‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती अभिनेता आशुतोष भाकरेने 30 जुलै रोजी गळफास लावून आपले जीवन संपवले. आशुतोष अशापद्धतीने आपले जीवन संपवेल असे कोणालाही वाटले नव्हते. खुद्द मयुरी देखील या सगळ्यापासून अनभिज्ञ होती. आशुतोष जाऊन आता 10 दिवसांहून अधिक काळ उलटून गेला आहे. आता या घटनेतून मयुरी स्वत:ला सावरत आहे. तिने खास आशुतोषसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. आशुतोषच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मयुरीने तिच्या भावना या पोस्टद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या फॅन्सनी तिला धीराने घेण्यास सांगितले आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाली आहे मयुरी
मयुरी देशमुखने ही पोस्ट आशुतोषच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिली आहे. तिने होममेड केकचा फोटो पोस्ट करत आशुतोषला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आशुतोष काही काळ तणावाखाली होता.हे तिने या पोस्टमधून सांगितले आहे. शिवाय ही लढाई जिंकण्याच्या जवळही तो आला होता. पण तू फार घाई केलीस असे तिने म्हटले आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मयुरीनेही कुकिंगमध्ये आपला वेळ घालवला. तिनेही छान केक्स घरी बनवले. आतापर्यंत तिने 30 केक तरी बनवले असतील. ते सगळे केक चाखण्याचा पहिला मान आशुतोषने मिळवला होता. पण आता हा नवा केलेला केक खाण्यासाठी आशुतोष नसल्याचे दु:ख तिने व्यक्त केले आहे. शिवाय तिने आशुतोषला आता तरी त्याचा योग्य मार्ग सापडेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमधून आशुतोष हा दीर्घकाळासाठी तणावाखाली होता हे कळून आले आहे. या तणावातूनच त्याने हे पाऊल उचलले हे आता सिद्ध झाले आहे.
फोर्ब्सच्या लिस्टनुसार अक्षय यंदाचा एकमेव श्रीमंत बॉलीवूड कलाकार
आशुतोषने तणावावर केली शॉर्ट फिल्म
आशुतोषने birthday नावाची एक शॉर्ट फिल्म केली. ज्यामध्येही त्याने डिप्रेशनवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात आलेले एकटेपण आणि वाढतं वय यावर प्रकाश टाकणाही ही शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर तणावामुळे आयुष्य किती बिनसते ते लक्षात येते. तणाव येण्यासाठी एखादी गोष्ट तुम्हाला क्षुल्लक वाटत असली तरी ती समोरच्याच्या मनाला उद्धवस्त करु शकते, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. पण खऱ्या आयुष्यातही आशुतोष तणावाखाली होता हे कुटुंबिय वगळता कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळे अनेकांसाठी ही गोष्ट धक्कादायक होती.
संजय दत्तवर अजून एक संकट, फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त
कुटुंब अजूनही धक्क्यात
आशुतोषच्या या टोकाच्या भूमिकेमुळे भाकरे कुटुंबिय अजूनही धक्क्यात आहे. अवघ्या 32 व्या वर्षी आशुतोष आपले जीवन संपवेल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. नवोदित कलाकार म्हणून त्याची ओळख बनत होती. त्याने दोन मराठी चित्रपटांमधून कामही केले होते. 2016 साली आशुतोष आणि मयुरीचे लग्न झाले होते. त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल कितीही अफवा पसरल्या असल्या तरी त्यांच्या नात्यात अजिबात वितुष्ट नव्हते. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मयुरी आणि आशुतोष, त्यांच्या नांदेड येथील घरी संपूर्ण कुटुंबासोबत राहात होते.
इतक्या दिवसांनी मयुरी व्यक्त झाल्यानंतर तिच्या फॅन्सनी तिला धीर दिला आहे.
लाईक्स, कमेंट शेअरच्या मायाजाळापासून दूर राहा- मानुषी छिल्लर