नेपोटिझम वाद संपायचे काही नावच घेत नाही. अनेकांनी घराणेशाहीच्या आलेल्या अनुभवाचे कथन आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून केले आहे. पण आता या मध्ये ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनीही नेपोटिझम वादावर असे काही खुलासे केले आहेत की, ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसले आणि इतके लक्षात येईल की, हा वाद आताचा नाही तर फार पूर्वीपासून चित्रपटसृष्टीतही सुरु आहे. अभिनेते रणजीत यांनी नेमका कोणता खुलासा केला ते आता जाणून घेऊया
बिग बॉस’फेम अभिनेत्रीला मिळाला आयुष्याचा जोडीदार, केला खुलासा
काय म्हणाले रणजीत ?
ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, बॉलीवूडमधील नेपोटिझम, घराणेशाही ही आताची नाही अगदी पूर्वीपासून ती दिसत आली आहे. यामुळे अनेकदा नात्यांमध्ये वितुष्टता ही आली आहे’. नेपोटिझमवादावर अधिक प्रकाश टाकत ते म्हणाले की, अनेक चित्रपटांमध्ये एकाला रोल ऑफर करुन किंवा एखाद्याची निवड करुन दुसऱ्या कलाकारालाही घेण्यात आले आहे. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार त्या काळातील ‘सिलसिला’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी परवीन बाबीची निवड करण्यात आली होती. पण अचानक निर्मात्यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि तो चित्रपट जया बच्चन यांना देण्यात आला. शोले हा त्याकाळातील सुप्रसिद्ध चित्रपट जय-वीरुची जोडी आणि एकूणच शोलेची सगळी टिम त्या चित्रपटामुळे घराघरात जाऊन पोहोचली. या चित्रपटातील एका रोलसाठी अभिनेते डॅनी यांना विचारणा करण्यात आली होती. पण डॅनी त्या काळात खूप व्यग्र असल्याने हा रोल रणजीत यांना ऑफर करण्यात आला. पण त्यांनीही नकार दिल्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला हा रोल देण्यात आला.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्याशी संवाद साधल्याचा व्हिडिओ वायरल
बॉलीवूडमध्ये आहेत ग्रुप
नेपोटिझमवर अधिक प्रकाश टाकत रणजीत यांनी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ग्रुपिझम चालते. तुम्ही कोणत्या ग्रुपचे आहात यावरुन तुम्हाला काम दिली जातात. एखाद्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात एखादी अभिनेत्री, अभिनेता हमखास असणारच असे त्यावेळी निदर्शनास यायचे. त्याला ‘ट्युनिंग’ असे नाव दिले जायचे. पण आताच्या मुलांनी यामध्ये न पडता काम करायला हवी. कितीही ग्रुप असले तरी तुमचे काम तुम्हाला तुमची ओळख मिळवून देत असते. त्यामुळे कामाकडे अधिक लक्ष द्या. सुदैवाने मी सगळ्यांशीच चांगला असल्यामुळे मला याचा त्रास तितकासा झाला नाही. पण हा ताण नेहमीच इंडस्ट्रीमध्ये जाणवतो.
किंग खानला वाटतेय कोरोनाची भीती, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी उचललं ‘हे’ पाऊल
सुशांतच्या आत्महत्येनंतर या चर्चांना उधाण
सुशांतच्या आत्महत्येनंतर या चर्चांना अधिक उधाण आले आहे. सुशांतला अनेक चित्रपटांमधून काढण्यात आल्याची चर्चा होत होती. शिवाय त्याला नेपोटिझमचा त्रास होत होता. असे देखील अनेकांनी म्हटले. या तणावाखाली त्याने आत्महत्या केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ही आत्महत्या नाही तर त्याचा हा या व्यवस्थेने केलेला खून आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येनंतर एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही अद्याप याविषयी लोकांना संशय कमी होत नाही.
आता ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी खुलासा केल्यानंतर आता आणखी कोण या वादात उडी घेणार हे पाहावे लागेल.