रियालिटी शो म्हणजे स्क्रिप्टेड असतात आणि त्याला काही अर्थ नाही असं म्हटलं जातं. पण याच रिलालिटी शो ने मनोरंजन क्षेत्राला काही अफलातून प्रसिद्ध चेहरे मिळवून दिले आहेत. यापैकी काही कलाकार आज अत्यंत यशस्वी असून त्यांची सुरूवात रियालिटी शो मधून झाली होती. आज त्यापैकी बरेच जण निवेदक, परीक्षक अशी भूमिकाही करत आहेत. आपल्या मेहनतीने आणि रियालिटी शो मध्ये संधी मिळाल्याने हे कलाकार आज इथपर्यंत येऊन पोहचले आहेत. अशा काही यशस्वी कलाकारांविषयी जाणून घेऊया.
1. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)
अंकिता लोखंडे हे नाव कोणाला माहीत नाही? ‘पवित्र रिश्ता’ मधील अर्चना ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. मात्र अंकिताने आपल्या करिअरची सुरूवात ही रियालिटी शो मधून केली होती. ‘सिनेस्टार की खोज’ या रियालिटी शो ने बऱ्याच नव्या तरूण मुलामुलींना आपले अभिनय कौशल्य दाखविण्याची संधी दिली होती आणि यामध्येच अंकितानेही सहभाग घेतला होता. 2005 मध्ये आलेला हा शो खूपच गाजला होता आणि या शो मधून अनेकांना संधी मिळाली होती. अशा प्रकारचा हा पहिलाच शो होता आणि त्यानंतर अंकिताने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. अंकिता केवळ मालिकांमध्येच नाही तर आता चित्रपटांमधूनही आपला ठसा प्रेक्षकांवर उमटत आहे.
2. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)
‘मला जाऊ द्या ना घरी’ या मराठी गाण्याने एका रात्रीत स्टार झालेल्या अमृताची सुरूवातही ‘सिनेस्टार की खोज’ या रियालिटी शो ने झाली होती. त्यानंतर अमृताने कधीही मागे वळून पाहिले नाही. याच शो मध्ये तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार हिमांशू मल्होत्राही भेटला. अमृताने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातून काम केले आहे. इतकंच नाही तर ‘नच बलिये’ या रियालिटी शो ची अमृता – हिमांशू ही जोडी विजेती ठरली. अमृता एक उत्तम डान्सर असून अनेक मराठी चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. तर आता ती हिंदी चित्रपटातही उत्तम काम करत आहे. इतकंच नाही तर नुकतंच तिने ‘खतरों के खिलाडी’ हा रियालिटी शो करून आपण इथे टिकून राहायलाच आलो आहोत हे दाखवून दिले आहे.
Good News: गेल्या महिन्यात आई-वडील गमावलेल्या या अभिनेत्याने दिली मुलगा झाल्याची गोड बातमी
3. ऋत्विक धनजानी (Rithvik Dhanjani)
एका डान्स शो मध्ये सहभागी झालेल्या ऋत्विकला जास्त पुढपर्यंत जाता आलं नव्हतं. याची त्याला खंत होती. मात्र असं असलं तरीही त्याच्या उत्कृष्ट नृत्यामुळे त्याच्याकडे अनेकांचं लक्ष गेलं होतं. मात्र त्यानंतर ऋत्विकने अनेक मालिकांमध्ये काम करत आपल्या कामाचा ठसा उमटवला. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेने त्याला ओळख मिळवून दिली. आज ऋत्विक लहान पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. अनेक रियालिटी शो चा निवेदक म्हणून ऋत्विक उत्तम काम करत आहे. अभिनयासह एक उत्तम निवेदक म्हणूनही ऋत्विकने नाव कमावलं आहे. तर ‘खतरों के खिलाडी’मध्येही एक तगडा स्पर्धक म्हणून ऋत्विक समोर आला होता.
करण जोहरच्या घरात झालेल्या ‘त्या’पार्टीची होणार चौकशी
Raghav Juyal
राघव जुयाल हे नाव घराघरात पोहचलं ते डान्स रियालिटी शो मुळे. आपल्या युनिक स्लो मो स्टाईलमुळे प्रत्येकाला राघव आवडू लागला. पण त्यातही महत्त्वाचं म्हणजे त्याचे कॉमेडी टायमिंग. राघवने डान्स रियालिटी शो नंतर अनेक शो मध्ये निवेदक म्हणून काम केले. इतकेच नाही तर राघव आता वेबसिरीज आणि हिंदी चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे. राघव सुरूवातीला ‘कॉकरोच’ या नावाने प्रसिद्ध होता. आजही अनेक मुलांना राघव हा आपला आदर्श वाटतो आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊन त्याच्यासारखा डान्स करावा अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. गेल्या काही वर्षात राघवने आपला ठसा उमटवला आहे.
शुभो महालया’साठी रिताभरी चक्रवर्तीने धारण केली दुर्गेची ही विविध रूपं
5. धर्मेश येलांडे
‘बेजुबा केहता मैं रहा’ हे गाणं धर्मेशसाठीच आहे असंच वाटून जातं. कमी बोलणारा पण आपल्या डान्समधून प्रेक्षकांना आपलंसं करणारा धर्मेश हादेखील डान्स रियालिटी शो मधून पुढे आला आहे. आपल्या अफलातून मुव्ह्जने धर्मेश प्रसिद्ध झाला. आज धर्मेश रियालिटी शो चा परीक्षक म्हणून काम करत आहे. तर अनेक हिंदी, गुजराती चित्रपटांमधूनही धर्मेशने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. आजही अनेक मुलं धर्मेश कडून डान्स शिकता यावा यासाठी प्रयत्न करत असतात. तर धर्मेशला नवी पिढी डान्सच्या बाबतीत आदर्श मानते. आजही धर्मेशच्या काही स्टेप्स नव्या पिढीतील मुलांनी केल्या तरीही धर्मेशची सर कोणालाच येत नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक