भूषण प्रधान हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला आणि चाहत्यांना नक्कीच नवीन नाही. भूषण नेहमीच आपल्या सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो पोस्ट करत असतो. पण नुकतेच भूषणने (Bhushan Pradhan) शॉवरखाली भिजलेले फोटो शेअर केले आहेत. भूषणच्या या हॉट आणि सेक्सी (Hot and Sexy) फोटोंमुळे त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचा विशेषतः मुलींच्या कमेंट्सचा अधिक वर्षाव होताना दिसून येत आहे. अनेक मुली त्याच्याकडून त्याचा अगदी मोबाईल नंबरही मागताना दिसून येत आहेत. हँडसम हंक (Handsome Hunk) असा भूषण या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून त्याने कमावलेली शरीरयष्टीही अत्यंत मादक आणि अप्रतिम दिसत आहे. भूषणचे हे फोटोशूट शुभम पानसेने केले आहे. तर या तिन्ही फोटोंना भूषणने अत्यंत माफक आणि सुंदर कॅप्शन दिल्या आहेत.
#KKK11 प्रेक्षकांना खिळवून ठेवायला तयार, राहुल वैद्यचा पहिला प्रोमो
लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
भूषण प्रधानचा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. विशेषतः त्याच्या हास्यावर अनेक तरूणी फिदा असल्याचे नेहमीच दिसून येते. तर भूषण नेहमीच डाएट फॉलो करताना आणि आपल्या व्यायामाचे फोटोही पोस्ट करत असतो. नुकत्याच केलेल्या फोटोशूटनंतर अनेक तरूणींच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसून येत आहे. या फोटोंनी सोशल मीडियावर आगच लावली आहे. अनेक तरूणींनी भूषणकडून त्याचा मोबाईल नंबर मागविला आहे. तर त्याने दिलेल्या कॅप्शन्स या अत्यंत सुंदर असून तो खूपच सुंदर दिसत आहे असंही सांगितलं आहे. भूषणने एका फोटोला कॅप्शन देत म्हटले आहे की, ‘आंघोळ म्हणजे 2% गाणे, 8% स्वच्छता आणि 90% आयुष्यातील निर्णय!’ तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन दिले आहे, ‘वूश! ताण, तणाव आणि सर्व नकारात्मक विचारांना धुऊन टाकत आहे! भीती, राग, ताण या सगळ्यापासून दूर’. अनेकांनी या कॅप्शनही खूपच आवडल्या आहेत.
अनेक चाहत्यांनी त्याच्या हा फोटोला आगीचा इमोजी देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तर काही जणींनी भूषणला हॉटी असंही म्हटलं आहे. एकंदरीतच शॉवरखाली भिजलेल्या या फोटोंनी एक वेगळीच आग भूषणने सोशल मीडियावर लावलेली दिसून येत आहे. तर एका चाहतीने ‘हॉटनेस ओव्हरफ्लोईंग’ अशी कमेंट दिली आहे. याशिवाय भूषणची जवळची मैत्रीण असणाऱ्या प्रार्थना बेहेरेनेही त्याला ‘उफ हॉटी’ अशी कमेंट दिली आहे.
साथ निभाना साथिया फेम ‘ही’ अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई
भूषण नेहमीच करतो व्यायामाचे व्हिडिओ शेअर
मराठी अभिनेत्यांपैकी भूषण प्रधान हा नेहमी आपल्या शरीराकडे आणि व्यायामाकडे अत्यंत बारकाईने लक्ष देताना दिसतो. तसंच आपल्या सोशल मीडियावरही तो आपल्या वर्कआऊटचे आणि व्यायामाचे तसंच डाएटचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असाताना दिसून येतो. इतकंच नाही तर भूषण स्वतः जेवण बनवतो आणि त्याचेही फोटो शेअर करत असतो. भूषणवर अनेक तरूणी फिदा आहेत. भूषणकडून एक रिप्लाय मिळावा यासाठी त्याच्या सोशल मीडियावर खूपच कमेंट्स दिसून येतात. आता तर हे फोटोशूट करून भूषणने अनेकांचे लक्ष अधिक वेधून घेतलं असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान सर्व कमेंट्सच्या वर्षावात भूषणसाठी अनेक तरूणींनी मेसेज केल्याचेही दिसून येत आहे.
Bigg Boss फेम निकी तांबोळीचे एका मागोमाग म्युझिक अल्बम रिलीज
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक