मराठीतील गुणी अभिनेत्री अश्विनी भावे आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत स्थायिक झाली असली तरी आपल्या देशाबद्दलची तिची ओढ नेहमीच दिसून येते. सध्या अभिनेत्री अश्विनी भावे मुंबईत आहे. ब-याच काळानंतर महिला दिनाच्याच आठवड्यात मुंबईत असलेल्या अश्विनी भावेने आगळ्या पध्दतीने यंदाचा आंततराष्ट्रीय महिला दिन सेलिब्रेट केला.
अश्विनी देतेयं महिलांना आधार
समाजसेवेत नेहमीच रस असलेल्या आणि दरवर्षी समाजसेवेत पुढाकार घेऊन समाजासाठी काही ना काही करणा-या अश्विनी भावेंनी नुकतीच रायगडमधल्या जांभूळपाडा गावाला भेट दिली.
जांभूळपाड्यातल्या गरीब आणि गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, म्हणून शिलाई मशीन्स गिफ्ट केली.
जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश आणि सुविचार
याबाबत अश्विनी भावे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “जांभूळपाड्यात काम करणा-या ‘सुधागड हितवर्धिनी सभा’ या संस्थेशी मी गेली दोन वर्ष निगडीत आहे. यंदा मी महिला दिनाच्या वेळी योगायोगाने मुंबईत होते. म्हणूनच जांभूळपाड्यात स्वत: जाऊन तिथल्या महिलांसोबत वेळ घालवावा असं मला वाटलं. तसंच तिथल्या महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं म्हणून मी त्यांना शिलाई मशीन्स भेट म्हणून दिली.”
पुरूष कलाकारांनाही दिली खास भेट
अश्विनी भावे या नेहमीच पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेताना दिसतात.
गेल्या वर्षी महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी मराठी सिनेसृष्टीतल्या 15 अभिनेत्रींना रोपं भेट म्हणून दिली होती.
तर यंदा त्यांनी मराठी सिनेसृष्टीतल्या 10 पुरूष कलावंताना रोपं भेट दिली. त्यासोबतच एक हस्तलिखीत पत्रही पाठवलं. अश्विनी भावेंनी या पत्रात लिहीलं आहे की, “एका स्त्रीने एका पुरूषाला महिला दिनाच्या शुभेच्छा देणं ही थोडी चाकोरी बाहेरची गोष्ट आहे पण त्यातच धमाल आहे ना. यावेळी काहीतरी वेगळं करावं असं वाटलं म्हणून ही आठवण भेट दिली. हे रोपटे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या स्त्रीला द्या”.
लवकरच वेबसीरिजमध्ये झळकणार अश्विनी भावे
अश्विनीच्या कामाच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास सुत्रानुसार लवकरच ती एका वेबसीरिजमध्येही झळकणार आहे. अश्विनी भावे आणि अतुल कुलकर्णी यांची सिलसिला बदलते रिश्तों का या वेबसीरिजच्या सीझन 2 मधील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाल्याचं कळतंय.
हेही वाचा –
दिशा पटानी आदित्य ठाकरेसोबत गेली होती डेटवर
कॅन्सरशी यशस्वी लढा दिल्यावर पहिल्यांदा फंक्शनमध्ये दिसली सोनाली बेंद्रे
‘खतरों के खिलाडी’चा विजेता पुनीत, आदित्यने जिंकलं प्रेक्षकांचं मन