ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘या’ कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे टीआरपी झाला कमी

‘या’ कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे टीआरपी झाला कमी

टीव्ही हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधील काही कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर इतकी छाप सोडलेली असते की, ती मालिका एखाद्या कलाकाराने मध्येच सोडली तर त्या मालिकेचा टीआरपी अचानक खाली येतो आणि मालिका बघणं प्रेक्षक बंद करतात. बऱ्याचदा अशा मालिका बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कारण त्यानंतर त्या जागी आलेला कलाकार प्रेक्षकांना त्या भूमिकेत योग्य वाटत नाही अथवा पहिल्या कलाकाराने इतके दमदार काम केलेले असते की, त्याची छाप प्रेक्षकांना मनातून काढून टाकणं शक्य होत नाही. अशाच काही कलाकारांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या कलाकारांनी मालिका सोडल्यानंतर पुन्हा त्या मालिकेला चांगला टीआरपी मिळू शकला नाही.

सुशांत सिंह राजपूत – पवित्र रिश्ता

सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) प्रसिद्धी तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. सुशांतने आत्महत्या केल्यानंतरही त्याची प्रसिद्धी तशीच टिकून आहे. सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरची सुरूवात ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेपासून केली. मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘पवित्र रिश्ता’मधील मानव या भूमिकेमुळे. या भूमिकेने त्याला सर्व काही मिळवून दिले.  रातोरात स्टार झालेल्या सुशांतने ही भूमिका जगली. प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर उचलून धरले. मात्र काही वर्षांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सुशांतही ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सुशांत असताना या मालिकेचा टीआरपी टॉपवर होता. मात्र सुशांतने ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेचा टीआरपी पुन्हा कधीही वर आला नाही आणि काही वर्षातच मालिका गुंडाळावी लागली. 

करण सिंह ग्रोव्हर – कबूल है

करण सिंह ग्रोव्हर (Karan Singh Grover) हे टीव्हीवरील गाजलेले नाव. आजही करण सिंह ग्रोव्हरच्या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. ‘कबूल है’ या मालिकेत असद अहमद खान ही भूमिका करणने साकारली होती. पहिल्याच काही महिन्यात करणची ही मालिका पहिल्या 5 मध्ये टॉपवर होती आणि करण सिंह ग्रोव्हर या मालिकेचा भाग असेपर्यंत ही मालिका कायम टॉपवर राहिली होती. मात्र करणसिंहने देखील चित्रपटात काम करायचे असल्यामुळे मध्येच ही मालिका सोडली आणि त्यानंतर या मालिकेला जास्त टीआरपी मिळू शकला नाही. त्यानंतर त्याची भूमिका राकेश बापटने साकारली होती. ही मालिका 4 वर्ष चालू होती. मात्र करण सिंह ग्रोव्हरची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. 

‘बिग बॉस 14’ चा ग्रँड प्रिमियर होणार ‘या’ दिवशी, लवकरच कळणार थीम

ADVERTISEMENT

दीपिका कक्कर – ससुराल सिमर का

‘ससुराल सिमर का’ या मालिकेने दीपिका कक्कर (Dipali Kakkar) हा घराघरातील ओळखीचा चेहरा झाला. ही मालिका टीआरपीच्या टॉप लिस्टमध्ये होती. 7 वर्ष या मालिकेत दीपिकाने काम केले. पण त्यानंतर दीपिकाने ही मालिका सोडली. सतत एकाच भूमिकेत राहून दीपिकाला कंटाळा आल्याने तिने ही मालिका सोडली होती. मात्र दीपिकाने ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेचा टीआरपी घसरत गेला आणि त्यानंतर ही मालिका बंद करावी लागली होती. या मालिकेमध्ये दाखविण्यात येणाऱ्या काही गोष्टी या न पटणाऱ्या असूनही प्रेक्षक ही मालिका केवळ दीपिकासाठी पाहत होते. 

‘बिटरस्वीट’ चित्रपट बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल

राजीव खंडेलवाल – कहीं तो होगा

सुजल ही भूमिका साकारणारा राजीव खंडेलवाल (Rajeev Khandelwal) सर्वांच्या मनात रूतून बसला होता. ‘कहीं तो होगा’ या मालिकेने राजीव खंडेलवालला रातोरात स्टार बनवले. इतकंच नाही तर त्याची आणि अमना शरीफची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडत होती. ही मालिका इतकी प्रसिद्ध होती की, बरेच वर्ष टीआरपीच्या रेसमध्ये टॉप 10 मध्ये या मालिकेचे नाव होते. पण चित्रपटात काम करण्यासाठी राजीवने ही मालिका सोडली आणि त्यानंतर या मालिकेचा टीआरपी घसरत गेला. प्रेक्षकांनी ही मालिका बघणं सोडून दिलं. याचा टीआरपी इतका घसरला की, काही महिन्यांतच ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्याना घ्यावा लागला. 

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या विरोधात पत्नीची पोलिसात तक्रार

ADVERTISEMENT

सिझेन खान – कसौटी जिंदगी की

‘कसौटी जिंदगी की’ मधील अनुरागची भूमिका साकारणारा सिझेन खान (Cezaane Khan) हा प्रेक्षकांचा आवडता कलाकार होता.  श्वेता तिवारी आणि सिझेन खानची केमिस्ट्री प्रेक्षकांनी इतकी आवडली होती की, ही मालिका बऱ्याचदा टीआरपीमध्ये 1 क्रमांकावर असायची. पण सिझेन खानने मध्येच ही मालिका सोडली. त्याच्या जागी हितेन तेजवानीला ही भूमिका मिळाली.  पण तरीही प्रेक्षकांनी ही मालिका बघण्याचे नाकारले. सिझेनने मालिका सोडल्यानंतर या मालिकेचा टीआरपी घसरत गेला. ही मालिका जवळजवळ 7 वर्ष टीव्हीवर चालू होती. या मालिकेने बऱ्याच कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT