Advertisement

मनोरंजन

10 जणांच्या उपस्थितीत अभिनेता अंकित गेराने उरकले गुपचूप लग्न

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jun 8, 2021
10 जणांच्या उपस्थितीत अभिनेता अंकित गेराने उरकले गुपचूप लग्न

गेले एक दशक टीव्हीवरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवणारा अभिनेता अंकित गेरा (Ankit Gera) विवाहबंधनात अडकला आहे. अचानक लग्नाचे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच सुखद धक्का बसला आहे. त्यातही त्याने अरेंज मॅरेज केल्यामुळे अधिक आश्चर्य वाटत आहे. कारण अभिनेत्री रूपल त्यागी आणि अभिनेत्री अदा खान या दोघींनाही अंकितने डेट केले होते आणि डबल डेटमुळे अंकितबरोबर  दोघींनीही ब्रेकअप केले होते. सध्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सिक्रेट वेडिंग (secret weddding) चालू असल्यासारखे वाटत आहे. लॉकडाऊन काळात अनेकांनी लग्न करून धक्के दिले आहेत. नुकतंच यामी गौतम (Yami Gautam) आणि आदित्य धारने (Aditya Dhar) लग्नाचे फोटो शेअर केले तर लागोपाठ अभिनेत्री एव्हलिन शर्मानेही (Evelyn Sharma लग्न केल्याचे जाहीर केले आहे. आता अभिनेता अंकित गेराचे फोटो समोर आले असून नायजेरियन असणाऱ्या राशी पुरीशी अंकितने लग्नगाठ बांधली आहे. 

केवळ 10 लोकांच्या उपस्थितीत केले लग्न

अंकित आणि राशीचे लग्न हे केवळ दहा जणांच्या उपस्थितीत चंदीगढ येथे झाले आहे. राशी पुरी हे नायजेरियन असून दोघांनीही अरेंज मॅरेज अर्थात घरच्या व्यक्तींच्या पसंतीने लग्न केले आहे. 5 जून रोजी अंकित लग्नबंधनात अडकला आहे. दोघेही फॅमिली फ्रेंड्स असून अंकितने एका मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केले आहे. आमचे आईवडील आमच्यासाठी चांगला जोडीदार शोधत होते. तेव्हाच त्यांना आम्ही एकमेकांशी बोलून लग्नाचा निर्णय घ्यावा असे वाटले आणि त्यांनी तसा प्रस्ताव आमच्यासमोर दिला असे अंकितने सांगितले आहे. एप्रिल महिन्यात आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो आणि हळूहळू आम्ही एकमेकांना आवडू लागलो आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. तीन आठवड्यांपूर्वी राशी भेटायला भारतात आली. वास्तविक हा खूपच कमी काळ आहे. पण आम्ही एकमेकांना व्यवस्थित समजून घेऊ लागलो असल्यानेच लग्नाचा निर्णय घेतला असंही अंकितने सांगितले आहे. 

रिंकू राजगुरुच्या फिटनेसचे फोटो होतायत व्हायरल, असा झालाय बदल

लॉकडाऊन लग्न करण्याचा अंकितचा निर्णय

अंकितला खूप मोठे लग्न करायचे नव्हते. कुटुंबाने डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अंकितने लॉकडाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. अंकित अभिनेता आहे याबाबत राशीला अजिबात माहीत नव्हते. त्यामुळे अंकितच्या स्वभावामुळे राशीने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अंकितने सांगितले. राशीच्या याच स्वभावामुळे अंकितला राशी आवडली आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यातच त्यांनी एकमेकांना आयुष्याचे जोडीदार म्हणून निवडले आणि विवाहबद्ध झाले. त्यामुळे त्यांचे कुटुंबही आनंदी आहे. नुकताच अंकित ‘छोटी सरदारनी’ या मालिकेत दिसला होता. तर याआधी मन की आवाज प्रतिज्ञा, सपने सुहाने लडकपन के, संतोषी माँ, अग्नीफेरा अशा अनेक मालिकांमध्ये अंकितने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तर बिग बॉसच्या 9 व्या सीझनमध्येही अंकित सहभागी झाला होता. यावेळी अभिनेत्री सारा खानबरोबर अंकितचे नाव जोडण्यात आले होते. मात्र सारा आणि अंकितने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता. आता त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षावर करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

पहिल्यांदाच एकत्र काम करणार सारा अली खान आणि अमृता सिंह, फोटो झाले व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक