Advertisement

मनोरंजन

तामिळ अभिनेता सिद्धार्थला केलं मृत घोषित,युट्युबकडे केली तक्रार

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jul 18, 2021
तामिळ अभिनेता सिद्धार्थला केलं मृत घोषित,युट्युबकडे केली तक्रार

एखाद्या अभिनेत्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल चटपटीत बातम्या देण्याचे काम युट्युबवर सतत होत असते. वेगवेगळ्या गॉसिपचे व्हिडिओ आपणही अनेकदा पाहिले असतील.पण एखादी व्यक्ती जीवंत असताना त्याला मृत घोषित करण्याची चूकही अनेकदा या प्लॅटफॉर्मवर होत असते. एक तामिळ अभिनेता जीवंत असूनही त्याला मृत घोषित करण्याची चूक एका युट्युब व्हिडिओमध्ये करण्यात आली होती. या व्हिडिओची माहिती तामिळ अभिनेता सिद्धार्थला मिळाली आणि त्याने याची माहिती युट्युबरला दिल्यानंतर त्यांच्याकडून अभिनेत्याला जे उत्तर आले ते त्याने सगळ्यांना शेअर केले आहे. जाणून घेऊया त्याच्यासोबत नेमकं काय झालं ते

युट्युबला दिली माहिती

अभिनेता सिद्धार्थला त्याच्या फॅन्सनी एक स्क्रिनशॉट पाठवून त्याला एका व्हिडिओबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये जग सोडून गेलेल तरुण कलाकार यांची यादी आहे या यादीमध्ये तामिळ अभिनेता सिद्धार्थ याचे नाव आहे. अभिनेता जीवंत असताना त्याला मृत घोषित केल्याचे पाहून हे लोकांना चुकीची माहिती दिल्यासारखे आहे.याची माहिती सिद्धार्थने लगेचच युट्युबला दिली आहे. ही माहिती दिल्यानंतर युट्युबने त्याला रिप्लाय देत यामध्ये कोणतीही चूक नाही असे उत्तर दिले आहे. खरा अभिनेता सिद्धार्थ हा जीवंत असताना अशापद्धतीने चुकीचे माहिती देणे देईल बरोबर नाही. युट्युबने असे उत्तर दिल्यामुळे सिद्धार्थदेखील चक्रावून गेला आहे. 

कोण होणार करोडपती’मध्ये कर्मवीर म्हणून खेळणार नाना पाटेकर

शेअर होतात असे व्हिडिओ

युट्युबवर वेगवेगळ्या चॅनेलवर असे व्हिडिओ शेअर होत असतात. यामध्ये कलाकारांसंदर्भात वेगवेगळे गॉसिप सांगितलेले असतात. मृत झालेल्या कलाकारांची माहिती सांगितलेले व्हिडिओ अधिक चालतात. असे व्हिडिओ माहिती देणारे आणि चटपटीत खबर देणारे असले तरी देखील अशी चुकीची माहिती खूप वेळा अनेकांना मिळते.ज्यामुळे खूप नुकसान होते. त्यामुळे असे व्हिडिओ शेअर होऊ नये म्हणून युट्युबकडे तक्रार केली खरी. पण त्यामध्ये त्यांना काही गैर वाटले नाही ही नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळेच आता असे व्हिडिओ शेअर करताना सगळ्यांनी सावध राहणे फार गरजेचे आहे.

तामिळ चित्रपटात कमावले नाव

अभिनेता सिद्घार्थ हा हिंदी आणि तामिळ चित्रपटात काम केले आहे. बॉलिवूड चित्रपट रंग दे बसंतीमध्ये काम केल्यानंतर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. एक वेगळा चेहरा दिसल्यानंतर तो वेगवेगळ्या चित्रपटात पुन्हा दिसेल असे वाटले होते. पण त्यानंतर तो हिंदी चित्रपटात फारसा दिसला नाही. त्याची पहिली पसंती ही कायम तामिळ चित्रपट राहिला आहे. त्यामुळे तो तामिळमध्येच जास्त काम करताना दिसतो. त्यामुळे आता त्याचा हिंदी चित्रपटात तो फारसा दिसत नाही.

म्हणून करिश्मा कपूरने दिला होता दिला तो पागल है चित्रपटाला होकार

सिद्धार्थ आणि गॉसिप

सिद्धार्थ हा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. तो सोशल विषयांवर कायम आपली मत व्यक्त करतो. त्यामुळे तो सतत ट्विट करुन आपले मत व्यक्त करतो.  सिद्धार्थने कोरोना काळात अनेक विषयांवर आपले विषय ठळकपणे मांडले होते. सिद्धार्थच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर सिद्धार्थ हा समॅंथा अकिनीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. पण त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले असे देखील कळले होते. पण त्यानंतर त्याचा उल्लेख पुन्हा कधीही झाला नाही. 

आता युट्युब यावर पुन्हा एकदा काय अॅक्शन घेईल ते पाहावे लागेल.

 

पैशांच्या अभावी या अभिनेत्याने लाँच केले नाही मुलाला, केला खुलासा