home / मनोरंजन
समँथा आणि नागाचैतन्य

नागाचैतन्य आणि समांथामधील वाद मिटवण्याचा नागार्जुन करत आहेत प्रयत्न

सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ते म्हणजे नागाचैतन्य आणि समँथा यांच्यामध्ये आलेल्या तफावतीची. सगळ्या साऊथ इंडस्ट्रीमध्ये ही चर्चा रंगली आहे. पण या दोघांनी प्रत्यक्ष येऊन याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण त्यांच्या नात्यामध्ये नेमके काय सुरु आहे ? याची माहिती मिळावी यासाठी सगळे जण नागार्जुन यांना प्रश्न विचारत आहे. आता नागार्जुन यांनी मीडियाने विचारलेल्या काही प्रश्नांची अशी काही उत्तरे दिली आहेत की त्यामुळे यांच्या नात्यात नक्कीच काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली आहे. नागार्जुन नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊया

युट्युबर कॅरी मिनाटी अडचणीत, दिल्लीत गुन्हा दाखल

 काय म्हणाले नागार्जुन

नागार्जुन यांना ज्यावेळी या नागाचैतन्य आणि समँथा यांच्या नात्यात काही दुरावा आला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी या प्रश्नाचे जे उत्तर दिले ते ऐकल्यानंतर नक्कीच त्यांच्या नात्यात काहीही आलबेल नसल्याचे लक्षात आले आहे. नागार्जुन यांनी सांगितले की, हो समँथा आणि नागाचैतन्य यांच्या नात्यात तणाव आला आहे. नागाचैतन्यची बाजू घेत त्यांनी सांगितले आहे की, नागाचैतन्य सगळ्या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. 2017साली त्यांनी गोव्यामध्ये अत्यंत साध्यापद्धतीने लग्न केले. ‘मजिली’ चित्रपटात त्याला समँथासोबत कठोर वागायला सांगितले त्यावेळीही त्याला ते जमत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्यात आलेला दुरावा घालवताना नेमकी कशी सुरुवात करावी हे नेमके कळत नाही.हे असे बोलल्यामुळेच समँथा यांच्या नात्यात काहीतरी गडबड असल्याचे नक्कीच लक्षात येत आहे. 

माही विजने पती जय भानुशालीला केले इन्स्टाग्रामवर ब्लॉक, कारण वाचून व्हाल हैराण

 समँथाने टाळले उत्तर देणे

नागार्जुन यांनाच नाही तर प्रत्यक्ष समँथाला देखील याबद्दल विचारण्यात आले होते. पण याबद्दल ज्यावेळी तिला विचारण्यात आले त्यावेळी तिने या प्रश्नांची उत्तरे देणे टाळले आहे. तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काहीही बोलणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिच्याकडूनही काही गोष्टी कळू शकणार नाही असेच दिसत आहे.  तर दुसरीकडे नागाचैतन्यनेदेखील कोणतीही माहिती या संदर्भात दिलेली नाही. तो त्याच्या सोशल मीडियावर फारच कमी अॅक्टिव्ह असतो. शिवाय या दोघांनीही त्यांच्या अकाऊंटवरुन त्यांचे फोटो काढून टाकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यात इतरांसारखा नुसता रुसवा फुगवा आहे असेच म्हणावे लागेल.

अशी झाली सुरुवात

समँथा आणि नागाचैतन्यमध्ये काहीतरी गडबड आहे याची जाणीव तेव्हा झाली ज्यावेळी समँथाने तिचे नाव बदलून टाकले. तिने आधी नागाचैत्यनचे नाव काढून टाकले. त्यावेळी सगळ्यांनाच याबद्दल शंका आली इतकेच नाही. तर हे नाव काढून टाकले तरी देखील तिने फोटो काढून टाकले नाहीत. पण नावात केलेला हा बदल सगळ्यांच्याच लक्षात आला आहे. खूप जणांनी त्यांचा घटस्फोटाची बातमी सगळीकडे आधीच दिल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे. 

आता या दोघांच्या नात्यामध्ये नुसता रुसवा फुगवा सुरु आहे का की खरंच काहीतरी असं झालंय ते आता काही दिवसांनी समजेलच.

या सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाची चर्चा, पण…

13 Sep 2021

Read More

read more articles like this
good points logo

good points text