Advertisement

मनोरंजन

‘रात्रीस खेळ चाले’मधून जुन्या शेवंताची एक्झिट

Leenal GawadeLeenal Gawade  |  Nov 24, 2021
शेवंता बदलली

Advertisement

 गेले दोन सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका आणि त्यामधील पात्र प्रेक्षकांच्या मना मनात घर करुन बसली आहेत. या मालिकेतील माई, अण्णा आणि शेवंता तर यामधील महत्वाची आणि लक्षात राहिलेली अशी पात्र आहेत. शेवंता म्हटली की घारे डोळे आणि त्या दिलखेचक अदा खूप जणांना आवडणाऱ्या होत्या. या मालिकेत शेवंताची भूमिका अपूर्वा नेमळेकर यांनी साकारली आहे. पण या मालिकेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. जुन्या शेवंताच्या जागी आता मालिकेत नवी शेवंताची रिप्लेस्मेंट झाली आहे. त्यामुळे खूप जणांना धक्का बसला आहे. तर नवी शेवंता पाहण्यासाठीही अनेक जण उत्सुक आहेत. जाणून घेऊया या विषयी अधिक

ही अभिनेत्री साकारणार शेवंता

मालिकेत कलाकार बदलणे आता प्रेक्षकांना नवे राहिलेले नाही. मालिकेत अनेकदा पात्र बदलत असतात. पण एखाद्या पात्राशी काही प्रेक्षकांचे खूपच जवळचे नाते तयार होते. असेच पात्र ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये शेवंता नावाचे होते. जे पात्र अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर गेले दोन सीझन साकारत आहेत. दुसऱ्या सीझनमध्ये तिचा सहभाग सगळ्यात जास्ती होता. तिचा अभिनय, तिच्या दिलखेचक अदा या सगळ्यांनी तिला खूपच प्रसिद्धी मिळवून दिली होती. पण आता तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आता अभिनेत्री कृतिका तुळसकर ही मालिकेत शेवंता साकारताना दिसणार आहे. कृतिका तुळसकर या मालिकेत दिसली असून अनेकांना अचानक बदललेले हे पात्र पाहून धक्काच बसला आहे. मंगळवारी पहिल्यात भागात कृतिका दिसली. तिच्यामध्ये शेवंताची थोडीशी झलक नक्कीच दिसून आली. अभिनेत्री कृतिकानेही तिच्या सोशल मीडियावर याच्या काही पोस्ट शेअर केल्या आहेत.

कळले नाही कारण

अपूर्वा नेमळेकर हीने ही मालिका का सोडली हे अद्याप कळलेले नाही. काही दिवसांपासून ती मालिका सोडण्याच्या चर्चा होत होत्या. पण अपूर्वाने त्याचा उल्लेख कुठेही केला नव्हता. त्यामुळेच या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले नव्हते. पण आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले आह. कारण आता या मालिकेत नव्या शेवंताची एंट्री झाली आहे.

वच्छी आली परत

मालिकेत नुकतेच एक जुने पात्र परत आले आहे. वच्छी हे पात्र या सीझनमध्ये खूप जणांनी मीस केलं होतं. पण आता ही वच्छी परत आली आहे. मालिकेत ती परतल्यामुळे काही काळापासून थोडी संथ झालेली मालिका पुन्हा वेग घेईल अशी अपेक्षा आहे. मालिकेत सध्या माई या पात्रावर घर जोडून ठेवण्याची खूप मोठी जबाबदारीआलेली आहे. आता वच्छी आल्यामुळे नक्कीच मालिकेत बराच बदल होणार आहे ते दिसेलच.

येणार नवी मालिका

देवमाणूस 2 ही देखील मालिका आता पु्न्हा एकदा येणार आहे. मालिका अर्धवट बंद झाली होती.डॉ. अजितकुमार देवला अजूनही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे आता मालिकेत त्याला नेमकी कोणती आणि कशी शिक्षा होणार ते जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. 

ही नवी शेवंता प्रेक्षकांचे मन जिंकून घेईल का? हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा

सुरू होतोय नवा कुकरी शो, किचनमध्ये कलाकारांसोबत कल्ला करणार संकर्षण कऱ्हाडे