला फिटनेस चांगला राखला आहे. त्यापैकी एक आहे. आकाश ठोसर. त्याच्याकडून अनेक चांगल्या प्रोजेक्ट आणि कामाची अपेक्षा आहे. एका मोठ्या चित्रपटात काम केल्यानंतर आणि काही सीरिजमधून झळकल्यानंतर त्याला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे.
दरम्यान तुम्ही अद्याप आकाशचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पाहायला हवा.