ADVERTISEMENT
home / मनोरंजन
actor-nitish-chavan-posts-special-birthday-wish-for-actress-shweta-kharat-in-marathi

अभिनेता नितीश चव्हाणने केली श्वेता खरातसाठी खास पोस्ट, नात्यात असल्याच्या चर्चांना उधाण

काही चेहरे मराठी मालिकांमधून घराघरात पोहचतात आणि प्रेक्षकांचे होऊन जातात, त्यातील एक चेहरा म्हणजे अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) अर्थात प्रेक्षकांचा लाडका अज्या. नितीश नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. तर त्याच्या सोशल मीडियावर अनेकदा रिल्समध्ये दिसणारा चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता खरात (Shweta Kharat) अर्थात ‘मन बाजिंद झालं जी’ मधील कृष्णा. या दोघांची जोडी सर्वांनाच आवडते. हे दोन्ही कलाकार एकमेकांबरोबर अनेक वेळा दिसून येतात. त्यामुळे अनेकदा या दोघांच्या नात्यांबद्दल चर्चा केली जाते. पण आता नितीशने पुन्हा एकदा श्वेताच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केल्यामुळे हे दोघेही मैत्रीपेक्षा खास नात्यात असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. 

नितीश चव्हाणने केलेली खास पोस्ट 

“श्वेता the fighter”💪🏽

तुझा आज वाढदिवस,खास दिवस,जन्मदिवस आज या निमित्ताने तुला सांगावस वाटतंय की तुला fighter यासाठी म्हंटलो कारण इतकी वर्ष मी तुला बघत आलोय,आपण एकत्र करिअर ची सुरुवात केली या प्रवासात किती चढ उतार आले,किती अवघड परिस्थिती आली पण त्यावर तू मात केलीस आणि आज तू जे काही आहेस ते फक्त आणि फक्त तू घेतल्याला मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे.
तुझ्या बरोबर राहून तुझ्याकडून खूप काही शिकलो. तुझ्यात ती positive energy आहे, तुझ्यात तो गोडवा आहे, तुझ्यात ती परिस्थितीवर मात करण्याची ताकद आहे. तू कधीच give up करत नाहीस. तू जिथे गेलीयेस तिथे तू तुझी छाप पाडलेली आहेस. 😇😇🙏🏼🙏🏼
तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहेस. तू कायम खुष रहा☺️, निरोगी रहा, आंनदी रहा 🥰आणि मुख्य म्हणजे कायम हसत रहा 😁😁कारण तू जिथे असतेस तिथंल वातावरण आपोआप हसत खेळत राहतं हे माहितेय मला आणि अजून एक कारण हसत रहा कारण हसल्यावर तुझी डिंपल दिसते 🥰 
स्वामींच्या आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने तुझी अशीच उत्तरोउत्तर प्रगती होत जातो, तुला उदंड आयुष्य देवो 🙏🏼🙏🏼
आता माझ्या style मध्ये ☺️
🥳Many many वाढदिवसाच्या hardik मुबारकं 🎊🥳
Luv uuuu😘😘 god bless uu🙏🏼
Enjoy your day❤️

नितीशने अगदी मनापासून ही पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करत श्वेताबरोबरचे अनेक फोटो एकत्र असलेले कोलाज रिल्समधून पोस्ट केले आहे. तर याखाली त्याच्या चाहत्यांच्या अनेक कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. याशिवाय आता नितीश आणि श्वेता आपलं नातं अधिकृतपणे जाहीर करत आहेत का अशा स्वरूपाची चर्चाही सुरू झाली आहे. मात्र यावर दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद आलेला नाही. 

ADVERTISEMENT

नितीश आणि श्वेता दोघेही कामात व्यस्त 

श्वेता सध्या ‘मन बाजिंद झाले जी’ मालिकेत व्यस्त आहे. तर नितीशही आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. तरीही हे दोघं नेहमीच वेळात वेळ काढून आपल्या प्रेक्षकांसाठी रिल्स बनवत असतात अथवा फोटो पोस्ट करत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनाही आता या दोघांच्या नात्याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे आणि या दोघांकडून नात्याबाबत कधी घोषणा केली जाणार आहे याबाबतही चाहत्यांना आता जाणून घ्यायचे आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT