ADVERTISEMENT
home / मनोरंजन
actress-akshaya-gurav-rivanawayli-to-release-on-8-th-april-in-marathi

अक्षया गुरवची ‘बंडखोरी’ रिवणावायली मधून येणार समोर

मराठी चित्रपट हा नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटकांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी प्रेक्षकांना देत आला आहे. हेच मराठी चित्रपट हे बहुआयामी आणि विषयातील वैविध्य यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या चित्रपटातून कलाकारांची सामाजिक जाणीवसुद्धा लक्षात येत असून बिटरस्वीट या चित्रपटाच्यानंतर अभिनेत्री अक्षया गुरव (Akshaya Gurav) पुन्हा एकदा एका सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा हा चित्रपट असून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे. 

8 एप्रिलला होणार चित्रपट प्रदर्शित 

रिवणावायली असे या चित्रपटाचे नाव असून, येत्या 8 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटही आपल्या भूमिकेविषयी अक्षया सांगते ‘सामाजिक दृष्टया कितीही पुढारलेलो असलो तरी कुठे ना कुठे अनिष्ट रूढी परंपरा या आपल्या पाठीमागे तग धरून असतात. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत कितीही जनजागृती होत असली तरी कुठेतरी समाजात अनेक स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. तर शिकलेल्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासून सुद्धा अडवलं जात आहे. अशाच एकदा बंडखोर मुलीची तिच्या संघर्षाची कथा म्हणजे रिवणावायली. तर याच चित्रपटाच्या विषयी पुढे ती सांगते ‘कलाकार आपल्या कलेतून समाजाचं एक प्रतिबिंब उभं करत असतो. कलाकार समाजाचा देणेकरी असतो, त्याने सामाजिक विषय हाताळताना विषयाची संवेदनशीलता जाणून घेणे आणि त्यावर योग्य ती भूमिका घेणं ही त्याची जबाबदारी असते. तीच जबाबदारी मी या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे.’ आजही अनेक ठिकाणी महिलांना शिक्षण मिळत नाही अथवा अनेक ठिकाणी महिलांनी शिकणं का गरजेचे आहे अशा स्वरूपाचा दृष्टीकोन पाहिला जातो. मात्र एक महिला शिकली तर संपूर्ण घर शिकतं याबाबत काही भागांमध्ये आजही जनजागृती होणे गरजेचे आहे. 

साकारत आहे ऐश्वर्या देसाई ही भूमिका 

Actress Akshaya Gurav

अक्षया या चित्रपटात ‘ऐश्वर्या देसाई’ हे पात्र साकारत असून ती उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे (Shashank Shende), देविका दफ्तरदार (Devika Daftardar), आकाश नलावडे (Akash Nalawade), संतोष राजेमहाडिक (Santosh Rajemahadik), प्रताप सोनाली (Pratap Sonali) आणि कल्याणी चौधरी (Kalyani Choudhury) या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

दरम्यान अक्षयाने याआधी मालिकांमध्ये काम करून घराघरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. अक्षयाने फारच कमी वेळात नाव कमावले असून ती सोशल मीडियावरही नेहमीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे आता अक्षया या चित्रपटामध्ये नक्की कशी छाप पाडते आणि तिचा अभिनय कसा असेल याचीच वाट तिचा चाहतावर्ग नक्कीच पाहत आहे यात शंका नाही. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

30 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT