मराठी इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. अमृता आपल्या फॅन्ससाठी नेहमीच सोशल मीडियावर एक्टीव्ह असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे आणि तिच्या नवऱ्याचे विनोदी टिकटॉक व्हिडिओजसुद्धा आपल्याला सतत दिसतच असतात. अशातच अमृताने तिच्या इन्स्टावर शेअर केला तिच्या लहानपणीच्या अनुभवाचा व्हिडिओ.
अमृताने शेअर केलेल्या या व्हिडिओत तिने चक्क तिच्या एका बालपणीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्याला तिने ‘तिचा चोरीचा मामला’ असं म्हटलं आहे. पाहा काय आहे हा चोरीचा मामला.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अमृताने सांगितलं की, असाच मला माझा एक किस्सा आठवतो जो आहे माझ्या लहानपणीचा. तुम्हाला कशी वाटली ही चोराची गोष्ट? तुमच्याकडेही असतील जर असे तुमचे आणि चोरांचे किस्से तर तुम्हीदेखील व्हिडीओ करा आणि आम्हाला सांगा”. तसंच अमृताने लॉकडाऊन असल्यामुळे सर्व फॅन्सना घरी राहण्याचं आवाहन केलं आणि मनोरंजनासाठी चोरीचा मामला हा चित्रपट पाहायला सांगितलं. आता तुम्ही म्हणाल की, हा चित्रपट आम्ही घरी कसा पाहणार…
तर अमृताचा नुकताच येऊन गेलेला मल्टीस्टारर चित्रपट म्हणजे चोरीचा मामला. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही तो हिट ठरला. आत्तापर्यंत अमृताच्या चित्रपटांनी थिएटरमध्ये प्रेश्रकांचं मनोरंजन केलं होतं. पण आता तिचा चित्रपट झळकणार आहे सोनी मराठी या वाहिनीवर. अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाचा वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर तुम्हाला घरबसल्या पाहता येईल. येत्या 5 एप्रिलला दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट तुम्हाला पाहता येईल.
अमृता नुकतीच बॉलीवूडमध्ये हिट ठरलेल्या मलंग या चित्रपटात झळकली होती. तसंच तिने रिएलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये भरपूर एक्शन केली. त्यानंतर सध्या ती सोशल मीडियामार्फत तिच्या फॅन्सच्या संपर्कात आहे.