ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
पैशांच्या अभावी या अभिनेत्याने लाँच केले नाही मुलाला, केला खुलासा

पैशांच्या अभावी या अभिनेत्याने लाँच केले नाही मुलाला, केला खुलासा

एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीने आपल्या मुलाला लाँच करणे आता नवे राहिलेले नाही. अनेकांनी आपली मुलं आतापर्यंत लाँच केली आहेत. रणबीर कपूर, आलिया भट, जान्हवी कपूर, सारा अली खान  अशी काही नावं आपल्यासमोर पटकन येतात. पण एका ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या मुलाला म्हणावे तसे लाँच केलेले नाही. त्याच्या लाँचसाठी कोणतीही ग्रेट ग्रँड पार्टी वगैरे केलेली नाही. हे अभिनेते अन्य कोणी नसून परेश रावल आहेत.  अनेक भूमिकांमधू दर्जेदार काम केलेल्या या अभिनेत्याचा मुलगा या क्षेत्रात आहे पण तरी देखील त्याचा गवगवा त्याने केलेला नाही. पैशांच्या अभावीच या अभिनेत्याने आपल्या मुलाला लाँच केल्याचा खुलासा केला आहे. जाणून घेऊया या विषयी

हंगामा 2′ प्रदर्शित होण्याआधीच शिल्पा शेट्टीचा खुलासा, चित्रपट होणार सुपरहिट

मी मुलाला म्हणून लाँच केले नाही

परेश रावल यांचा मुलगा नुकताच ‘बमफाड’ या चित्रपटातून पदार्पण केले आहे. पण चित्रपट आल्यानंतर तो परेश रावल यांचा मुलगा आहे हे अनेकांना कळले आणि धक्काच बसला. कारण परेश रावल यांनी त्यांच्या मुलाविषयी कोणतीही माहिती या आधीही दिली नव्हती. ज्यावेळी अनेकांना तो परेश रावल यांचा मुलगा आहे हे कळले त्यानंतर त्यांना खूप जणांनी मुलाखतीत विचारलं त्यावर परेश रावल म्हणाले की, माझ्याकडे तितका पैसा नाही की मी माझ्या मुलाला लाँच करु शकेन. पण सुदैवाने माझ्या मुलाला त्याच्या गुणांमुळे ऑफर्स मिळाल्या आणि तो हंसल मेहता यांच्या चित्रपटात झळकला ही देखील आनंदाची गोष्ट आहे. त्याला या पुढील ही ऑफर्स मिळत आहेत. याचा मला आनंद आहे. त्यामुळे मी त्याला लाँच केले नाही याचा काहीच फरक पडत नाही. त्याने मेहनत घेतली यापेक्षा अधिक आनंद कोणता? वडिलांच्या शिफारशीशिवाय काम होत आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. 

‘बमफाड’मधून दिसला आदित्य

आदित्य रावला हा झी5 वर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘बमफाड’ या चित्रपटातून दिसला. आदित्य रावल असे नाव असून देखील कोणालाही त्याच्यावर शंका आली नव्हती. पण ज्यावेळी तो परेश रावल यांचा मुलगा आहे कळले त्यावेळी अनेकांना धक्का बसला. परेश रावल यांनी त्याच्या प्रदर्शनासाठी अजिबात काहीही केले नाही. त्यामुळेच खूप जणांना शेवटपर्यंत हा संशय होता की, हा परेश रावल यांचा मुलगा आहे की नाही. कारण आदित्यने देखील या विषयी कुठेही काहीही मुलाखत दिली नाही. पण आदित्य हा असा पहिला स्टार किड असेल ज्याच्या वडिलांची ओळख त्याने वापरली नाही. शिवाय त्याच्या लाँचसाठी कोणतीही ग्रँड पार्टी देखील ठेवण्यात आली नाही.

ADVERTISEMENT

हेमांगी कवीच्या त्या बिनधास्त वक्तव्याला अनेकांनी दिला पाठींबा

परेश रावल दिसणार या चित्रपटात

मुलगा लाँच झाला याचा आनंद असला तरी देखील परेश रावल अजूनही आपल्या कामांच्या बाबतीत फारच शोधक आहेत. ते लवकरच फरहान अख्तरच्या ‘तूफान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठीच त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखती दरम्यान आदित्यचा विषय निघाल्यानंतर त्यांनी या विषयी अधिक माहिती दिली. परेश रावल हे कोणाला माहीत नाही असे मुळीच होणार नाही. परेश रावल यांच्या कामांमुळेच त्यांची आतापर्यंत ओळख आहे. हेराफेरीमधील विनोदी भूमिका असो वा केलेली व्हिलनची ग्रे शेड भूमिका. त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. 

आता आदित्य रावलचा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा आणि हा स्टारकिड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.

नव्वदच्या काळातील ‘राम तेरी गंगा मैली’ फेम अभिनेत्री मंदाकिनीचा कमबॅक

ADVERTISEMENT
15 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT