ADVERTISEMENT
home / मनोरंजन
आदिती पोहनकर

सगळीकडे होतेय आदिती पोहनकरच्या बोल्डनेसची चर्चा

मराठीतील अभिनेत्री आता वेगवेगळा प्रयोग करु पाहतात त्यामुळेच त्यांच्या कामाची चर्चा होताना दिसते. ‘आश्रम’ (Aashram) आणि ‘शी’ (She) या सारख्या सीरिजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती पोहनकर (Aditi Pohankanr) कोणाला माहीत नाही? असे अजिबात होणार नाही. आदितीने अभिनयाचा दर्जा इतका वाढवला आहे की रोलसाठी तिने केलेली मेहनत आणि बोल्ड सीन याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. तिच्या या दोन्ही सीरिजचे भाग प्रसिद्ध झाल्यानंतर आता आदितीच्या लुकची, कामाची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. या आधी आदिती रितेश देशमुखच्या चित्रपटात निगेटिव्ह रोलमध्ये दिसली होती. पण आता तिचा थाट हा प्रसिद्ध अभिनेत्रीनाही मागे टाकणारा आहे.

सुरुवात करुया she पासून

हॉट आदिती पोहनकर

आदितीच्या या सीरिजबद्दल सगळ्यात आधी सांगण्याचे कारण असे की, आदिती यामध्ये जितकी हॉट दिसतेय तितकी हॉट ती यापूर्वी कधीच दिसली नसावी. तिने या रोलसाठी जी मेहनत केली आहे ती तिच्या बॉडीवर दिसून येत आहे. यामध्ये तिने एका अशा अंडरकव्हर एजंटच काम केलं आहे. ज्यामध्ये तिला प्रॉस्टिट्युशनची भूमिका साकारायची होती. तिला यात सगळ्यात सुंदर एस्कॉर्ट दाखवण्यात आले आहे. त्यासाठी तिची फिगर ही कॅमेरासाठी सुंदर असणे फारच जास्त गरजेचे होते. बिकिनीपासून ते अगदी कोणत्याही कपड्यात ती यामध्ये सुंदरच दिसली आहे. तिला या लुकमध्ये पाहिल्यानंतर सुंदर, हॉट, सेक्सी अशा कमेंट आल्यावाचून राहणार नाही. अगदी सगळ्या फ्रेममध्ये ती यात खूपच सुंदर दिसली आहे. पहिल्या भागापेक्षा आता आलेला भाग हा अतिशय सेन्शुअस होता. 

आश्रममध्ये दिसली सुंदर

एका ढोंगीबाबाचा पर्दाफार्श करणारी अशी ही सीरिजही खूप जणांना आवडणारी होती. बातम्यांमध्ये अनेक ढोंगी बाबांचे सत्र सुरु असताना असाच एक व्यसनाधीन आणि वासनाधीन बाबा कसे तरुणींचे शोषण करत असतो हे दाखवणाही ही सीरिज आहे. आतापर्यंत याचे तीन सीझन आले आहेत. या तिन्ही सीझनमध्ये तिला कुस्तीपटू दाखवण्यात आले आहे. पहिल्या भागात ती तितकी फिट नक्कीच दिसत आहे. पण आता तिसऱ्या सीझनमध्ये ती बारीक दिसत असली तरी देखील ती खूप सुंदर दिसत आहे. यामधील तिचं काम हे वाखाणण्याजोगे आहे. या दोन्ही सीरिज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे तिला तितकीच चांगली पब्लिसिटी मिळाली आहे. त्यामुळे आता जिथे तिथे आदिती पोहनकरच दिसत आहे. 

फोटोशूटही असतात खूपच सुंदर

अभिनेत्री आदिती पोहनकर

आदिती सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते. ती तिचे नवे फोटो सतत पोस्ट करत असते. तिने तिच्या या प्लॅटफॉर्मवर शेअर केलेले फोटो खूपच सुंदर असतात. या फोटोमध्ये ती नेहमीच सुंदर दिसते. साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट ती या सगळ्यामध्येच सुंदर दिसते. तिचे हे फोटो आणि तिचे काम पाहता तिचे सध्या अच्छे दिन सुरु आहेत असे म्हणायला हवे. अल्पावधीत  ती प्रसिद्ध झाली असे वाटत असले तरी तिने यासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे यात काही शंका नाही. 

ADVERTISEMENT

आदितीचे काम तुम्हाला सगळ्यात जास्त कशात आवडले आम्हाला नक्की सांगा .

10 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT