अभिज्ञा भावे म्हटलं की आपल्याला एक हसतमुख असा चेहरा आठवतो. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे असलेले तिचे दु: ख तिने कधीही कोणाला दाखवून दिले नाही. तिचा नवरा मेहुल पै हा कॅन्सरशी झुंज देत आहे. या आधी तिने कधीही याबद्दल सांगितले नाही. पण थेरपी दरम्यान एक जोडीदार म्हणून तिने नवऱ्याची पुरेपूर साथ दिली. त्या दरम्यानचा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून अनेक जण भावनिक झाले आहेत. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढणे हे काही खाऊचे काम नाही. अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. त्यात अनेकदा खचायला होते. पण योग्य व्यक्तिची साथ मिळाली तर हा प्रवास अधिक चांगला होतो हे या उदाहरणावरुन दिसून आले आहे.
अभिज्ञाने शेअर केला व्हिडिओ
सेलिब्रिटी आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी आपण निरखून पाहात असतो. ते कसे दिसतात. कसे राहतात यावर आपल्या कमेंट्स सतत पडत असतात.पण त्यांच्या आयुष्यातही दु:ख असतात. ज्यांना सामोरे जाताना ते ही लढतात. अभिज्ञा भावेचा नवरा मेहुल पै याला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी अभिज्ञाने सर्वतोपरी साथ दिलेली दिसतेय. तिने एक नवा रिल व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत थोडीशी मजा करताना दिसत आहे. अनेकांनी त्यांना तुम्ही एक उत्तम जोडी असल्याच्या कमेंटही केल्या आहेत. मेहुलचे केस यामध्ये गेलेले दिसत आहे. त्यामुळे तो कठीण अशा किमोथेरपी करत असावा असे दिसत आहे. अर्थात अशावेळी एखाद्या व्यक्तिचा आत्मविश्वास गळून पडतो. पण अभिज्ञामुळे मेहुलमध्ये अधिक आत्मविश्वास पाहायला मिळत आहे. जो अनेकांना आवडला आहे.
वाढदिवसही केला खास साजरा
अभिज्ञाचा इन्स्टा चाळल्यानंतर तिने अनेकदा मेहुलसोबत काही खास फोटोज आणि व्हिडिओज शेअर केलेले दिसतात. तिच्या वाढदिवशी तिने मेहुलसोबत खास डॉग शेल्टरला भेट दिलेली दिसत आहे. या व्हिडिओत तिने मेहुलसोबत आपले काही आणखी खास क्षण शेअर केले आहेत. मेहुलने या दरम्यान कॅप घातली आहे.त्याच्याकडे पाहता तो या दरम्यान आपल्या ट्रिटमेंटवर असावा असे दिसते. पण अभिज्ञाने याची जाणीव त्याला अजिबात होऊ दिलेली नाही. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरही एक गोड हसू आहे.
मेहुलच्या आजाराबाबत दिली होती माहिती
मेहुलच्या आजाराबाबत अभिज्ञाने तिच्या इन्स्टावरुनच माहिती दिली होती. 3 जानेवारी रोजी तिने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने त्याच्या आजाराबद्दल सांगितले होते. पण तो पर्यंत त्याने अर्धी लढाई लढली होती. कारण या नव्या वर्षात तिने नवा आनंद येईल असे सांगितले होते. त्यामुळे या इतक्या दिवसांमध्ये तिने कोणाला काहीही कळू दिले नव्हते. तिने नवऱ्याची साथ देत त्याला यातून बाहेर काढले होते. त्यानंतरच सगळ्यांना ही गोष्ट कळली होती.
अभिज्ञाचा हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारा आहे इतके नक्की.