वैभव तत्त्ववादी हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार असून तो बॉलीवूडमध्येही ओळखीचा चेहरा आहे. ओटीटीमध्येही प्रवेश केलेला वैभव लवकरच सोनीलिव्हच्या आगामी ‘प्रोजेक्ट 9191’मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात दिसणार आहे. आश्चर्यकारक अॅक्शन आणि विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांनी साकारलेली ‘प्रोजेक्ट 9191’ ही अशा एका टीमची गोष्ट आहे, जी गुन्ह्यांचा शोध घेते आणि गुन्हे घडण्यापूर्वी थांबवते. वैभव साकारत असलेली पंकज ही व्यक्तिरेखा ‘प्रोजेक्ट 9191’च्या प्रमुख टीमच्या एका सदस्याची आहे आणि सोबत डीसीपी अमिताभ सिन्हा (सत्यजीत शर्मा) हेही दिसतील. तो एक साधा माणूस वाटत असला तरी अत्यंत बुद्धिमान, प्रॅक्टिकल आहे आणि आपल्या हजरजबाबीपणामुळे टीममध्ये तो धमाल करतो.
संजय लीला भन्साली आणि दीपिका पादुकोणमध्ये खरंच सुरू आहे का कोल्ड वॉर
वैभवची व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यापेक्षा वेगळी
वैभव तत्त्ववादीने पंकजच्या भूमिकेबद्दल सांगितले की, ‘प्रोजेक्ट 9191’ सारख्या शोचा भाग होताना तसेच अत्यंत बुद्धिमान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. पंकज ही व्यक्तिरेखा मी प्रत्यक्षात जसा आहे त्यापेक्षा खूप वेगळी आहे. पण या शोने मला खऱ्या अर्थाने माझी क्षितिजे विस्तारण्याची संधी आणि एक वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता दिली आहे. ‘प्रोजेक्ट 9191 हा आपण सध्या जगत असलेल्या काळासाठी अत्यंत अर्थपूर्ण शो आहे आणि प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल अशी मला आशा वाटते.” सत्यजीत शर्मा आणि वैभव तत्त्ववादी यांच्यासोबत ‘प्रोजेक्ट 9191’मध्ये तृष्णा मुखर्जी, अभिषेक खान, मानिनी डे, जगत रावत, शरद कुमार यांच्याही व्यक्तिरेखा आहेत. किडनॅपिंग्सपासून खंडणीपर्यंत आणि दहशतवादी धमक्यांपर्यंत अनेक गोष्टी डीसीपी अमिताभ सिन्हा (सत्यजीत शर्मा) आणि त्यांची सक्षम टीम सोडवू शकेल का आणि गुन्हा घडण्यापासून रोखू शकेल का? हे या शो मध्ये पाहणं प्रेक्षकांसाठी मजेशीर ठरणार आहे. तसंच ‘प्रोजेक्ट 9191’ हा शो 26 मार्चपासून फक्त सोनीलिव्हवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
“रावरंभा” तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी
वैभव तत्ववादीच्या चाहत्यांसाठी पर्वणी
वैभव तत्ववादीचे अनेक चाहते आहेत. मराठीच नाही तर अगदी हिंदी चित्रपटांमध्येही वैभवने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे हा येणारा शो म्हणजे वैभव तत्ववादीच्या चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी असणार आहेत. वैभवने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण पहिल्यांदाच वैभव पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तेदेखील त्याच्या स्वभावाच्या विरूद्ध भूमिका साकारण्याचा वैभवने प्रयत्न केला असल्याचे सांगितले आहे. तसंच ही भूमिका आपल्या चाहत्यांना नक्की आवडेल असा विश्वासही वैभवला वाटत आहे. त्यामुळे आता वैभवचा हा शो कधी प्रसारित होत आहे याकडेच त्याचे चाहते डोळे लावून बसले आहेत. सोनी लिव्हने आतापर्यंत अनेक वेगवेगळे शो आणि वेबसिरीज दिल्या आहेत. त्यापैकीच हा शो देखील नक्कीच प्रेक्षकांना आवडेल आणि प्रेक्षक या शो ला भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वास वैभवलादेखील आहे. दरम्यान वैभव आता अजून कोणत्या नव्या प्रोजेक्ट मध्ये काम करणार आहे याचीही आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मात्र पुढच्या प्रोजेक्टविषयी वैभवने अजूनही कोणतीही वाच्यता केलेली नाही.
शिव- वीणाच्या ब्रेकअपच्या बातमीवर या व्हिडिओने फिरवले पाणी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक