ADVERTISEMENT
home / मनोरंजन
actor-randeep-hooda-s-first-look-launch-as-veer-savarkar-in-marathi

अभिनेता रणदीप हुड्डाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पहिला लुक लाँच

थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांची 28 मे रोजी 139 वी जयंती झाली. या आनंदाच्या प्रसंगी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी विनायक दामोदर सावरकरांची दमदार व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रणदीप हुडाचा (Randeep Hooda) फर्स्ट लुक रिलीज केला आहे.  पोस्टरवर ‘हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है’ असे लिहिले आहे. या चित्रपटाची ऑगस्ट 2022 पासून चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. रणदीप हुड्डाचे हे पोस्टर लुक पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच सुखद धक्का मिळाला आहे. कारण या पोस्टरवरील कलाकार हा रणदीप हुड्डा आहे समजून येत नाही. हुबेहूब सावरकरांची प्रतिमाच असलेले हे पोस्टर रिलीज झाल्यावर आता प्रेक्षकांची उत्सुकता खूपच ताणली गेली आहे. सावरकरांचे विचार आजही समाजाला तत्वाने राहण्यास भाग पाडतात. अशा व्यक्तिमत्वारील चित्रपटाची नक्कीच आता सर्वांना उत्सुकता आहे.

वीर सावरकरांच्या जीवनाची कथा 

चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी शेअर केले, “जेव्हा हर्षद मेहता, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांचे चित्रपट ट्रेंडमध्ये असताना मला वीर सावरकरांच्या जीवनाची कथा सांगण्यात जास्त रस वाटला कारण ते भारताचे पहिले डायनॅमिक हिरो होते आणि 1947 मधील फाळणी वाचवायला मदत करणारे एकमेव वीरपुरुष होते. या चित्रपटाद्वारे मला, केवळ एक चित्रपट निर्माता म्हणून नव्हे, तर एक भारतीय म्हणून, सावरकरांच्या संघर्षाची वस्तुस्थिती जगाला सांगायची आहे. स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा धाडसी लढा, इंग्रजांना घाबरवणारे त्यांचे निर्भीड व्यक्तिमत्त्व आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची हिंदुत्वासाठी असलेली बांधिलकी खूप प्रेरणादायी आहे. सर्वांनी गैरसमज करून घेतलेल्या या हिरोला आपल्याला आता समजून घेण्याची वेळ आली आहे.  त्यांना जे हवं होतं ते त्यांना कधीच मिळालं नाही आणि म्हणूनच सावरकरांना भारतरत्न (Bharat Ratna) आणि नोबेल पारितोषिक (Nobel Prize) दिलं जावं अस मी निवेदन करतो.”

रणदीप एक उत्तम अभिनेता, निर्मात्यांचे कौतुक

निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले की, “रणदीपने एक अभिनेता म्हणून आपले कौशल्य वारंवार दाखवले आहे आणि शिवाय, त्याने साकारलेल्या पात्रात तो बदलू शकतो हे दाखवून दिले आहे.  परंतु सावरकरांच्या बाबतीत, स्वातंत्र्यसैनिकांसोबत त्यांच्या विलक्षण साम्यामुळे आणखी एक उमेद मिळाली. मी इतिहास प्रेमी आहे आणि ज्या नेत्याची कथा सांगायलाच हवी, त्याची कथा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सिनेमॅटिक विशेषाधिकार मिळाल्याबद्दल मी उत्सुक आहे. 

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले की, “लोकांच्या मनात सावरकरांबद्दल वेगवेगळे आवृत्त्या असू शकतात, पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटातील सावरकरांच्या व्यक्तिरेखेपेक्षा काही फरक पडणार नाही.  सावरकर वास्तविक जीवनात होते. ते प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक होते आणि आम्ही हे सुनिश्चित करू की त्यांना कोणताही भारतीय कधीही विसरणार नाही.

ADVERTISEMENT

रणदीपने व्यक्त केले मनोगत 

अभिनेता रणदीप हुड्डा यांनी यावर बोलताना शेअर केले की, “भारताच्या स्वातंत्र्य आणि आत्म-वास्तविकतेच्या लढ्यातील सर्वात उंच नायकांपैकी एकाला हा सलाम आहे.  मला आशा आहे की मी एका खऱ्या क्रांतिकारकाचे योगदानाचे आव्हान पेलू शकेन आणि इतक्या दिवसांपासून दडून राहिलेली त्याची खरी कहाणी जनतेला सांगू शकेन.” आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट प्रस्तुत केले जात असून निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मितीची धुरा रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी पेलली आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT