ADVERTISEMENT
home / मनोरंजन
भाऊ कदमची मुलगी दिसते खूपच सुंदर

भाऊ कदमची मुलगी दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

अभिनेता भाऊ कदम हा त्याच्या विनोदामुळे अनेकांच्या मनावर राज्य करतो. ज्या स्किटमध्ये भाऊ कदम असेल ते स्किट एकदम दमदार असेल यात काहीही शंका नाही. कोणताही विशेष चेहरा आणि चित्रपटात हवी असलेली बॉडी नसतानाही तो आता अनेकांच्या लाडक्या अभिनेत्याच्या यादीमध्ये आहे. भाऊ कदमने त्याचे कुटुंब अनेकदा दाखवले आहे. त्याची मोठी मुलगी टीनएजर असून ती सुंदर दिसते असे अनेकदा दिसून आले होते. पण आता सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा तिच्यावर खिळल्या आहेत. याचे कारणही तसेच आहे कारण भाऊ कदमच्या मुलीचे फोटो सध्या सगळ्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंना अनेकांकडून पसंती मिळत आहे. तिचे फोटो आहेतच इतके ग्लॅमरस 

कोण आहे भाऊ कदमची मुलगी? 

मृण्मयी कदम

भाऊ कदमची मुलगी इतकी सुंदर आहे की, तिचा फॅन फॉलोविंग आतापासूनच चांगला आहे. भाऊ कदमच्या मुलीचे नाव मृण्मयी कदम असून तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे. भाऊ कदमसोबत एका शोमध्ये ती आली होती. त्यावेळीच अनेकांना तिच्यातील स्पार्क दिसला होता. मृण्मयी कदम ही तिच्या सोशल मीडियावर खूपच जास्त ॲक्टिव्ह असते. ती तिचे फोटोज सतत टाकत असते. तिच्या फोटोजमध्ये ती इतकी ग्लॅमरस दिसते की, त्यामध्ये ती लकरच चित्रपटात दिसेल असे दिसून येत आहे. सध्या मृण्मयीचे स्वत:चे युट्युब चॅनेल असून त्यावर ती सतत व्हिडिओज पोस्ट करत असते. त्यावरही तिचे हजारांच्या घरात फॉलोवर्स आहे. त्यामुळे ती तिची ओळख निर्माण करण्याचा खूप चांगला प्रयत्न करताना दिसत आहे. 

फॅशनची आहे विशेष आवड

मृण्मयीला फॅशनची विशेष आवडत असून तिने तिच्या पोस्टमध्ये अनेक फॅशनेबल फोटोज शेअर केलेले आहे. तिने सध्याच्या काळातील फॅशन कॅरी केली असून ती या फोटोजमध्ये खूप सुंदर दिसत आहे. शेवटी सध्याच्या अभिनेत्रींप्रमाणे ती बारीक नसली तरी तिच्या ओव्हरसाईज फॅशनलुकमध्येतू खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या पोस्ट स्क्रोल केल्यानंतर ती खरंच टॅलेंडेंट आहे याचा अंदाज येतो.  भाऊची ही डस्की ब्युटी मुलगी लवकरच अनेकांच्या मनाचा ठाव घेईल यात काही शंका नाही. पण इतकेच नाही तर आपल्या मेहनतीने केले जाणारे प्रयत्न हे देखील वाखाणण्यासारखे आहे. 

ब्युटीचीही आहे आवड

भाऊच्या मुलीला नुसती फॅशनचीच आवड नाही तर तिला ब्युटी हॅक्सही ट्राय करायला आवडतात. ती अनेक ब्युटी हॅक्स ट्राय करत असते. तिचा मेकअप हा नेहमीच परफेक्ट असतो. जो तिला चांगलाच शोभून दिसतो. अनेक ऑनलाईन हॅक तिने ट्राय केलेले आहेत. जे नक्कीच अनेकांना आवडणारे असे आहेत. तिने तिच्या मेकअपचेही अनेक फोटो आतापर्यंत शेअर केले आहेत. 

ADVERTISEMENT

भाऊच्या या सुंदर मुलीबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. 

31 Jul 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT