ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अभिनेत्री अमृता पवार

आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या लगीनघाईला सुरुवात

 मराठी सिनेइंडस्ट्रीत आतापर्यंत अनेकांची लग्न झालेली आपण पाहिली आहेत. आता आणखी एका मालिका अभिनेत्रीच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. या अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. आता तिच्या मेंदीचे काही फोटो समोर आले आहेत. इतकेच नाही तर तिच्या हळदीचे फोटोही समोर आले आहेत. ही अभिनेत्री आहे झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदिती… अर्थात अभिनेत्री अमृता पवार(Amruta Pawar). अमृताने हे फोटो ऑफिशिअल पोस्ट केले नसले तरी तिच्या टॅगमध्ये तिच्या लग्नातील काही सुंदर क्षण दिसत आहेत. चला जाणून घेऊया अधिक

मेंदी, स्पिन्स्टर…

सेलिब्रिटी लग्नाकडे सगळ्यांचेच लक्ष असते. कारण त्यावरुन त्यांनी लग्न कसं केलं आणि काय घातलं… वगैरे या सगळ्याची माहिती मिळते.पण अमृताने अगदी छोटेखानी पद्धतीने तिचा लग्नसोहळा केल्याचे दिसत आहे. तिने तिच्या साखरपुड्याचेही काही ठराविक फोटोज पोस्ट केले होते. त्यावरुन हा सोहळा थोडक्यात पण रॉयल झाल असावा असा अंदाज त्यांच्या फोटोवरुन येतो. सध्या अमृताचे जे फोटो व्हायरल होत आहेत ते तिच्या  मेंदी, स्पिन्स्टर आणि हळदीचे आहेत. हळदीचा लुक हा एकदम साधा असला तरी त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या मेंदीचे काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या मेंदी आर्टिस्टने तिचे हे फोटो शेअर केले आहेत. इतकेच नाही तर तिच्या हळदीचे फोटो आणि व्हिडिओही शेअर झाले आहेत. आता तिच्या लग्नाच्या फोटोची प्रतिक्षा अनेकांना आहे. तिच्या लग्नतील लुकही असाच सुंदर असणार यात काहीही शंका नाही.

लग्नाच्या फोटोची प्रतिक्षा

अभिनेत्री अमृता पवारचा हळदी लुक

अमृताच्या हळदीचे फोटो पाहता तिचे लग्न झाले असावे असा अंदाज बांधला जात आहे. तिच्या लग्नातील फोटोची खूप जणांना प्रतिक्षा आहे. अनेकांनी तिच्या को-स्टारच्या अकाऊंटवरही फोटो पाहायला सुरुवात केली आहे. सध्या ती ज्या मालिकेत काम करत आहे. त्या मालिकेतील तिचा सहकलाकार हार्दिक जोशी हा तरी फोटो शेअर करेल अशी अपेक्षा आहे. मालिकेच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री दिसून येते. रिल्स बनवण्यापासून फोटो शेअर करण्यापर्यंत अनेकदा त्यांच्या पोस्ट शेअर होत असतात.  त्यामुळे आता लग्नाच्या फोटोची प्रतिक्षा नक्कीच आहे.

हार्दिकच्या लग्नाची प्रतिक्षा

अमृताचा को-स्टार हार्दिक जोशी याच्या लग्नाचीही प्रतिक्षा अनेकांना आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक हे एका मालिकेत सहकलाकार होते. या दोघांमध्ये काही होतं याचा अंदाजही कोणाला नव्हता. पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी ज्यावेळी एकत्र फोटोशूट आणि फोटो काढायला सुरुवात केली त्यामुळे  त्यांच्या नात्याचा अंदाज अनेकांना आला होता. पण ज्यावेळी त्यांच्या लग्नाचे फोटो आले त्यानंतर या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. आता या दोघांच्या केळवणाचे काही फोटोज येत आहेत. त्यामुळे आता या दोघांच्या लग्नाचीही प्रतिक्षा आहे. 

ADVERTISEMENT

आता अपेक्षा आहे ते अमृताच्या लग्नाच्या फोटोजची

05 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT