ADVERTISEMENT
home / मनोरंजन
विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे नात्यात असल्याच्या चर्चांना उधाण

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे नाते करणार का घोषित, चर्चांना उधाण

‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) या मालिकेतून घराघरात पोहचलेला आदित्य अर्थात अभिनेता विराजस कुळकर्णी (Virajas Kulkarni) गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. मालिकेमुळेे चर्चा तर आहेच. कारण मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर पोहचली असून आदित्यने सईसाठी प्रेम असल्याची कबुली दिली आहे. तर खऱ्या आयुष्यातही विराजस आपले नाते स्वीकारतोय की काय अशी चर्चा रंगली आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळेसह (Shivani Rangole) गेल्या काही दिवसांपासून एकत्र फोटो विराजस आपल्या सोशल मीडियाला पोस्ट करत असल्यामुळे विराजस कुळकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे हे दोघेही नात्यात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नाही तर विराजसच्या फोटोखाली कमेंट्समध्ये शिवानी तुझी बायको आहे का असे प्रश्नही विचारण्यात आले आहेत.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील ओंकार अर्थात शाल्व किंजवडेकरची वाढतेय क्रेझ

सिद्धार्थ – मितालीच्या लग्नातील फोटो व्हायरल

नुकतंच सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांचे लग्न पुण्यातील ढेपे वाड्यात पार पडले. या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.  मात्र लक्ष वेधून घेतलं होतें ते विराजस आणि शिवानी यांनी.  दोघांनीही पारंपरिक वेशभूषा  केली  असली तरीही विराजसचं जॅकेट आणि शिवानीचा ब्लाऊज हा दोन्ही एकमेकांना मॅच होत होता.  अर्थात ही फॅशन @fragrance_designs ने डिझाईन केली असल्याचे आपल्या पोस्टमध्ये विराजसने नमूद केले असले तरीही सिद्धार्थ आणि मितालीसहदेखील दोघांचा फोटो विराजसने पोस्ट केला आहे. त्यापूर्वीही शिवानीसह एक फोटो विराजसने फोटो पोस्ट केला आहे. लागोपाठ शिवानीसह फोटो शेअर केल्यामुळे अनेकांच्या मनात आता उत्सुकता निर्माण झाली  आहे. दोघांनीही नात्याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नसले तरीही दोघेही आपल्या सोशल मीडियावर मात्र एकमेकांसह फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण करत आहेत. विराजसला एका फोटोवर शिवानी बायको आहे का असं विचारल्यावर त्याने मजेशीर रिप्लाय दिला आहे. मात्र शिवानीबरोबर नक्की आपलं नातं  काय हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. विराजस म्हणाला, ‘मालिकेत आणि खऱ्या आयुष्यातही माझं लग्न करण्याच्या मागे का लागला आहात’. सध्या मालिकेतही आदित्य  अर्थात विराजस जी भूमिका साकारत आहे त्याच्या लग्नाचा घाट घातला जात आहे.  तर खऱ्या आयुष्यातही विराजस लग्नासाठी सज्ज झाला आहे का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे. 

वरूण धवननंतर आता श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बंधनात

ADVERTISEMENT

 

विराजस मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त

माझा होशील का या मालिकेतून घराघरात पोहचलेला विराजस हा अभिनेत्री मृणाल कुळकर्णीचा मुलगा आहे. मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने ही मालिका मिळवली असून सध्या या मालिकेच्या चित्रीकरणात विराजस व्यस्त आहे. तर शिवानीने आतापर्यंत अनेक मालिका केल्या असून सध्या शिवानी सिद्धार्थ चांदेकरसह ‘सांग तू आहेस का’ या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. शिवानीने अगदी लहान वयातच काम करण्यास  सुरूवात केली तर विराजसला अभिनयाचं बाळकडू हे त्याच्या आजोबा आणि आईकडूनच मिळालं आहे असं म्हणायला हवं. विराजसचे आजोबादेखील अभिनय क्षेत्रातच होते आणि त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमधून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता विराजस आणि शिवानी आपलं नातं कधी स्वीकारतात याकडेच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मालदीव्समध्ये करतेय रोमान्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
27 Jan 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT