अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळ हिला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. इगतपुरी येथे झालेल्या एका रेव्हपार्टीत एकूण 22 जणांना अटक करण्यात आली. यामध्ये 1 हिना पांचाळ देखील होती. हिनाला अटक झाल्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली. हिनाची ही बातमी ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. तिच्या कुटुबियांनाही याची माहिती ही बातम्यांमधून कळल्यामुळे त्यांच्या कुटुबियांना धक्का बसला आहे. पण हिनाच्या कुटुंबाने तिची बाजू घेतली आहे. आमची हिना अशी चुकू शकत नाही अशी माहिती तिच्या घरातल्यांनी दिली असून हिनाबद्दल ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया.
आमची मुुलगी चुकूच शकत नाही
हिना पांचाळ हिच्या बहिणीला या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास आली तेव्हा तिने आणि तिच्या आईने हिनाची बाजू घेतली आहे. हिना कधीही अशी चूक करु शकत नाही. हिना निर्दोष आहे. घरात रितसर परवानगी मागून हिना या पार्टीला गेली होती. त्यामुळे ती चुकीची वागूच शकत नाही. त्यामुळे आम्हाला कशाचीही भीती नाही. हिनाच्या चाहत्यांनी किंवा त्यांना ओळखणाऱ्यांनी हिनावर विश्वास ठेवायला हवा. हिना अशी वागूच शकत नाही यावर आम्ही ठाम आहोत. हिनाच्या या बातमीमुळे तिच्या वडिलांची प्रकृतीही खालावली आहे. त्यामुळे घरातील व्यक्तीही चिंतातूर आहेत. सध्या घरातील सगळे हिनाला तुरुंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
रणवीर सिंहच्या या लुकची सगळीकडे चर्चा, आता केलाय असा अवतार
आई म्हणाली हिना अशी नाही
हिनाच्या बहिणीनेच नाही तर हिनाच्या आईने देखील हिनाला अटक झाली याबद्दल सांगताना म्हटले की, हिना असे करुच शकत नाही. हिनाच्या या नको त्या गोष्टीबद्दल ऐकून आम्हाला देखील धक्का बसला आहे. आम्ही देखील बातम्यांमधूनच ही गोष्ट ऐकली आहे. पण हिना अशी करुच शकत नाही. त्यामुळे हिनाला अटक झालेली चुकीची आहे. पण ती यातून सुखरुप बाहेर पडेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.
‘जून’ – नवी सुरूवात करून देणारा, मनाची घालमेल ओळखणारा
नेमकं प्रकरण काय?
हिना पांचाळ 29 जून रोजी एका रेव्हपार्टीत गेली होती. आधी मिळालेल्या माहितीनुसार तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधत ती या पार्टीमध्ये गेली होती. पोलिसांना इगतपुरीच्या या बंगल्यामध्ये हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार याची टिप लागली होती. त्यामुळे त्यांची नजर या पार्टीकडे होती. पोलिसांना या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असल्याचे देखील कळले. त्यामुळे त्यांनी या पार्टीत लगेचच छापा घातला. या पार्टीमध्ये छापा घातल्यानंतर त्यामध्ये अनेक अभिनेत्रींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिलांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीमध्ये अनेक छोटे मोठे कलाकार होते. त्यांना चौकशीअंती सोडून देण्यात आले. पण काही जणांना मात्र संशयास्पद म्हणून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी अनेक नावं समोर आली. पण हिना पांचाळच्या नावामुळे फारच गोंधळ उडाला. एकमेव हिनाचे नाव अस्यामुळे हिनाची फार मोठ्या प्रमाणात बदनामी देखील झाली आहे.
आता हिना अटकेतून बाहेर आल्यानंतर ती नेमकं या सगळ्याबद्दल काय सांगते ते जाणून घ्यायला हवं.
शिल्पा शेट्टीने घेतली सुपरडान्सरच्या गुरूची फिरकी, उलटवली चाल