ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला विसरता येणे ‘या’ अभिनेत्रीला झालंय कठीण

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला विसरता येणे ‘या’ अभिनेत्रीला झालंय कठीण

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने जून महिन्यात गळफास लाऊन आत्महत्या केली. मात्र अजूनही त्याच्या मृत्यूनंतर अनेकांना धक्का बसला असून त्यातून बाहेर पडणं अशक्य झालं आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे मित्र आणि त्याचे सहकलाकारही अजून  या धक्क्यातून सावरू शकत नाहीत. सुशांतचा पहिला चित्रपट एम. एस. धोनी होता. यामध्ये नेहमी त्याला पाठिंबा देणारी अशी त्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती ती भूमिका चावलाने. भूमिकाची सुशांतच्या आत्महत्येनंतर 20 दिवसांनीही अशीच काहीशी अवस्था आहे. त्याला विसरता येणं शक्य नाही असं म्हणत त्याच्या आठवणीत भूमिकाने अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सुशांत हा  अत्यंत मनमिळावू अभिनेता होता आणि त्याच्याबद्दल कोणीही आतापर्यंत वाईट बोललं नाही तर सुशांतने असं पाऊल का उचललं हाच प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. 

…तर आत्महत्या करेन..प्रसिद्ध अभिनेत्री झाली सोशल मीडियावर व्यक्त

सुशांतला विसरता येणं भूमिकाला शक्य नाही

भूमिका चावलाने एम. एस. धोनी चित्रपटात सुशांतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. भूमिकाने सुशांतची आठवण येत असल्याचे सांगून भावनिक पोस्ट लिहिली आहे. भूमिका म्हणाली, ‘20 दिवस निघून गेले आहेत, मात्र झोपून उठल्यानंतरही तुझाच विचार मनात येतो. आता विचार येतो केवळ एकदाच तर मी तुझ्याबरोबर स्क्रिन शेअर केली होती तरीही मला तुझ्याबद्दल इतका लळा आहे. जर तुला नैराश्य आलं होतं, तुला काही व्यक्तीगत दुःख होतं तर तू का नाही बोललास. काही व्यावसायिक दुःख होतं तरीही मला वाटतंय की तू बऱ्याच चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.’ भूमिका पुढे म्हणाली की, ‘हा ही गोष्ट खरी आहे की इथे टिकून राहणं थोडं कठीण आहे. मी इनसाईडर अथवा आऊटसाईडर याबाबत बोलत नाहीये. पण हे असंच आहे. माझ्यासाठी 50 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये कामाबाबत बोलणं सोपं नाहीये. पण मी आनंदी आहे की मी काम करतेय. अशी वेळ पण येते जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीतल्या लोकांना कॉल अथवा मेसेज करता तेव्हा ते नीट बोलत नाही अथवा काही लोक तुम्हाला ओळख दाखवत नाहीत. जगामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. मात्र मी नशीबवान आहे की किमान मला काम तरी मिळतंय. हे शहर आपल्याला स्वप्नं देतं. नाव देतं. कधी कधी गुमनामही करतं. लाखो लोकांमध्ये एकटेपणाही येतो. जर कोणती दुसरी गोष्ट असेल तर मला वाटतं ते लोकांपर्यंत पोहचायला हवं. खरं नक्की काय आहे ते बाहेर यायला हवं. सुशांत सिंह राजपूत तू जिथे असशील देव करो तुझ्या आत्म्याला शांती मिळो.’

इंडो-चायना गलवान तणावावर अजय देवगण बनवणार चित्रपट

ADVERTISEMENT

सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांना धक्का

सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनाच धक्का बसला आहे. त्यामध्ये अगदी त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे असो वा क्रिती सनॉन. क्रितीने तर सुशांत गेल्यानंतर मीडियाच्या वागण्यावरही आवाज उठवला होता. तसंच ती सुशांत गेल्यानंतर सोशली अॅक्टिव्हही नाही. ती अजूनही त्याच धक्क्यातून सावरली नसल्याचं म्हटलं जात आहे. सुशांत हा अत्यंत हुशार आणि मेहनती अभिनेता होता. पण त्याने इतकं मोठं पाऊल का उचललं याचं उत्तर कोणाकडेही नाही. सुशांतचे कुटुंबीयदेखील या धक्क्यातून सावरू शकलेले नाही. इतकंच नाही तर इंडस्ट्रीमध्येही सुशांत गेल्यानंतर अजूनही ही गोष्ट पचवणं बऱ्याच जणांना शक्य होत नसून त्याचे मित्र आणि सहकारी रोज त्याच्याबद्दच्या नव्या नव्या पोस्ट शेअर करत  असल्याचे दिसून येत आहे. 

या साऊथ सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर

05 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT