‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ऋता अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. पण आता या मालिकेतून ऋताची एक्झिट झाल्याची बातमी सध्या सगळीकडे व्हायरल होऊ लागली आहे. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना तिने ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे या पुढे प्रेक्षकांचा आवडीचा चेहरा इंद्रा- दिपू हे यापुढे पाहायला मिळणार नाहीत. ऋताने मालिका का सोडली? याचे कारण ऐकून तुम्हालाही चांगलाच धक्का बसेल. चला जाणून घेऊया ऋताने नेमकी मालिका का सोडली ते.
स्वच्छतेच्या कारणामुळे सोडली मालिका
मिळालेल्या माहितीनुसार ऋता आणि निर्मात्यांमध्ये चांगलाच वाद झाला आहे. स्वच्छतेच्या कारणावरुन हा वाद झाला असे समजत आहे. अनेकदा ऋताने सेटवर अस्वच्छता असल्याचे सांगितले होते. या कारणामुळे मालिकाकर्त्यांशी तिचा वाद झाला होता. त्यामुळे तिने तडकाफडकी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील तिला एक महिना तिला ही मालिका सोडता येणार नाही. त्यामुळे चाहत्यांना पुढील एक महिना तरी ऋता दिसणार आहे. अनेकदा मालिकाकर्ते आणि अभिनेत्यांमध्ये वाद झाल्यानंतर मालिकेत असा बदल होतो. हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. यापूर्वीही मालिकांमध्ये असे बदल क्षुल्लक वादामुळे झालेले आहेत.
मालिकेमध्ये कोण येईल नवी दिपू?
मालिकेच्या सुरुवातीपासून मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली ऋता अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. पण आता अचानकपणे हा बदल झाल्यामुळे या मालिकेच्या टिआरपीमध्ये नक्कीच फरक पडणार आहे. आता नवा चेहरा कोण असेल? याची उत्सुकताही अनेकांना लागली आहे. दरम्यान सूत्रांनुसार या मालिकेसाठी नव्या दिपूचा शोध लागल्याचे देखील समजत आहे. पण यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
ऋता झाली ट्रोल
काहीच महिन्यांपूर्वी ऋताचा साखरपुडा झाला आहे. प्रतिक शाह सोबत साखरपुडा पार पडल्यानंतर अनेकांनी तिला हिंदी मालिकांमध्ये काम करण्यासाठी तू हे नाते जोडले अशा प्रकारच्या कमेंट तिला करण्यात आल्या होत्या. पण त्यावरही ऋताने तिचे सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर ट्रोलर्सची तोंड बंद झाली होती. पण तिला काही काळासाठी चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.
नाटकं सुरु
मन उडू उडू झाले या मालिकेतून ऋताची एक्झिट होणार असली तरी देखील ती नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दादा एक गुडन्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग सध्या सुरु आहेत. त्यामुळे नाटकातून ती आपल्या भेटीला येणार आहे.
ऋताची मालिकेतून एक्झिट तुम्हालाही धक्का देणारी आहे का? हे आम्हाला कळवा. शिवाय ऋताचा निर्णय तुम्हाला पटला की नाही हे देखील कळवा.