ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सुयश टिळक

सुयश टिळकच्या घरी सुरु झाली लगीनघाई, पाहा फोटोज

लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. या लग्नाच्या सीझनमध्ये अभिनेता सुयश टिळक विवाहबंधनात अडकणार आहे.  त्याच्या घरी लगीनघाई सुरु झालेली आहे. नुकताच त्याचा हळदी समारंभ पार पडला आहे. सुयश आणि आयुषी भावेच्या हळदीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून लग्नाआधीच्या सगळे मंगलकार्य पार पडले आहे. त्यामुळे आता ‘आली लग्नघटीका समीप नवरा’ अशी लगीनघाई सुयशच्या घरात पाहायला मिळत आहे.  सुयश आणि आयुषी यांनी काहीच महिन्यांपूर्वी साखरपुडा केला होता. त्यामुळे चाहते त्यांचे लग्न कधी होईल? याच्या प्रतिक्षेत होते. आता त्यांचा लग्नाची तारीख आल्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली आहे.

Bigg Boss Marathi:घरात सुरु झालेत गैरसमज, टीम Aमध्ये पडेल का फूट?

हळद लागली

सुयश आणि आयुषी यांनी एकत्र हळद केली आहे. त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. त्यांचे हे फोटो फारच सुंदर आहेत.  पण सध्या तरी सुयश आणि आयुषीने हे फोटो शेअर केलेले नाहीत. पण त्यांची हळद एकदम कौटुंबिक पद्धतीने पार पडली हे दिसून येत आहे. सुयशने काही महिन्यांपूर्वी अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे अनेकांना सुखद धक्का बसला होता. लॉकडाऊनचे नियम पाळत सुयशने साखरपुडा कमी लोकांच्या उपस्थितीत केला. अनेक मुलाखतीत तिला लग्नासंदर्भात विचारण्यात आले होते. पण त्याने या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्या लग्नाची प्रतिक्षा त्याचे फॅन्स पाहात होते.लग्नाचा सीझन सुरु झाल्यानंतर अगदी पहिल्याच महिन्यात सुयशचे लग्न आहे. मिळालेल्य माहितीनुसार तो त्याचे लग्न 20, 21 ऑक्टोबरमध्ये करणार आहे. लग्नासाठी अस्सल मराठी उखाणे नक्की वाचा.

 साखरपुडा असा पडला पार

सुयश आणि आयुषीचा साखरपुडा हा जुलै महिन्यात झाला. त्याने त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. साऊथ इंडियन लुक घेत त्यांनी हा सोहळा केला होता. आयुषीने या साखरपुड्यासाठी दोन साड्या नेसल्या होत्या. हिरवा आणि पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर सुयश टिळक यामध्ये लुंगीत दिसला होता.  आयुषीची लांब वेणी आणि तिचे दागिने पाहिल्यानंतर तिचा हा लुक एकदम साऊथ इंडियन होता. हे या फोटोजमध्ये दिसून आले आहे. खूप जणांना त्यांचा हे फोटोज खूपच जास्त आवडले होते. त्यांचे हे फोटोज खूप जास्त व्हायरल झाले होते.

ADVERTISEMENT

दोघेही कला क्षेत्राशी निगडीत 

 आयुषी आणि सुयश हा एकाच क्षेत्राशी निगडीत आहे. आयुषी ही अभिनेत्री आणि डान्सर आहे. तर सुयश हा चित्रपट आणि मालिकांमधील चेहरा आहे. त्याने अनेक चित्रपटातून लीड रोल केलेले आहेत. मालिकेच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला आहे. आयुषी हा अनेकांसाठी नवा चेहरा असला तरी देखील तिनेही कामं केली आहेत. त्यामुळे या दोघांची जोडी एकदम परफेक्ट दिसते या काही शंका नाही. 

सुयशच्या हळदीच्या फोटोनंतर आता सगळ्यांना त्याचे लग्नाचे फोटो पाहण्याची प्रतिक्षा आहे.

“अंतिम” च्या प्रदर्शन तारखेमुळे होणार मराठी चित्रपटाची गळचेपी

इम्ररान हाश्मी आणि निकिता दत्ताचा डिब्बुक : दी कर्स इज रिअलचं टीझर प्रदर्शित, या चित्रपटाचा आहे रिमेक

ADVERTISEMENT
20 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT