सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali mayekar) ही जोडी सोशल मीडियावरील अनेकांची फेव्हरेट अशी जोडी आहे. या दोघांच्या लव्हस्टोरीपासून ते अगदी त्यांच्या लग्नापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या फॅन्ससोबत कायम शेअर केल्या आहेत. आता मिताली आणि सिद्धार्थचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. याचीच एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. अहो, तुम्ही समजत आहात ती ही गुडन्यूज नाही तर त्यांच्या बकेट लिस्टमधील आणखी एक गोष्ट पूर्ण करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांच्या लेटेस्ट पोस्टमध्ये त्यांनी याची माहिती दिली आहे. सिद्धार्थ- मिताली या दोघांनी मुंबईत त्यांचे पहिले वहिले घर विकत घेतले आहे.
नव्या घराचा नवा आनंद
मितालीने एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये या दोघांच्या बोटाला शाई लागलेली दिसत आहे. त्याचे कॅप्शन वाचल्यानंतर ही शाई नेमकी कसली याचा आनंद आम्हालाही कळाला आहे. सिद्धार्थ- मितालीने मुंबईत त्यांचे एक नवे घर विकत घेतले आहे. त्याचे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळ्या प्रक्रिया या दोघांनी पूर्ण केल्याच्या यामध्ये दिसत आहेत. आपले हक्काचे घर असणे कोणाला नको असते. सेलिब असो किंवा सर्वसामान्य माणसं त्यांच्यासाठी हक्काची जागा असण्यासारखे दुसरे कोणतेही सुख आणि दुसरा कोणताही आनंद नाही. त्यामुळे त्यांनी केलेली ही पोस्ट अगदी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
घर कुठे घेतले?
आता मिताली- सिद्धार्थचे हे घर आहे तरी कुठे? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण अद्याप याची कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. त्यांचे घर मुंबईच्या कोणत्या भागात आहे याविषयी काहीही माहिती नसल्यामुळे आता थोडी कळ तर आपल्या सगळ्यांनाच सोसावी लागणार आहे. कारण या नव्या घरात ते लवकरच गृहप्रवेश करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. आता या नव्या घरातील त्यांचे हे नवे व्हिडिओ आपल्याला कधी पाहायला मिळतील याची थोडी वाट तर आपल्याला पाहावी लागेल.
भटके….
आता तुम्हाला वाटेल भटके हा शब्द कोणाला वापरला तर सिद्धार्थ- मिताली यांना आम्ही ते खूप प्रवास करतात म्हणून आम्ही भटके म्हटले आहे. त्यांच्या फिडवर त्यांच्या फिरण्याचे अनेक फोटो असतात. दोघांनाही फिरायला खूपच जास्त आवडते हे त्यांच्या फिडवरुन दिसते. जंगलसफारी असो किंवा फॅन्सी ट्रिप हे दोघेही एन्जॉय करताना दिसतात. टूरदरम्यान असलेले त्यांचे फोटोज इतके सुंदर असतात की, नक्कीच त्यांच्यासोबत फॅन्सना देखील फिरण्याचा आनंद मिळतो यात काहीही शंका नाही. त्यांच्या वेगवेगळ्या ट्रिपचे हे फोटोज खूप जणांना आवडतात.
आता त्यांच्या या नव्या आनंदातही अनेक जण आनंदी झाले आहेत. POPxo मराठीकडूनही त्यांना नव्या घराच्या शुभेच्छा