ADVERTISEMENT
home / मनोरंजन
पाहा कोण दिसणार दयाबेनच्या भूमिकेत

पाहा कोण दिसणार दयाबेनच्या भूमिकेत

तारक मेहता का उल्टा चश्मा ही टीव्हीवरील बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेली आणि प्रेक्षकांची आवडती कॉमेडी सीरियल आहे. त्यामुळे टीव्ही प्रेक्षकांच्या मनात या सीरियलची आणि यातील कलाकारांची विशेष जागा आहे.

बऱ्याच दिवसांपासून या सीरियलमधील दयाबेन या महत्त्वाच्या पात्राबद्दल चर्चा सुरू आहे. खरंतर जेव्हापासून दयाबेनची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानीने सीरियलला टाटा बाय बाय केलंय. तेव्हापासूनच ही भूमिका आता कोण साकारणार याबाबत चर्चा होती. पण अखेर आता या चर्चांना विराम मिळण्याची शक्यता आहे.

नवीन दयाबेनची निवड

काही आठवड्यांपूर्वीच या सीरियलच्या निर्मात्यांनी घोषणा केली होती की, नवीन दयाबेन लवकरच निवडण्यात येईल. सूत्रानुसार, निर्मात्यांची शोधमोहीम आता संपली आहे. असं ऐकण्यात आलं आहे की, दयाबेनची भूमिका करण्यासाठी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अमी त्रिवेदीला अप्रोच करण्यात आलं आहे.

दयाबेननंतर सोनू सोडणार तारक मेहता का उलटा चश्मा मालिका

ADVERTISEMENT

अमीने मात्र याबाबत दुजोरा दिला नाही. नुकत्याच एका प्रसिद्ध वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्याला शोसाठी अप्रोच करण्यात आलं नसल्याचं सांगितलं. पण ती हेही म्हणाली की, माझ्या मित्रपरिवाराने ही भूमिका करावी असं म्हटलं आहे. कारण ही भूमिका माझ्या पर्सनॅलिटीला मॅच करेल.  

‘कसौटी जिंदगी की’ ची ‘प्रेरणा’ श्वेता तिवारीचं पुन्हा टीव्हीवर कमबॅक

काय म्हणणं अमी दयाबेनच्या भूमिकेबाबत

अमीने या भूमिकेबाबत विचारलं नसल्याचं म्हटलं असलं तरी ही भूमिका करणं मोठी जवाबदारी असेल असं तिने म्हटलं आहे. कोणत्याही कलाकाराला दिशा वकानी म्हणजेच दयाबेनची जागा घेणं सोप्पं नाही. जर कोणी तिच्या जागी आलं तर सुरूवातीला काही दिवस प्रेक्षकांना आणि त्या कलाकारालाही ते थोडं जड जाईल. कारण दिशा या सीरीयलशी तब्बल दहा वर्ष जोडलेल्या असून त्यांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आहे.

अमीच्या नावावरही आहेत भरपूर चांगल्या भूमिका

58408902 1547875095346611 7985395373707580800 n

ADVERTISEMENT

अमी त्रिवेदी हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा असून तिनेही प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा बनवली आहे. तिने आत्तापर्यंत अनेक सीरियल्समध्ये काम केलं आहे. तिच्या सीरियल्सच्या यादीत खिचडी, कुमकुम, जाने क्या बात हुई, सजन रे झूठ मत बोलो, अदालत आणि चिडीयाघरसारख्या समावेश आहे. मुख्य म्हणजे अमीने अनेक गुजराती सीरियल्सही केल्या आहेत.

24 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT