ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अंकिता लोखंडेचा स्वप्नवत साखरपुडा

असा पार पडला अंकिताचा स्वप्नवत साखरपुडा

 सध्या सेलिब्रिटी लग्नांचा धडाका सुरु आहे. बी टाऊन आणि टीव्हीवरील अनेक कलाकारांची लग्न या काळात झाली आहेत. नुकतेच कतरिना -विकीचे आलिशान लग्न पार पडले. आता टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा अंकिता लोखंडे हिचा साखरपुडा पार पडला आहे. विकी जैनसोबत तिचा हा साखरपुडा झाला असून तिचा हा दिमाखदार सोहळा पाहून तिच्या सगळ्या फॅन्सला आनंद झाला आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या घरी लगीनघाई सुरु झाली होती. तिने ग्रहमखाचे फोटो टाकले होते. आता तिचा साखरपुडा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

साखरपुडा पडला पार

अंकिताचा ग्रँड साखरपुडा सोहळ्याचा व्हिडिओ सध्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकिताने निळ्या रंगाचा गाऊन घातला असून विकी आणि ती को-ऑर्ड करताना दिसत आहेत. अंगठी घालण्याच्या आधी अत्यंत रोमँटीक असे लागले होते. आजुबाजूला आतिषबाजी सुरु होती. ते झाल्यानंतर त्याने रिंग घातली आणि अंकिताने विकीला एक घट्ट मिठी मारून ती आता बंधनात अडकल्याचे आनंदात सांगितले. पण अंकिताचा हा साखरपुड्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप जणांना तिला ट्रोलही केले आहे. कारण अनेकांना तिने हे सगळे जरा जास्तच केले आहे अशा कमेंट केल्या आहेत.

गोऱ्या गोऱ्या गालावरी, चढली लाजेची लाली गं पोरी नवरी आली…असा रंगला हळद सोहळा

संगीतमध्ये केली धम्माल

अंकिताने पहिले काही फोटो शेअर केल्यानंतर तिने घरगुती पद्धतीने लग्न केले असे खूप जणांना वाटले. पण ही लगीनघाईची सुरुवात होती. तिच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिचे लग्न पुढे गेले असे कळत होते. पण दोन दिवसांपूर्वी आलेले संगीतचे तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहता खूप जणांना तिने लग्नात फारच धम्माल केली हे दिसून आले आहे. तिच्या लग्नासाठी अनेक कलाकार देखील आले होते. अमृता खानविलकरपासून ते हिंदी जगतातील अनेक कलाकार यावेळी हजर होते. त्यांनी या खेळात खूपच जास्त मजा केलेली ही अनेक व्हिडिओमध्ये दिसून आली आहे. 

ADVERTISEMENT

आता प्रतिक्षा लग्नाची

 अंकिताच्या लग्नाचे दिमाखदार सोहळे पाहिल्यानंतर आता तिचा लग्नातील लुक नेमका कसा असेल हे पाहण्याची सगळ्यांना प्रतिक्षा आहे. कारण तिला अनेकदा महाराष्ट्रीयन नवरीच्या रुपात अनेकदा स्क्रिनवर पाहिले आहे. पण तिला तिच्या लग्नात पाहण्याची एक वेगळीच इच्छा सगळ्यांना आहे. त्यामुळे आता तिचे नवे फोटो कधी येतात ते पाहण्यासाठी सगळ्यांनाच सोशल मीडियावर टिपून बसावे लागत आहे. अंकिताने तिच्या सोहळ्यातील सगळे फोटो अगदी उघड उघड शेअर केले आहेत. त्यामुळे तिचे फोटो पाहणे तिच्या फॅन्सना खूपच जास्त आवडत आहे.

लग्न आणि लुकची चर्चा

अंकिता लोखंडे ही कायम स्टायलिश असते. तिच्या लग्नासाठी ती कसा लुक करणार आहे याची उत्सुकता असणे साहजिक आहे. अंकिताने ग्रहमखाच्या दिवशी पोपटी रंगाची पैठणी नेसली होती. संगीतसाठी तिने पेस्टल रंगाचा लेहंगा घातला होता. तर हळदीसाठी तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तर तिच्या साखरपुड्यासाठी तिने इंडो-वेस्टर्न लेहंगा घातला होता. जो खूपच सुंदर होता. 

आता अंकिताच्या लग्नाच्या फोटोसाठी काही तासांचीच वाढ पाहावी लागेल. 

कतरिनाच्या अंगठी आणि मंगळसूत्राची का आहे चर्चा, जाणून घ्या किंमत

ADVERTISEMENT
14 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT