ADVERTISEMENT
home / मनोरंजन
आता अभिज्ञा भावेच्या हटके मंगळसूत्राची चर्चा, खास आहे डिझाईन

आता अभिज्ञा भावेच्या हटके मंगळसूत्राची चर्चा, खास आहे डिझाईन

अभिज्ञा भावे हे नाव मराठी प्रेक्षकांना नक्कीच नवीन नाही. आपल्या अभिनयाने आणि आपल्या फॅशनने अभिज्ञाने सर्वांंच्याच मनावर छाप सोडली आहे. अभिज्ञाने नुकतेच एक महिन्यापूर्वी मेहुल पै याच्याशी विवाह केला आहे. आपल्या लग्नाचा एक महिन्याच्या वाढदिवसाचा फोटोही अभिज्ञाने पोस्ट केला होता. अनेक सेलिब्रिटींनी अभिज्ञा आणि मेहुलच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. तर अभिज्ञाने लग्नातही अगदी हटके रंग निवडून आपल्या फॅशनची पुन्हा एकदा जाणीव करून दिली होती. अभिज्ञाचा स्वतःचा फॅशन ब्रँड असून ती नेहमी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसून येते. मात्र आता पुन्हा एकदा तिची चर्चा आहे तिच्या हटके मंगळसूत्रामुळे. तिच्या या मंगळसूत्राचे डिझाईनही खास असल्यामुळेच सध्या तिचे मंगळसूत्र चर्चेत आले आहे.

तुझ्यात जीव रंगला’ मधील या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, चाहत्यांना सुखद धक्का

मंगळसूत्र आहे कुतूहलाचा विषय

सामान्य असो अथवा सेलिब्रिटी असो मंगळसूत्र हा नेहमीच कुतूहलाचा विषय असतो.  अगदी शिल्पा शेट्टी,  बिपाशा बाासू यांच्या मंगळसूत्रापासून ते दीपिका पादुकोणच्या  महाग मंगळसूत्रापर्यंत सर्वांनाच कुतूहल वाटते.  तसे आहे विशिष्ट डिझाईन याकडे महिला वर्गाचे अधिक लक्ष असते. मग मराठी अभिनेत्रींनीदेखील यामध्ये मागे का राहावं असा प्रश्न निर्माण होतो आणि आता यामध्ये  नाव घेतलं जात आहे ते अभिज्ञा भावेचं.  आपलं मंगळसूत्र इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असावं असं प्रत्येक नव्या नवरीला वाटतं. दोन वाट्या आणि मणी मंगळसूत्र हे तर सगळ्यांकडे असतंच.  पण त्याहीपेक्षा अनेक लोकांचं लक्ष वेधलं जावं असं मंगळसूत्र हवं असंही  वाटत असतं आणि त्यामुळे अनेक मालिकांमध्येही खास मंगळसूत्रांचे डिझाईन करून घेण्यात येते.  असंच वेगळं मंगळसूत्र अभिज्ञानेही करून घेतलं आहे.  आता यामध्ये खास काय  आहे म्हणून चर्चेत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, अभिज्ञाने घातलेल्या या मंगळसूत्रामध्ये M आणि A या दोन अक्षरांचा  समावेश करण्यात आला आहे. एम अर्थात अभिज्ञाचा नवरा मेहुल आणि आणि ए अर्थात अभिज्ञा. या दोन्ही अक्षरांच्या मधोमध बदाम आणि बाजूला दोन काळे मणी आहेत.  त्यामुळेच तिचे हे मंगळसूत्र हटके असून सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. 

सारा अली खानने काढली अक्कलदाढ, शेअर केला मजेशीर व्हिडिओ

ADVERTISEMENT

चार दिवस रंगला होता अभिज्ञाचा विवाहसोहळा

अभिज्ञाने अगदी थाटामाटात लग्न केले असून तिचा हा विवाहसोहळा चार दिवस रंगला होता. मेंदी, संगीत, ग्रहमख या सगळ्या कार्यक्रमांसाठी अभिज्ञा आणि मेहुलचा लुक खूपच व्हायरल झाला.  दोघांनाही अनेक जणांना  सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले. अभिज्ञाचा जितका फॅन फॉलोईंग आहे तितकीच तिला इंडस्ट्रीमध्ये मित्रमैत्रिणीही आहेत आणि या तिच्या सर्व मित्रमैत्रिणींनी तिला लग्नाच्या आधी केळवत देत तिच्या आयुष्यातील आठवणी अधिक चांगल्या केल्या आहेत. तसंच लग्नामध्येही तिच्यासाठी काही खास  योजना करत तिच्या या सर्व मित्रमैत्रिणींनी धमाल केली. यामध्ये श्रेया बुगडे, सौरभ गोखले, अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, इशा केसकर, रिषी सक्सेना या सर्व सेलिब्रिटींचा समावेश होता. एकंदरीतच अभिज्ञाचं लग्न तिच्याप्रमाणेच खास झाले आणि तिच्या या मंगळसूत्राच्या हटके डिझाईनचीही आता वाहवा होत आहे. असंच डिझाईन इतर महिलांनी करून घेतल्यास नक्कीच नवल वाटायला नको. 

Bigg Boss 14 : विकास गुप्ता करणार या अभिनेत्यांवर मानहानीचा दावा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT