ADVERTISEMENT
home / मनोरंजन
हेमंत ढोमे

या अभिनेत्याला व्हायचे आहे रस्ते कॉन्ट्रॅक्टर,भन्नाट पोस्ट होतेय व्हायरल

 रस्ते आणि त्यांची झालेली चाळण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही यातून रोज जावे लागत आहे. त्यात सेलिब्रिटी ते तरी काय वेगळे. रस्त्यांवरुन गाड्या नेताना खूप जणांना असा काही अनुभव आला आहे की, त्यावर अनेकांनी गाणी केली आहेत. पण आता एका अभिनेत्याला रस्त्यांची दुर्दशा पाहता कॉन्ट्रॅक्टर व्हायचे आहे. अशा संदर्भातील एक पोस्टही या अभिनेत्याने केली आहे आणि आता ती तुफान व्हायरल होऊ लागली आहे. हा अभिनेता आणखी कोणी नसून विनोदी अभिनेता हेमंत ढोमे आहे. त्याने नेमकी कोणती पोस्ट लिहिली ते जाणून घेऊया.

कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, पावसाळा आल्यानंतर रस्त्याच्य दुर्दशेबद्दल अनेक ठिकाणी अगदी आवर्जून बोलले जाते. कलाकारही अनेकदा या कामांबद्दल बोलतात. रस्त्यांची झालेली दुर्दशा आता तरी नीट होईल का? असे प्रश्न करतात. अनेकदा आंदोलने देखील केली जातात. पण आता या सगळ्याचा काहीच परिणाम होत नाही हे बहुतेक अभिनेता हेमंत ढोमेला कळून चुकले आहे. त्यामुळेच की काय त्यालाही रस्ते कॉन्ट्रॅक्टर व्हायचे आहे. त्या संदर्भातच त्याने एक ट्विट केले आहे त्याने लिहिले आहे की,
अतिशय प्रामाणिकपणे सांगतोय.. प्रंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार,नगरसेवक सगळे नंतर !!! खरे कॉन्ट्रॅक्टर, रस्ते साफसफाई करण्यात त्यांना जी साफसफाई  त्यांनाच जमते ना, कमाल ना त्यांना कोणीच बदलू शकत नाही! ते भारी आहेत ना! सगळ्यांना रस्ता लावतात! पुढचा जन्म रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा मिळू दे रे बाबा! अशी पोस्ट लिहिली आहे जी चांगलीच व्हायरल झाली आहे.

 पोस्ट होतेय व्हायरल

हेमंत ढोमेने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काहीच तासात चांगला हशा पिकला. लोकांना विचार करायला लावणारी अशी ही पोस्ट ही त्याने शेअऱ केली आहे. रस्त्यासाठी काम करणाऱ्या लोकांनी याची किमान लाज बाळगायला हवी. कारण देशातील प्रत्येक नागरिक हा या साध्या सोयी सुविधा मिळवण्यासाठी आपले पैसे टॅक्सच्या रुपात भरत असतो.  अशावेळी चांगली सुविधा मिळणे गरजेचे असते. असे असतानाही कोणालाही  या सोयी सुविधा मिळत नाही. रस्ता बनवण्याचे काम करणारी व्यक्ती पैसा खाते पण रस्ता योग्य बनवत नाही. त्यामुळेच रस्ते अपघात वाढू लागले आहेत. अनेकांनी आपले प्राण या खड्यांमुळे गमावले आहेत. लोकांना हेमंतची ही पोस्ट खूप जास्त भावली असावी. त्यामुळेच ती मोठ्याप्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे.

खतरों के खिलाडी 11′ च्या विजेत्याचे नाव झाले लीक, सोशल मीडियावर चर्चा

ADVERTISEMENT

 विनोदी अभिनेता

 हेमंत ढोमे हा विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे.  त्याने अनेक विनोदी चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. विनोदी कामांमध्ये त्याचा हात कोणीच धरु शकत नाही. पण त्याची काम ही कायम वाखाणण्यासारखी असतात. तो जसा विनोदी अभिनेता आहे तितकाच चांगला अभिनेता आहे. 

तुम्हाला पटला का हेमंतचा मुद्दा

लवकरच करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ अभिनेता अडकणार लग्नबंधनात

23 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT