सेलिब्रिटींचे लग्न म्हणजे सगळ्यांसाठीच एक वेगळी बातमी असते. त्यात आपल्या लाडक्या कलाकारांच्या लग्नाच्या गोष्टी असतील तर हा आनंद इतका जास्त असतो की, त्याची चर्चा सगळीकडे होते. आता अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचेच घ्या ना. त्यांच्या रिलेशनशीपबद्दल कळल्यापासून त्यांच्या लग्नाची उत्सुकता आता सगळ्यांनाच आहे. ते लग्न कधी करतील याच्या प्रतिक्षेत असलेल्यांना आज थोडा धक्का बसणार आहे. कारण विराजस आणि शिवानी यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे फॅन्सना त्यांनी लग्न केल्याचा सुखद धक्का बसला आहे. दरम्यान हे सगळे नक्की काय आहे ते घेऊया जाणून
पोस्ट करुन दिला धक्का
शिवानीने तिच्या इन्स्टाला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विराजस शिवानीला मंगळसूत्र आणि वरमाळा घालताना दिसत आहे. त्यामुळे यांनी गुपचूप लग्न केले अशी एकच वावटळ उठली. पण थोडा ब्रेक मारा. कारण हा व्हिडिओ पाहून आम्हालाही आधी तेच वाटलं होतं. पण असे झालेले नाही. हे त्यांची पोस्ट नीट पाहिल्यावर कळले आहे. कारण शिवानीने याखाली लिहिलेली कॅप्शन. शिवानीने यात म्हटले आहे की, bts … आता अगदी शेंबड्या मुलाला देखील याचा अर्थ चांगलाच माहीत आहे. याच्या माहितीनुसार त्यांनी एक शूट दरम्यान हे काढलेले फोटोज आहेत. त्यांच्या येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये ते दिसणार आहेत. ज्यामुळे अनकांची निराशा झाली आहे. पण लवकरच हा क्षण पाहायला मिळेल अशी यादोघांनी अपेक्षा आहे.
दोघांनीही दिली कबुली
एखादा नवा सेलिब्रिटी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि लोकांच्या नजरेत बसल्यानंतर तो काय काय करतो. त्याच्या आवडीनिवडी काय याकडे सगळ्यांचेच लक्ष असते. विराजस ‘माझा होशील ना’ या मालिकेतून सगळ्यांच्या भेटीला आला. अनेकांना तो या मालिकेतून आवडला. त्याच्या इन्स्टाग्रावर जशी त्याला प्रसिद्धी मिळू लागली. लोकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. अभिनेत्री शिवानी रांगोळे ही देखील फारच प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व. तिने हिंदी, मराठी मालिकांमधून काम केले आहे. या दोघांचे एकमेकांशी असलेले नाते त्यांनी कधीच लपवले नाही. त्यांन त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत जे अनेकांना आवडले देखील होते. त्यामुळे त्या दिवसापासून हे दोधे लग्नगाठ कधी बांधतील अशी वाट सगळेच पाहात होते. आता या दोघांच्या लग्नाची वाट सगळे पाहात आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा
विराजसबद्दल सांगायचे झाले तर तो अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा असला तरी देखील त्याने स्वत:ची ओळख स्वत:निर्माण केली आहे. तो या आधीही असिस्टंट म्हणून काम करत होता.त्याने मुख्य अभिनेता म्हणून माझा होशील का या मालिकेत काम केले त्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. तर शिवानीने देखील आपल्या बळावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे.
आता या दोघांच्या खऱ्या लग्नाची वाट सगळेच पाहात आहेत.