‘शक्ती – अस्तित्व एहसास की’ (Shakti – Astitva Ehsaas Ki) या मालिकेत काम करणारा आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये वेगळा ठसा उमटवणारा अभिनेता अनिरूद्ध दवे (Aniruddh Dave) गेले 22 दिवस कोरोनाशी लढत आहे. 23 एप्रिलला अनिरूद्ध भोपाळमध्ये चित्रीकरण करत असताना रूग्णालयात दाखल झाला. आठवड्यानंतर त्याची तब्बेत अधिक खालावली आणि त्याला आयसीयूमध्ये हलविण्यात आले. त्याची कंडिशन अत्यंत खराब असल्याचे आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा अशी पोस्ट त्याच्या बायकोने त्यावेळी शेअर केली होती. केवळ 2 महिन्याचं लहान बाळ आणि अनिरूद्धची अशी परिस्थिती यामध्ये आपली फारच त्रासदायक परिस्थिती असल्याचंही तिने नमूद केलं होतं. अनिरूद्धने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचे अनेक चाहतेही आहेत. आता 22 दिवसांनंतर अनिरूद्धने स्वतः एक भावूक पोस्ट केल्याने त्याचे चाहतेही खूपच भावूक झाले आहेत. अजूनही त्याच्या फुफुस्सांमध्ये 85 टक्के इन्फेक्शन असून ऑक्सिजनची पातळी खालावलेली आहे. अनिरूद्धचे चाहते आणि कुटुंबीय त्याच्या उत्तम आरोग्यासाठी अविरत प्रार्थना करत आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणतेय…क्या पता कल हो ना हो!!!
अनिरूद्धने दिली तब्बेतीची माहिती
इतक्या दिवसांनंतर स्वतः अनिरूद्धने तब्बेतीची माहिती दिली आहे. अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत अनिरूद्धने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच अनिरूद्धच्या घरी एक लहानसा पाहुणा आलाय. आपल्या मुलासोबतचा एक गोड फोटो शेअर करत अनिरूद्धने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आभार, खरं तर हा शब्द खूपच लहान आहे. गेल्या 22 दिवसांपासून रूग्णालयाच्या बेडवर तुम्हाला सर्वांचे प्रेम, आशिर्वाद आणि प्रार्थना या सगळ्याचा अनुभव घेत आहे. सतत ऑक्सिजन सपोर्टवर आहे. पण मला जी काही हिंमत मिळाली आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मिळाली आहे. अरे खूपच मोठी उधारी झाली आहे माझ्यावर आता या प्रेमामुळे….14 दिवसांनंतर आता आयसीयूच्या बाहेर आलो आहे. थोडं बरं वाटतं आहे. 85% इन्फेक्शन अजूनही फुफ्फुस्सांमध्ये आहे. वेळ लागेल. काहीही घा नाही. पण मला आता स्वतःला श्वास घ्यायचा आहे…लवकरच भेटू…भावनिक झाल्यावर माझं सॅच्युरेशन डाऊन होतं…मॉनिटरमध्ये दिसत आहे मला….लवकरच सर्व ठीक आहे मला माहीत आहे…22 वा दिवस…सर्वांसाठी प्रार्थना करा…जय परम शक्ति…खूप खूप प्रेम’. अनिरूद्धच्या या पोस्टनंतर तो लवकरच बरा होईल असा विश्वास त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सद्वारे दर्शवला आहे. अनिरूद्धच्या तब्बेतीसाठी सगळेच प्रार्थना करत आहेत.
राखी सावंतचा कांगावा, तौक्ते वादळामुळे तुटली घराची बाल्कनी
सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींनीही केल्या कमेंट्स
अनिरूद्ध गेले अनेक वर्षे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. भावूक पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींनी त्याच्यासाठी प्रार्थना करत लवकरच बरा होशील असं म्हटलं आहे. अभिनेता नकुल मेहता म्हणाला, ‘तुझ्यासाठी रोज प्रार्थना करत आहे’, तर मोहित सेहगलने ‘सर्व काही ठीक होईल भावा, रोज तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत’ असं सांगितलं. ‘तुला बरं वाटत आहे हे वाचून बरं वाटलं’ असं अभिनेता हिमांशु मल्होत्राने कमेंट केली आहे, तर अभिनेत्री अदा खानने आभार मानले आहे. रूसलान मुमताझने ‘लवकर घरी ये’ अशी कमेंट केली असून ‘हे वाचून खूप आनंद झालाय आणि तुला खूप खूप शक्ती मिळो’ अशी प्रार्थना केली आहे. शशांकव्यासने अनिरूद्धला सुपरमॅन म्हटलं असून नकुलची पत्नी आणि गायिका जानकीने त्याला कमेंटमध्ये ‘लढाऊ योद्धा. आम्ही तुझ्यासाठी रोज प्रार्थना करत आहोत’ असं म्हटलं आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी त्याला लवकर घरी ये वाट पाहत आहोत असंही म्हटलं आहे.
मेकर्सना टॅलेंटपेक्षा गरिबीचे प्रदर्शन दाखवायला आवडते, गायक अभिजीत सावंतचा खुलासा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक