ADVERTISEMENT
home / फॅशन
अमृता खानविलकरने केले चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ, फोटो व्हायरल

अमृता खानविलकरने केले चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ, फोटो व्हायरल

अमृता खानविलकर हे नाव आता काही नवीन नाही. अमृताचा साधेपणा आणि बोल्डनेस हे परफेक्ट कॉम्बिनेशनच तिचा फॅन फॉलोईंग वाढविण्यासाठी महत्वाचे ठरते. अमृताचा अभिनय तर सुंदर आहेच. पण अमृताची फॅशनही तितकीच सुंदर आणि आकर्षक असते. सध्या अमृताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. साडीमधील अमृता सुंदर आणि आकर्षक दिसते आहेच. पण त्याहीपेक्षा ती अधिक मादक दिसत आहे. तिच्या या अदांनी तिचे चाहते नक्कीच घायाळ झाले आहेत. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अमृताने काळ्या साडीतील आपले फोटो पोस्ट केले आहेत. तर बांधेज स्वरूपातील तिच्या हिरव्या आणि लाल साडीतील फोटोही खूपच आकर्षक असून व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

#BiggBoss14: सोनाली फोगाट खरंच अलीच्या प्रेमात की नाटक, सोशल मीडियावर ट्रोल

अमृताची On Point फॅशन

अमृताची फॅशन नेहमीच ऑन पॉईंट असते.  परफेक्ट फॅशन आणि परफेक्ट मेकअपचा मिलाफ असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. अमृताने काळ्या साडीवर केवळ ऑक्सिडाईज्ड गळ्यातले घातले असून अगदी मिनिमल मेकअप केला आहे. मात्र तिचे हे फोटो अतिशय सुंदर आले आहेत. तिला या फोटोवर खूपच कमेंट्सही मिळत आहेत.  तर तिने नेसलेल्या हिरव्या आणि लाल साडीवरदेखील केवळ हातातील बांगड्या आणि कानातल्यांचा वापर केला आहे. तसंच या साडीवरही तिने अत्यंत माफक मेकअप केला असून अमृताची सुंदरता या साडीतून झळकते आहे. सहज आणि सुंदर असे तिचे हे फोटो आल्याने सध्या तिचे चाहते नक्कीच तिचे फोटो पाहून घायाळ झाले आहेत असंच म्हणावे लागेल. कोणताही दिखावा न करता अगदी नेहमीच्या आणि सहज पद्धतीने अमृताची सुंदरता कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात  फोटोग्राफरही यशस्वी झाला आहे. साडीमध्येही मादकता दिसून येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमृता असल्याचं तिने दाखवून दिलं आहे. लोभसता आणि मादकपणा यांचा सुंदर मिलाफ या फोटोंमधून दिसून येतो आहे. 

वरूण धवनच्या लग्नाची लगबग सुरू, या ठिकाणी रंगणार लग्नसोहळा

ADVERTISEMENT

पुरस्कार सोहळ्यासाठीही अमृताने नेसली साडी

अमृताने यावर्षी पुरस्कार सोहळ्यासाठीही साडी हाच पेहराव फायनल केला होता. तिचा हा रॉयल लुक अप्रतिम फोटोग्राफर तेजस नेरूरकरने कॅमेरामध्ये कैद केला आहे. अतिशय एलिगंट असणारा हा लुक सर्वांचेच लक्ष वेधून घेतो आहे. अगदी कमी दागिने आणि अत्यंत कमी मेकअपमध्येही सुंदर दिसता येतं हे नेहमीच अमृता सिद्ध करून देते. जास्तीत जास्त नैसर्गिक दिसण्यावर अमृताचा फोकस असल्याचे नेहमी दिसून  येते. अमृता नेहमीच आपल्या फिटनेसची  आणि त्वचेची काळजी घेतानाही दिसून येते. अमृताने गेल्यावर्षी हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप पाडली असून ती सध्या काही नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. त्यामुळे लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी चाहत्यांना अपेक्षा  आहे. जरी मोठ्या अथवा लहान  पडद्यावर अमृता दिसत नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र अमृता नेहमीच चाहत्यांच्या भेटीला येते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अप्रतिम फोटो पोस्ट करत ती नेहमीच चाहत्यांचं मनोरंजनही करत असते. 

कंगनावर या व्यक्तीने केले चोरीचे आरोप, केला गंभीर गुन्हा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT