ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ऑनस्क्रीन स्टंट तर रिअलमध्ये टॅलेंटचा शोध घेणार अमृता

ऑनस्क्रीन स्टंट तर रिअलमध्ये टॅलेंटचा शोध घेणार अमृता

अभिनेत्री अमृता खानविलकर ही सुंदर तर आहेच पण मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील तिची कामं आणि जबाबदाऱ्याही ती अगदी उत्तमरीत्या सांभाळते. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, अमू म्हणजेच अमृता काहीतरी नवं घेऊन येत आहे. ही स्टेप काय असणार हे मात्र गुलदस्त्यात होतं. जीवलगा ही टीव्हीवरील मालिका संपल्यानंतर काही दिवसांचा ब्रेकही घेतला होता. सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ते अमृता, तिची आई आणि तिची बेस्ट फ्रेंड असलेल्या अभिनेत्री सोनाली खरे यांचे मालदीव्सच्या बेटावरील सुंदर फोटोज. नंतर आली ती अमृताच्या नेक्स्ट स्टेपची बातमी. आता अमृता नेमकी कोणत्या गोष्टीची घोषणा करणार आहे याची उत्सुकता अनेकांच्या मनात होती. पण अखेर तिच्या सरप्राईज बॉक्समध्ये नेमके काय आहे, हे सर्वांनाच कळले. वाचा काय आहे अमृता आणि प्लॅनेट टीचं सरप्राईज.

अमृता आणि प्लॅनेट ‘टी’

स्वत:चं काही तरी नवीन सुरु करावं ज्याचा फायदा अनेकांना होऊ शकतो असं प्रत्येकालाच वाटतं. हाच विचार अमृताच्या देखील मनात आला. मग मनात आलं की ते करायचंच अशी विचारसरणी असण-या धाडसी अमृताने प्लॅनेट मराठीसोबत स्वत:ची आर्टिस्ट मॅनेजमेंट कंपनी चालू केली ज्याचे नाव आहे ‘प्लॅनेट टी’.

मित्र झाले बिझनेस पार्टनर्स

मराठी इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेण्ड्सच्या जोडींमध्ये अमृता खानविलकर आणि प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांच्या जोडीचा उल्लेख हमखास केला जातो. अमृता आणि अक्षय यांनी मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला नजरेसमोर ठेवून महाराष्ट्रात लपलेले टॅलेंट जगभर प्रसिद्ध करण्याच्या हेतूने ही कंपनी सुरु करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

नव्या टॅलेंटला संधी देणार

या नव्या स्टेपबाबत अमृताला विचारलं असता ती म्हणाली, “महाराष्ट्रात प्रचंड टॅलेंट लपलेले आहे, जे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. मग ते टॅलेंट हिंदी असो वा मराठी. लोकांमध्ये टॅलेंट आहे, पण त्यांना योग्य दिशा मिळत नाही किंवा त्यांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. त्यांच्याकडे अशी कोणतीही संस्था किंवा माध्यमं नाहीत ज्यामुळे त्यांचं टॅलेंट जगभर पोहोचवलं जाईल.  जेव्हा मी अक्षयला भेटले तेव्हा मला समजलं की त्याने पूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटचे कामं केलं आहे. आम्ही एकत्र येऊन या पार्श्वभूमीवर काम करण्याचे ठरवले जेणेकरून आम्ही लोकल टॅलेंटला जागतिक दर्जा देऊ शकू. आम्हाला युवा कलाकार, उत्तम लेखक, दिग्दर्शक ज्यांच्यामध्ये तो X फॅक्टर आहे. त्यांना जगभर प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम करायचे आहे.” 

तर याबाबत अक्षय यांनीही सांगितलं की, “‘प्लॅनेट टी’ ही अमृताची कल्पना होती. माझी डिजीटल प्लॅटफॉर्मशी संबंधित कामं जास्त आहेत, त्यात मी सध्या काही फिल्म्स करत आहे आणि मनोरंजन क्षेत्रात काम करत असताना मागच्या काही वर्षात अनेक कामांचा अनुभवदेखील माझ्या सोबतीला आहे. मला असं वाटत होतं की, आता ती वेळ आली आहे की, अजून पुढे जाऊन काही तरी नवीन करायला हवं.”

अमृता आणि अक्षय यांच्या ‘प्लॅनेट टी’ या आर्टिस्ट मॅनेजमेंट कंपनीमुळे टॅलेंट असणा-या अनेक व्यक्तींना महत्त्वाचा आधार मिळणार आहे. तर मग जर तुमच्यात तो X फॅक्टर असेल तर तुम्हाला कळलंच असेल कोणाला संपर्क करायला पाहिजे. मुख्य म्हणजे अमृतासुद्धा एका रिएलिटी शोच्या माध्यमातून आपल्या अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीत आली होती आणि इथेच तिची भेट हिमांशू म्हणजे तिच्या लाईफ पार्टनरशी झाली होती. 

ADVERTISEMENT

एवढंच नाहीतर लवकरच अमृता हिंदीतील रिएलिटी शो खतरों के खिलाडीमध्येही दिसणार आहे. त्यामुळे अमृता रिअलमध्ये टॅलेंट शोधणार आहे तर रीलमध्ये स्वतःचं टॅलेंट दाखवणार आहे.

हेही वाचा –

अमृता झाली स्वीट सँटा

काय असेल अमृता खानविलकरची नेक्स्ट स्टेप

ADVERTISEMENT

‘सिम्बा’चं अमृताला ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर सरप्राईज

25 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT