काळानुरूप बदलत चालेली संस्कृती आणि टेक्नोलॉजीच्या विश्वात अधिक गुंतत चाललेली पिढी. पण, आपल्या मुलीनेही टेक्नोलॉजीसोबत चालताना, प्रगत देशात वावरताना पारंपरिक गोष्टी वाचत, मोठ व्हावं म्हणून त्याने तिच्यासाठी तिच्या भावविश्वाशी जवळीक साधणारं पुस्तक लिहिण्याचं ठरवलं. कल्पना सत्यात उतरतं गेली, वेणूच्या खेळण्यातील डॉनल्ड डक झाला ‘डीटेक्टीव्ह डकी’, गणपती बाप्पा झाला ‘गणू’, जेलू , सूपरसोनेरी आणि यातील मुख्य पात्र ठरली ती वेणू… ‘वेणू’साठीच्या या पुस्तकातील एक-एक पात्र विनोदाच्या लिखाणातून आकार घेतं गेलं, आणि तयार झाला तब्बल 100 गोष्टींचा एक संच. या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. प्रत्येक गोष्टीतून मिळणारा बोध वेगळा आहे. या अनोख्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर सचिन गोस्वामी, सचिन मोटे, देवेंद्र पेम, अभिनेता विनोद यांची आई लक्ष्मी गायकर यांच्या उपस्थितीत रंगला. तर अभिनेता असणाऱ्या विनोद गायकर लिखित ‘वेणूच्या गोष्टी’ आता मुलांच्या वाचनासाठी बालसाहित्यामध्ये दाखल झाल्या आहेत.
बापाची आपल्या लहान मुलीला अनोखी भेट
वेणूच्या पाचव्या वाढदिवशी विनोदने हे पुस्तक वेणूला भेट म्हणून दिलं. वेणूला तिच्या लाडक्या बाबाकडून ‘वेणूच्या गोष्टी’ हे भेट मिळाले पुस्तकं प्रचंड आवडलं. काही दिवसांनी विनोदने सोशल मीडियावर या अनोख्या पुस्तकाविषयी सांगितलं. काहींनी पुस्तकं पाहिलं आणि आपल्या लहानग्यांसाठी हे पुस्तक मिळावं अशी मागणी केली. ही मागणी वाढली आणि अखेर विनोदने प्रत्येकी २५ गोष्टींचा एक असं ४ पुस्तकांचा एक संच प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि हाच खरा मोठा आनंद होता असं आपलं मनोगत व्यक्त करताना अभिनेता विनोद यांने सांगितले. तर याबद्दल विनोदशी आम्ही संवाद साधाल, यावेळी भावूक विनोदने आपल्या भावना व्यक्त केल्या, ‘अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करताना असणारी जबाबदारी आणि एक बाप म्हणून मुलींसाठी संस्कार करण्याच्या आणि परंपरा जपण्याच्या हेतूने लिहिलेलं हे पुस्तक आता सगळ्यांसाठी उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. आता वाचकांनाही हे पुस्तक आवडेल आणि यातूनच अधिक नव्या गोष्टी घेऊन तुमच्या समोरं यायला मला नक्की आवडेल’.
सचिन गोस्वामींनीही केलं कौतुक
‘आमचं बालपण हुंदडण्यात, मौजमस्ती करण्यात गेलं; पण वेणूचं तसं जाणार नाही. वेणू मौज-मजा करणार, खेळणार, हसणार, बागडणार; मात्र त्याच जोडीने तिला वाचनाची आवड लागणार. याचे श्रेय वेणूचा बाबा विनोद गायकर याला जाते. हे पुस्तक फक्त विनोदच्या वेणूसाठी नाही, तर लाखो-करोडो वेणूसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या पुस्तकाची बाल साहित्य वर्तुळात नक्कीच दाखल घेतली जाईल,’ असे मत ज्येष्ठ लेखक सचिन गोस्वामी यांनी मांडले.
“इंटररनेट, मोबाईल फोनच्या युगात वेणूच्या वयातील मुलं पुस्तकं आणि वाचनापासून दूर जात आहेत. अशावेळेस मुलांना पुन्हा वाचनाकडे वळण्याचे काम विनोदने वेणूपासून केले आहे, ते अतिशय चांगले आहे. आई वडिलांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त पैसे कमवण्यापेक्षा त्यांना वेळ दिला पाहिजे, त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. मला वाटते, विनोदने त्याची सुरुवात स्वतःपासून केली आहे. हा स्टुस्त्या उपक्रम आहे, असे सचिन मोटे म्हणाले.
काळासोबत पुढे जाताना वाचन संस्कृती जगावी, टेक्नोलॉजीच्या बरोबर धावताना हातात पुस्तक घेऊन वाचन करण्याचा आनंद वेणूला मिळावा म्हणून तिच्या आणि तिच्यासारख्या अनेकांच्या भावविश्वाशी जवळीक साधणारं ‘वेणूच्या गोष्टी’ हे पुस्तक आहे. तर मुलांना वाचनाची गोडी लावणं सध्या खूपच गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या मुलांसाठीही तुम्ही हे पुस्तक नक्कीच घेऊन थोडा वेगळा मार्ग आता निवडण्याची गरज आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक