ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘पानिपत’मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीने कोरोना काळात केले लग्न, फोटो व्हायरल

‘पानिपत’मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीने कोरोना काळात केले लग्न, फोटो व्हायरल

‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री अर्चना निपाणकरने पार्थ रामनाथपूर याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. कोरोना काळातच अर्चनाने लग्न केलं असून नुसताच तिने सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. पार्थ रामनाथपूर आणि अर्चना गेले अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी साखरपुडाही केला होता. त्याचे फोटो अर्चनाने शेअर केले होते. कॉलेजमध्ये  असल्यापासून दोघंही एकमेकांना ओळखत असून पार्थने आपल्याला प्रत्येक गोष्टीत साथ दिल्याचे अर्चनाने याआधीही सांगितले आहे. 

अखेर एक महिन्यानंतर रियाने केली सुशांतसाठी भावनिक पोस्ट शेअर

दाक्षिणात्य पद्धतीने लग्नसोहळा

अर्चनाने आपल्या सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर केला असून दोघेही दाक्षिणात्य पद्धतीच्या लग्नसोहळ्यात असल्याचे दिसून येत आहे. ‘फॉरेव्हर’ अशी कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. पार्थ हा दाक्षिणात्य असून अर्चना त्याला कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत आहे. फोटो शेअर केल्यानंतर काही तासातच तिच्यावर मनोरंजन क्षेत्रातील आणि तिच्या चाहत्यांकडून अभिनंदाचा वर्षाव होत अनेक कमेंट्स आल्या आहेत. कांजिवरम साडीमधील अर्चना अतिशय सुंदर दिसत असून ‘मेड फॉर इच अदर’ असा हा दोघांचा जोडा दिसत आहे. अभिनेत्री सायली संजीव, जुई गडकरी, वीणा जगताप, सुयश टिळक, अपूर्वा नेमळेकर, सिद्धार्थ जाधव, राहुल देशपांडे, अभिजित खांडकेकर, तितिक्षा तावडे या सर्वांनीच अर्चनाला भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या काळात केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत दाक्षिणात्य पद्धतीने हा सोहळा पार पडला असल्याचे तिने सांगितले आहे. तिच्या लग्नाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. अर्चना आणि पार्थचा साखरपुडा हा महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडला होता. त्याचे फोटोही अर्चनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. पार्थ आणि अर्चना पुणेरी पद्धतीच्या या पोषाखात खूपच सुंदर दिसत होते.

मालिकांचे काम बंद करणे आता अशक्य, निर्माते या परिस्थितीसाठी तयार

ADVERTISEMENT

ब्रेकअपनंतरचे प्रेम

खरं प्रेम असेल तर पुन्हा नक्कीच एकत्र येतात ही केवळ फिल्मी स्टोरी नाही तर प्रत्यक्षात ही गोष्ट अर्चना आणि पार्थच्या बाबतीतही घडली आहे. अर्चना आणि पार्थ एकमेकांना ओळखत होते. मात्र काही वर्षांपूर्वी  त्यांंनी ब्रेकअप केले. अर्चना कालांतराने मुंबईत जेव्हा मालिकेच्या चित्रीकरणासाठी आली तेव्हा पुन्हा या दोघांमधील भेटीगाठी वाढल्या आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्चनाने ‘का रे दुरावा’ या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून साकारलेली दीपिका ही घराघरातून प्रसिद्ध झाली. ‘100 डेज’ या मालिकेतही ती तेजस्विनी पंडीत आणि आदिनाथ कोठारेसह उत्तमरित्या कलाकार म्हणून दिसून आली. मालिकांबरोबरच तिला मराठी आणि हिंदी चित्रपटातही भूमिका मिळाल्या. ‘पानिपत’ चित्रपटात आनंदीबाईची भूमिका तिने उत्कृष्ट वठवली. आतापर्यंत अर्चनाच्या नकारात्मक भूमिकाच पाहायला मिळाल्या आहेत. तसंच तिने आतापर्यंत काही ब्रँड्ससाठी मॉडलिंगही केलं आहे. त्यामुळे अर्चना हा बऱ्यापैकी प्रसिद्ध चेहरा आहे. तिचे फॉलोअर्सही खूप आहेत. त्यामुळे आता अर्चना नवीन कोणत्या भूमिकेत दिसणार आणि लग्नानंतरही ती काम करत राहणार की नाही याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अर्चना आणि पार्थला ‘POPxo मराठी’ कडून भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

सुश्मिता सेनच्या भावाला मिळाली बिग बॉस 14 ची ऑफर, मात्र राजीवची आहे एक अट

15 Jul 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT