ADVERTISEMENT
home / मनोरंजन
या मराठी अभिनेत्याला एक्सप्रेस वे वर लुटले, आरोपीचा शोध सुरू

या मराठी अभिनेत्याला एक्सप्रेस वे वर लुटले, आरोपीचा शोध सुरू

सध्या कधी कुठे काय होईल याचा काहीच नेम देता येत नाही. मुंबई पणे एक्सप्रेस हायवे वर आता चालकांना लुटणारी टोळी सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. याला बळी पडला आहे तो म्हणजे ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहोनी (Yogesh Sohoni). योगेश सोहोनीला 50 हजारांना लुटण्यात आल्याचे आता समोर आले आहे. ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे आणि यामध्ये एक जण जखमी झाला असून पोलिसात तक्रार द्यावी लागेल. पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर सव्वा लाख रूपये दे’ अशी मागणी करत योगेश याला जबरदस्तीने एटीएममधून 50 हजार रूपये काढायला लावण्यात आले.  

मराठी मालिकांना झालंय तरी काय, दर्जा घसरला

योगेशवर करण्यात आली जबरदस्ती

योगेश सोहोनीला आपण मालिकांमध्ये पाहतो. पण असा प्रसंग मालिकेत नाही तर त्याच्या खऱ्या आयुष्यात आला आहे. ही घटना मुंबई पुणे द्रूतगती महामार्गावर सोमाटणे एक्झिटजवळ घडली आहे. मराठी अभिनेता योगेश सोहोनीना आता यासंदर्भात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या या एफआयआरनुसार आता सदर स्कॉर्पिओ गाडीचा आणि आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात झाली आहे. योगेश कारमधून मुंबईला येत असतानाच ही घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे ही घटना सकाळी पावणेआठच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. सोमाटणे एक्झिटजवळ एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओच्या चालकाने हात दाखवून योगेशला थांबण्यास सांगितले. योगेशने कार थांबवल्यानंतर एका व्यक्तीने त्याला धमकावत त्याच्याकडून पैशाची मागणी केली. सोमाटणे फाटा येथील एटीएमजवळ नेऊन त्याला पैसे काढण्यास भाग पडले. तर योगेशने पैसे काढले असता ते पैसे जबरदस्तीने घेऊन स्कॉर्पिओ चालक पळून गेला आहे. परंदवडी पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

151 पारितोषिक पटकवणारी सोन्याहून पिवळी ‘काळी माती’

ADVERTISEMENT

कोणावरही अशी वेळ येऊ शकते

ही टोळी सक्रिया झाल्याने अशी वेळ कोणावरही येऊ शकते. म्हणूनच योगेशने योग्य पाऊल उचलत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सध्या योगेश सोहोनी हा मुलगी झाली हो या मालिकेतून शौनक जहागीरदार या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. त्याची ही भूमिका सर्वांनाच आवडते आहे. मराठी मालिका अस्मिता मधून त्याने आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे तो घराघरात पोहचला होता. आता या प्रकरणामुळे योगेश नक्कीच थोडा धास्तावला असणार. पण तरीही हिंमत करून त्याने पोलीस ठाण्यात जाऊन योग्य पाऊल उचलले आहे. योगेश सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असतो. आपले वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतो. योगेशचा फॅन फॉलोईंगही चांगला आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर योगेशला लुटणाऱ्या या आरोपींना पकडण्यात यावं असंच त्याच्या चाहत्यांनाही वाटत असणार यात शंका नाही. तसंच पुढे कोणालाही याचा त्रास होऊ नये असंही आता सर्वांच्या मनात असणार. सद्यस्थिती पाहता या घटना वाढत चालल्याचेही दिसून येत आहे. सध्या याचा फटका मात्र योगेश सोहोनीला बसला आहे. पण अनेक कलाकारा या मार्गावरून ये – जा करत असल्यामुळे त्यांनाही एक प्रकारचा हा धडाच मिळाला असल्याचे दिसून येत आहे. 

सोनू सूद आणि सलमानला बनवा पंतप्रधान,राखी सावंतने केली मागणी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT