काही वेळा एखाद्याचा मृत्यू आपल्या मनाला चटका लावून जातो. असंच झालं एका टीव्ही अभिनेत्याबाबात. तो अभिनेता म्हणजे टीव्हीवरील एक हसरा चेहरा कुशल पंजाबी. धक्कादायक गोष्ट आहे की, टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीने आत्महत्त्या केल्याचं समोर आलं आहे. 26 डिसेंबरच्या रात्री कुशल पंजाबीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. कुशल पंजाबीचं वय अवघं 37 वर्ष होतं. त्याच्या या अकस्मात निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील सेलेब्स आणि त्याच्या फॅन्सना धक्का बसला आहे. 27 डिसेंबरला दुपारी कुशलवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
करणवीर बोहराने शेयर केली ही शॉकींग न्यूज
कुशल पंजाबीच्या निधनाची शॉकींग बातमी अभिनेता करणवीर बोहराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पहिल्यांदा शेअर केली. कुशल आणि करणवीर हे खूप चांगले मित्र होते. करणवीर बोहराने कुशल पंजाबीचा फोटो शेअर करत इमोशनल पोस्टसुद्धा लिहीली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ”तुझ्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. मलाही बातमी खरीच वाटत नाहीयं. पण मला माहीत आहे की, तू जिकडे असशील तिकडे खूष असशील. तू ज्या पद्धतीने तुझं आयुष्य जगला आहेस त्याने मला कितीतरी वेळा प्रेरणा मिळाली आहे. पण मला काय माहीत होतं की,”
”डान्सिंग, फिटनेस, ऑफ-रोड बाईकिंग, फादरहूड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझा हसता चेहरा, आनंदी स्वभाव आणि उत्साह… मी खूप मिस करेन. तुला मी नेहमी एका अशा व्यक्तीच्या रूपात आठवेन जिने आपलं संपूर्ण आयुष्य जगलं आहे.”
कुशलचा करिअर ग्राफ
कुशल पंजाबीची इश्क में मरजावां ही मालिका शेवटची मालिका ठरली. कुशल पंजाबीच्या खाजगी आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास त्याने एका युरोपियन मुलीशा लग्न केलं आहे व त्यांना एक मुलगाही आहे. ज्याचा जन्म 2016 साली झाला. कुशलने आपल्या करिअरची सुरूवात एक मॉडेल म्हणून केली. तो अनेक मोठ्या चित्रपटांचा आणि टीव्ही शोजचा भाग राहिला आहे. त्याने आत्तापर्यंत बॉलीवूडमधील सलमान खानपासून ते अक्षयकुमारपर्यंत सर्व अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. तो गेल्या दोन दशकांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. 1995 साली डीडी मेट्रोवरील ‘ए माउथफुल ऑफ स्काय’ या मालिकेपासून त्याने टीव्ही करियरला सुरूवात केली. त्यानंतर त्याने ‘लव मॅरेज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोअर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’ आणि ‘इश्क में मरजावां’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं. तर चित्रपटांबाबत बोलायचं झाल्यास त्याने अक्षय कुमारसोबत अंदाज, फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या लक्ष्य आणि अजय देवगणसोबत काल तर सलमान खानसोबत सलाम-ए-इश्क आणि दना दन दन गोल सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
POPxo मराठीकडून कुशल पंजाबीला भावपूर्ण श्रद्धांजली.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.