कोरोनामुळे (Coronavirus) अनेक घरं उद्धस्त झालेली आपण पाहत आहोत. गेल्यावर्षी असंच एक संकट अभिनेत्री मयुरी देशमुखवरही (Mayuri Deshmukh) आले. मयुरीचा नवरा आशुतोष भाकरेने (Ashutosh Bhakre) गेल्यावर्षी 2020 जुलैमध्ये राहत्या घरी काम नसल्यामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर मयुरीवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र कुटुंब आणि मित्रमैत्रिणींच्या आधाराने मयुरी पुन्हा एकदा काम करू शकत आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या मयुरीला त्यानंतर अनेकदा आडूनआडून दुसऱ्या लग्नाविषयीही विचारण्यात येत असल्याचे तिने सांगितले. मात्र आशुतोषचे प्रेम आपल्याला जगण्यासाठी पुरणार आहे असं ठामपणे मयुरीने सांगितले आहे. मयुरी मराठीसह आता हिंदी मालिकांमध्येही स्थिरावत आहे. सध्या हिंदी मालिकेतून मयुरी दिसत असून मयुरीने आपल्या दुसऱ्या लग्नाबाबत निर्णय सांगितला आहे. आशुतोषचे दुःख पचवून मयुरी पुन्हा एकदा खंबीरपणे उभी राहताना दिसून येत आहे.
सना खाननंतर आता आशका गोराडियाने घेतला अभिनयातून संन्यास
मूल दत्तक घेण्याचा विचार
मयुरीचं आशुतोषवर अत्यंत प्रेम आहे. तसंच आशुतोषला मूलं खूप आवडायची आणि त्याचे त्याच्या भाचीवर अत्यंत प्रेम होते. त्यांच्यातील प्रेम पाहून केवळ मुलासाठी दुसरं लग्न करण्याची गरज नाही असं मयुरीने ठामपणे सांगितले आहे. तसंच आशुतोषवरील प्रेम आणि आपल्यावरील आशुतोषचे इतके प्रेम होते की, त्यासाठी दुसरं लग्न करण्याची गरज आपल्याला भासणार नाही आणि आपण आशुतोषच्या प्रेमावर पूर्ण आयुष्य काढू शकतो असंही मयुरीने म्हटलं आहे. आशुतोषच्या मुलाच्या आवडींमुळे एखाद्या मुलीला दत्तक घ्यायचा विचारही मयुरीने सांगितला आहे. त्यामुळे मयुरीचे सध्या सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. एकट्याने राहण्याचा निर्णय हा अत्यंत खंबीरपणाचा आणि कौतुकाचाही आहे असंही मयुरीचे चाहते म्हणत आहेत. मयुरी सतत लहान मुलांसोबत आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. त्यामुळेच तिला भविष्यात मूल हवं असेल तर ती काय करणार असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आल्यावर तिने मूल दत्तक घेण्याचा विचार असल्याचे सांगितले आहे. तसंच मूल हवं असेल तर लग्न करण्याची काहीच गरज नाही. इतरही अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे तिने म्हटलं होतं. तिच्या या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत आणि कौतुक केले आहे. सध्या असं प्रेम फारच विरळ झाले आहे.
नव्या चित्रपटासाठी मोनालिसा बागलचा Fit & Fine लुक
लवकरच दिसणार ‘डिअर आजो’ नाटकात
सध्या सगळीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मची चर्चा असते. तर मयुरी देशमुखचं डिअर आजो हे नाटकही लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. मयुरी नाटक, चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी सध्या काम करत असून स्वतःला गुंतवून ठेवत आहे. तिच्यावर कोसळलेल्या या दुःखातून बाहेर येणं हेदेखील गरजेचं आहे असंही मत तिने व्यक्त केलं. कारण सतत दुःखात राहून काहीही होणार नाही. त्यामुळे काम करत सध्या मयुरीने स्वतःला व्यस्त करून घेतले असले तरीही आपला नवरा आशुतोषला मात्र जन्मभर विसरता येणार नाही हेदेखील मयुरीने सांगितले आहे. तीन वर्षांपूर्वी मयुरीने स्वतः लिहिलेले हे नाटक आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मयुरी सध्या आनंदात आहे. शिवाय तिची हिंदी मालिकाही प्रेक्षकांना आवडत असून सध्या या मालिकेमध्ये एक वेगळेच मनोरंजक वळण आले आहे. यामध्ये तिच्यासह गश्मीर महाजनीही (Gashmeer Mahajani) असून ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे.
‘माझा होशील ना’ मालिकेत कोरोनामुळे वळण, सिंधू वहिनीभोवती फिरतेय मालिका
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक