ADVERTISEMENT
home / मनोरंजन
शालूने दिले असे सणसणीत उत्तर

फँड्रीच्या शालूने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल, म्हणाली…

एखाद्या गोष्टीवरुन सेलिब्रिटींना ट्रोल करणे आता काही नवीन राहिलेले नाही. त्यांनी कोणतीही पोस्ट केल्यानंतर एकादी फोटो आवडला नाही किंवा पटला नाही की त्यावर खूप जण वाईट कमेंट करतात. सेलिब्रिटीही माणसं असतात. त्यांनाही काही कमेंट्स या फारच खटकतात. खूप सहन करुन झाल्यानंतर एखादेवेळी राग इतका अनावर होतो की, त्यावर कमेंट करणे किंवा त्याचे उत्तर देणेही त्यांना गरजेचे वाटते. असेच काहीसे घडले आहे फँड्री फेम शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरातने त्या व्यक्तिला सणसणीत उत्तर दिले आहे. जाणून घेऊया राजेश्वरीसोबत नेमके काय घडले.

डान्स व्हिडिओ पाहून झाली ट्रोल

राजेश्वरी तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन काहीना काही व्हिडिओ शेअर करत असते. यामध्ये बहुतेकवेळा बरेच रिल्स व्हिडिओ असतात.ती जे व्हिडिओ बनवते ते अनेकांना आवडतात. पण काहीच दिवसांपूर्वी तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने शॉर्टस घातली आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचा एक टीशर्ट घातला असून ती या कपड्यात नाचताना दिसत आहे. पण तिचा हा व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडलेला दिसत नाही. कारण खूप जणांनी तिला तिच्या कपड्यांवरुन कमेंट करायला सुरुवात केली. त्यामध्ये खूप जणांनी तिला तिच्या कपड्यांवरुन टिका करत असे कपडे अजिबात घालू नकोस असा सल्ला दिला आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कपडे असे घालू नकोस. तू अमूक एक करु नकोस असे म्हणणाऱ्यांना तिने चांगलेच उत्तर दिले आहे. 

काय म्हणाली राजेश्वरी

मुलांच्या आणि खूप जणांच्या कमेंट्स या तिच्या कपड्यांवर चर्चा करणाऱ्या असल्यामुळे राजेश्वरी चांगलीच चिडलेली दिसत आहे. कारण तिने फेसबुकवर आलेल्या कमेंटला रिप्लाय करत चांगलीच कानउघडणी केली आहे. राजेश्वरी यामध्ये लिहते की, 

अरे यार, मी काय म्हणतेय..तुम्ही सर्वजण माझ्यावर एवढे प्रेम करता माझ्या सर्व post तुम्हा सर्वांमुळे चर्चेत येतात, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खरच मनापासून आभार मानते. 😊❤🙏🏻आणि फक्त एवढेच सांगते की, मला troll झाल्याने काही एक फरक पडत नाही मित्रांनो.फक्त एवढाच जोर असेल, पुरुषत्व (मर्दानगी) दाखवायची जास्तच हाैस असेल तर एका मुलीच्या comment box मध्ये दाखवण्यापेक्षा तुमच्या नेत्या समोर दाखवा. 😊मला बोलता ना, पूरग्रस्तांसाठी काही केले का, की फक्तं shorts घालून नाचतेय etc .. अरे मूर्खांनो, या सर्व कामांसाठी सरकार प्रशासन जबाबदार आहे, तुम्ही ज्याला निवडून दिले तो so called “साहेब, नेता” जबाबदार आहे मी नाही. 😂तेथे गार पडता म्हणुन कोणालाही जोर दाखवायचा ???मी मान्य करते की सर्वांनी मदतीचा हात दिला पाहिजे परंतु आपण जो tax भरतो ना, त्याचा जाब विचारायला पण शिका नाहीतर आहेच माझ्या comment box मध्ये जागा.. Always Welcome असे भलेमोठे उत्तर देत तिने तिला विचित्र कमेंट देणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. राजेश्वरीचे तुम्ही चाहते असाल तर तुम्हाला राजेश्वरीचे म्हणणे नक्की पटेल.

ADVERTISEMENT

अधिक वाचा

सब्यसाचीच्या नवीन साडीची किंमत ऐकून नेटकऱ्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

शमिताच्या वयावरून अक्षरा आणि ऊर्फीने घेतली फिरकी, म्हटले ‘मावशी’

गौहर खान करणार पहिल्यांदाच पती झैदबरोबर स्क्रिन शेअर

ADVERTISEMENT
16 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT