ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘आपल्या माणसांची काळजी घ्या’ मामाच्या निधनानंतर पुष्कर जोगचा भावूक व्हिडिओ व्हायरल

‘आपल्या माणसांची काळजी घ्या’ मामाच्या निधनानंतर पुष्कर जोगचा भावूक व्हिडिओ व्हायरल

सध्या कोरोना काळात (Coronavirus) अनेक जवळची माणसं अनेकांनी गमावली आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही सध्या या अनुभवातून जावं लागत आहेत. तर गेल्या दोन वर्षात अनेक सेलिब्रिटींनीही कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना बेड्स, ऑक्सिजन न मिळाल्याने अथवा औषधांचा पुरवठा न झाल्याने गमावले आहे. रोज कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत कळल्याने मन सुन्न होते आहे. असाच आपला अनुभव भावूक होत अभिनेता पुष्कर जोगने व्यक्त केला आहे. आपल्यावर जशी वेळ आली तशी कोणावरही येऊ नये म्हणून हिंमत करून पुष्करने आपल्या भावना बोलून दाखवत असल्याचे आपल्या सोशल मीडियावर सांगितले आहे. 

या मराठी अभिनेत्याला एक्सप्रेस वे वर लुटले, आरोपीचा शोध सुरू

मामाचा फोन उचलू न शकल्याचे दुःख

पुष्कर जोगने काही दिवसांपूर्वीच आपला मामा गमावला आहे. मामाचा आलेला फोन उचलू न शकल्याने आणि त्यानंतर मामाच्या निधनाबद्दल कळल्याने पुष्करवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत त्याने इतरांना आपल्या माणसांना अधिक जपा आणि काळजी घ्या असंही सांगितलं आहे. ’Take care of your loved ones , Talk to them .. Be kind !!! मी व्यक्त होण्याचा विचार करत होतो आज थोडी हिम्मत झाली. काही दिवसांपूर्वी माझा मामा गेल्याचा पोस्ट मी टाकला होता त्या वेळेसचा मिसड कॉल माझे मन अजूनही खात आहे ..तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे कृपा करून एकमेकांच्या संपर्कांत रहा . लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांशी संपर्क होत नाहीये हे योग्य नाही . हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे तेव्हा हेवेदावे , रुसवे फुगवे , वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक , मित्र परिवार व आप्त स्वकियांसह संपर्कात रहा. कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. लवकरच हा वाईट काळ सरेल आणि आपण सर्व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू.’ अशी भावना पुष्करने व्यक्त केली आहे. 

सोनू सूद आणि सलमानला बनवा पंतप्रधान,राखी सावंतने केली मागणी

ADVERTISEMENT

कोरोनामुळे गमावली जवळची माणसं

कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत. सेलिब्रिटीच्या बाबतीत तर हे अधिक ऐकू येत आहे. त्यामुळे आता सगळेच धास्तावले आहेत. जास्तीत जास्त काळजी घ्या आणि स्वतःला आणि इतरांनाही जपा हेच सूर आता सगळीकडून उमटत आहेत. कोरोनाने सर्वांनाच हवालदिल करून सोडले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणाचा काका, कोणाचे बाबा, कोणाची आई तर कोणाचा मामा अशा अनेक जणांना वेळेवर उपचार न मिळाल्याने, तर काहींना उपचारादरम्यान ऑक्सिजन न मिळाल्याने, तर काहींना अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे रोज ऐकिवात येत आहे. या दरम्यान सर्वांनी आपल्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुष्कर जोग कोरोना लढ्यातही मदत करायला पुढे आला आहे. लसीकरण किती महत्वाचे आहे याबाबत सध्या पुष्कर जागरूकता आणत आहे. मात्र सध्या पुष्कर आपल्या मामाच्या जाण्याने अतिशय दुखावला असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता स्वतःला जपावं आणि काळजी घ्यावी हेच खरं!

मोहित मलिक आणि आदिती शिरवाइकरने शेअर केलं बाळाचं नाव, जाणून घ्या अर्थ

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT