अभिनेता-दिग्दर्शक-गायक अशा सर्व आघाड्यांवर काम करणारा ऑल राऊंडर असा फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लवकरच आपली गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हिच्यासह 21 फेब्रुवारीला लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. फरहान – शिबानीच्या लग्नाचे सेलिब्रेशन मॉरिशसला होणार असंही म्हटलं जात आहे. दरम्यान फरहानचे वडील प्रसिद्ध गीतकार-लेखक जावेद अख्तर () यांनी मुंबईतील कोर्टात फरहान – शिबानी 21 फेब्रुवारीला विवाहबद्ध होणार यावर शिक्कामोर्तब केले आहे. कोर्ट मॅरेजनंतर एक लहानसे सेलिब्रेशन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
अधिक वाचा – आईच्या मांडीवर स्वर्गाची अनुभूती, सलमान खान झाला भावुक
लग्नाबाबत आहेत फरहान – शिबानीचे प्लॅन्स
एका वृत्तानुसार, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने अजूनही कोणते फायनल डेस्टिनेशन ठरवलेले नाही. पण लग्नाबाबत दोघांचे काही प्लॅन्स आहेत. फरहानचे हे दुसरे लग्न असले तरीही शिबानीचे हे पहिले लग्न आहे. मुंबई, लोणावळा अथवा मॉरिशस या तीन ठिकाणांपैकी अजूनही कोणते ठिकाण ठरलेले नाही. तर लग्नाबाबत जावेद अख्तर यांच्या सांगण्यानुसार खंडाळास्थित त्यांचे फार्महाऊस ‘सुकून’ येथे एक लहानसा सोहळा होणार आहे. लग्नाची तयारी वेडिंग प्लॅनर करत असून कोरोनामुळे अत्यंत छोटेखानी सोहळा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. अजून कोणालाही आमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. तर शिबानीच्या बाबतीत ती अत्यंत चांगली मुलगी असून घरात सगळ्यांनाच आवडते असंही आवर्जून जावेद अख्तर यांनी सांगितले आहे. तर फरहान आणि शिबानी एकमेकांना अनेक वर्ष ओळखत असून एकमेकांची आवड समान आहे यापेक्षा चांगलं काय असणार असंही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा – गायिका आर्या आंबेकरने यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ची घेतली जबाबदारी
4 वर्षांपासून नात्यात
फरहान आणि शिबानी हे गेल्या 4 वर्षांपासून नात्यात आहेत. त्याशिवाय ते दोघेही लिव्ह इन मध्ये राहात असून दोघांनही दोन पाळीव प्राणीदेखील सांभाळले आहेत. 2018 मध्ये दोघांनीही आपले एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले होते. त्याआधी काही महिने दोघांनीही नात्यावर न बोलणे पसंत केले होते. दरम्यान एका वृत्तानुसार फरहान आणि शिबानीदेखील अन्य सेलिब्रिटींप्रमाणेच सब्यासाची (Sabyasachi) आऊटफिट घालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही अन्य तपशिलाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र या दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत. फरहानचे पहिले लग्न हे हेअरस्टायलिस्ट अधुनासह (Adhuna) झाले असून दोघांनाही दोन मुली आहेत.
अधिक वाचा – प्रभास, दीपिका पदुकोण व नाग अश्विनच्या प्रोजेक्ट के चित्रपटाच्या दुसऱ्या टप्प्याचे शूटिंग सुरु
फरहानचे प्रोजेक्ट्स
फरहान नुकताच ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित झालेल्या ‘तुफान’ या चित्रपटात दिसला होता. तर आता ‘जी ले जरा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून फरहान प्रेक्षकांसमोर येत आहे. यामध्ये कतरिना कैफ (Katrina Kaif), प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra) आणि आलिया भट (Alia Bhatt) ही तिगडी दिसणार आहे. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. दरम्यान आता चाहते फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या क्षणाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याशिवाय यांच्या लग्नाचे सेलिब्रेशन कुठे होणार यासाठीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक