बॉलीवूड अभिनेता दिलीप कुमार यांचे आज (बुधवार, 7 जुलै, 2021) सकाळी 7.30 वाजता निधन (Dilip Kumar Death) झाले आहे. 29 जून रोजी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. गेले अनेक वर्ष दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये चढउतार होते. पण त्यांच्या तब्बेतची काळजी त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानू (Saira Bano) या नेहमी घेत होत्या. तसंच दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना त्या नेहमी त्यांच्या तब्बेविषयी माहितीही देत होत्या. बॉलीवूडचा महानायक गमावल्याचं दुःख सर्वांनाच झाले आहे. दिलीप कुमार गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. मात्र त्यांनी आज अखेरचा श्वास घेऊन सर्वच चाहत्यांना निराश केले आहे.
आणखी एक स्टार किड पदार्पणाच्या मार्गावर, आहे या ज्येष्ठ अभिनेत्याचा नातू
महानायक गमावला
With a heavy heart and profound grief, I announce the passing away of our beloved Dilip Saab, few minutes ago.
We are from God and to Him we return. – Faisal Farooqui
— Dilip Kumar (@TheDilipKumar) July 7, 2021
दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे कौटुंबिक मित्र फैजल फारूखी यांनी ट्विट करून दिले आहे. ‘सांगण्यात अतीव खेद होत आहे की, दिलीप साहेब आपल्यामध्ये आता राहिले नाहीत’ अशा स्वरूपात त्यांनी दिलीप साहेब यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले आहे. ही बातमी मिळताच बॉलीवूडवर शोककळा पसरली असून सर्वांनीच दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरूवात केली आहे. संपूर्ण बॉलीवूड सध्या दुःखी आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासह होत्या. तर दिलीप कुमार यांच्या तब्बेतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे चाहते सतत प्रार्थनाही करत होते.
संस्कृती बालगुडे ठरली डिजीटल इन्फ्लुएन्सर, अभिमानाची बाब
इंडस्ट्रीतील सर्वात पहिला खान
दिलीप कुमार यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान (Mohammad Yusuf Khan) होते. त्यांचा जन्म 11 डिसेंबर, 1922 रोजी झाला होता. बॉलीवूडमध्ये अनेक खान राज्य करतात. तर सर्वात पहिले खान (The First Khan) अशीही दिलीप कुमार यांची ओळख होती. हिंदी सिनेमामध्ये मेथड अॅक्टिंगचे क्रेडिट हे दिलीप कुमार यांना जाते. तर महानायक अशी उपाधीही त्यांना देण्यात आली होती. दिलीप कुमार यांचा अभिनय म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणे असंच म्हटलं जायचे.
आपल्या करिअरची सुरूवात 1944 मध्ये ज्वार भाटा या चित्रपटापासून त्यांनी केली. पाच दशके चित्रपटसृष्टीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर दिलीप कुमार यांनी राज्य केले आहे. 65 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. तर अगदी नव्या पिढीसाठीही दिलीप कुमार हे प्रेरणा ठरले आहेत. अंदाज, आन, दाग, देवदास, आजाद, मुगल ए आझम, गंगा जमुना, राम और शाम अशा चित्रपटांनी त्यांना इंडस्ट्रीतील पहिल्या क्रमांकाचा हिरो बनवले. 1976 मध्ये त्यानी पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि पुन्हा त्याच जोमाने 1981 मध्ये क्रांती चित्रपटातून आपलं अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर शक्ति, मशाल, कर्मा, सौदागर असे तुफान चित्रपट दिले. किला 1998 मध्ये आलेला चित्रपट हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
संजय लीला भन्सालीच्या ‘हीरा मंडी’त झळकणार सोनाक्षी सिन्हा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक